Zilha Parishad Bharti 2023 Jalna Application Form Link Last Date Apply Online

जिल्हा परिषद भरती 2023 जालना मोबाईल मधून फॉर्म भरा | Zilha Parishad Bharti 2023 Jalna Application Form Link Last Date Apply Online

4.7/5 - (13 votes)
Zilha Parishad Bharti 2023 Jalna Application Form Link Last Date Apply Online – महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद मेगा भरती निघाली आहे. या भरती मध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे.त्यातून जालना जिल्ह्याबद्दलची माहिती. जालना जिल्ह्या त 19 पदांसाठी 467 रिक्त जागा आहेत. जिल्हा परिषद जालना 2023 भरती यासाठी लागणारी शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, वेतन /पगार, नोकरीचे ठिकाण,अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट, मोबाईल  मधून अर्ज कसा केला जातो. याबद्दलची संपूर्ण माहिती अगदी सोप्या पद्धतीने खाली देण्यात आली आहे.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

(Zilha Parishad bharti 2023 Information in marathi  pdf download qualification official website link nagar parishad bharti Zp recruitment maharashtra online form exam date notification pdf exam syllabus update news online form last date shipati www rdd maharashtra gov in requird document eligibility salary age limit job location all important information about jilha parishad bharti 2023)

Zilha Parishad Bharti 2023 Jalna Total Post, Name of The Post, and no.of Vacancy

जिल्हा परिषद भरती 2023 जालना जिल्ह्यातील पदे व एकूण पदांसाठी रिक्त जागा व पदांची नावे याबद्दलची सविस्तर माहिती खालील प्रमाणे.
अ. क्र. पदाचे नाव पद संख्या
1 आरोग्य पर्यवेक्षक 01
2 आरोग्य सेवक ( पुरुष) 40% 42
3 आरोग्य सेवक ( पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) 109
4 आरोग्य परिचारिका /आरोग्य सेवक ( महिला) 182
5 औषध निर्माण अधिकारी 12
6 कंत्राटी ग्रामसेवक 50
7 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)( बांधकाम/ ग्रामीण पाणी पुरवठा) 23
8 कनिष्ठ लेखा अधिकारी 12
9 कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) 12
10 कनिष्ठ सहाय्यक लेखा 05
11 पर्यवेक्षिका 07
12 पशुधन पर्यवेक्षक 04
13 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 01 01
14 लघुलेखक ( उच्च श्रेणी ) 01
15 लघुलेखक (निम्न श्रेणी) 01
16 वरिष्ठ सहाय्यक लेखा 04
17 विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग 3 श्रेणी 2) 01
18 विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 03
19 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम /लघु पाटबंधारे) 07
एकूण 467  जागा

 

महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार जागा पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

💡 जिल्हा परिषद अहमदनगर भरती 2023

 

 

शिक्षण पात्रता  Zilha Parishad Bharti 2023 Qualification

जिल्हा परिषद भरती 2003 जालना जिल्ह्यासाठी पदानुसार शिक्षण पात्रता खाली देण्यात आली आहे
1) आरोग्य पर्यवेक्षक 
मान्यताप्राप्त विद्यापीठातील विज्ञान शाखेची पदवी आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांनी 1 वर्षाचा (12 महिने) पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला असेल अशा उमेदवारांची नामनिर्देशने निवड करण्यात येईल.

 

2) आरोग्य सेवक (पुरुष) 40% 
विज्ञान विषयासह 10वी पास , बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांसाठी 12 महिन्याचा (1 वर्ष) मूलभूत पाठ्यक्रम पूर्ण केला नसेल तर अशा उमेदवारांनी प्रशिक्षण नियुक्तीनंतर 3 संधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील .

 

3) आरोग्य सेवक पुरुष 50% ( हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) 
विज्ञान विषयासह 10वी पास , राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोधक कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसांचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल .
ज्या उमेदवारांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 1 वर्ष (12 महिने) पाठ्यक्रम पूर्ण केला नसेल अशा उमेदवारांना सदर परीक्षण नियुक्तीनंतर तीन संधीत पूर्ण करणे आवश्यक राहील.

 

4) आरोग्य परिचारिका/ आरोग्य सेवक (महिला)
शैक्षणिक पात्रता सहाय्यकारी प्रसारिका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झाली असेल किंवा अशा नोंदणीसाठीची पात्र असतील असे उमेदवार.

 

5) औषध निर्माण अधिकारी
औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका असलेली किंवा घेणारे आणि औषध शाळा अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार.

 

6) कंत्राटी ग्रामसेवक
किमान12 वी पास प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत 60 टक्के गुणांसह पास किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून अभियांत्रिकी पदविका (3 वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा शासनमान्य संस्थेतून समाज कल्याण पदवी (बी एस डब्ल्यू) किंवा 10 वी परीक्षा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता आणि कृषी पदविका 2वर्षाचा अभ्यासक्रम किंवा कृषी विषयाची पदवी किंवा उच्च शिक्षण घेत असलेले किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेले उमेदवार संगणक हाताळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक राहील

 

7) कनिष्ठ अभियंता( स्थापत्य) (बांधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा)
स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यता प्राप्त पदवी किंवा पदविका(3 वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य शिक्षण घेत असतील असे उमेदवार.

 

8) कनिष्ठ लेखा अधिकारी
मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी व कोणतीही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यामध्ये कमीत कमी 5 वर्ष अखंड सेवेचा अनुभव असलेले विद्यार्थ्यांमधून नामनिर्देशनाद्वारे निवड करण्यात येईल.
याबाबतीत लेख शास्त्र आणि लेखा परीक्षा ही विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी घेतलेले किंवा प्रथम व द्वितीय वर्गातील पदवी घेतअसणारे विद्यार्थी किंवा गणित,सांख्यिकी किंवा लेखा शास्त्र आणि लेखापरीक्षा प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी घेत असणारे अशा विद्यार्थ्यांमधून नामनिर्देशनाद्वारे निवड करण्यात येईल. आणि सरकारी कार्यालयातील किंवा व्यापारी संस्थेतील कोणत्याही स्थानिक प्राधिकरणातील लेखक कार्याचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

 

9 ) कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) 
10वी पास प्रमाणपत्र तुल्य परीक्षा पास झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचारी मराठी टंकलेख व लघुलेख यातील परीक्षा घेण्यासाठी असलेले ऐतादर्थ मंडळाने किंवा आयुक्त ,शासकीय परीक्षा विभाग ,शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी मराठी व इंग्रजी टंकलेखाचे दर मिनिटात 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र. किंवा मराठी लेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा पास असलेले उमेदवार
इंग्रजी विषय घेऊन माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या किंवा इतर भाषेतील अंक लेखनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय 6 जानेवारी 1997 नुसार मराठी टंकलेखक आवश्यक राहील. परंतु फक्त दोन भाषांपैकी मराठी भाषेतील गतीच्या प्रमाणपत्रानुसार नियुक्त केलेले उमेदवार नियुक्त केलेल्या तारखेपासून दोन वर्षाच्या कालावधीत इंग्रजी भाषेतील 2 मिनिटात 40 शब्द यापेक्षा कमी नाही अशा टकलेखनाच्या गतीचे प्रमाणपत्र मिळवतील असे उमेदवार

 

10) कनिष्ठ सहाय्यक लेखा
10 वी पास प्रमाणपत्र किंवा समतुल्य परीक्षा पास असलेले विद्यार्थी आणि महाराष्ट्र शासन शासकीय कर्मचारी यांच्यासाठी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेत असलेल्या शासकीय परीक्षा विभाग, शिक्षण संचालनालय , यांनी महाराष्ट्र राज्य मराठी टंकलेखनाची प्रत्येक मिनिटात 30 शब्द या गतीचे दिलेले प्रमाणपत्र घेत असणारे किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक परीक्षा प्रमाणपत्र किंवा समतुल्य परीक्षा पास असणे आवश्यक आहे.
इंग्रजी विषयासह माध्यमिक परीक्षा पास प्रमाणपत्र किंवा समतुल्य परीक्षा पास असलेले किंवा इतर भाषेतील टंकलेखनाचा अनुभव असलेले विद्यार्थी अधिक पसंती दिली जाईल.

 

11) पर्यवेक्षिका
महिला उमेदवारांनी सांविधीक विद्यापीठाची पदवी , त्यामध्ये समाजशास्त्र किंवा गृह विज्ञान शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली असावी . आणि महिला व बालविकास विभागाकडील शासन अधिसूचना दिनांक 4 जून 2021 नुसार पदवी धारण केलेली असावी .

 

12) पशुधन पर्यवेक्षक
दोन (अ) संविधिक विद्यापीठाची पशुवैद्य शास्त्रातील पदवी धारण करीत असलेले किंवा
(ब) पशुधन पर्यवेक्षक ,पशुपालन ,पशुधन सहाय्यक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी (ब श्रेणी) याबाबतची संवर्धन संचालनालयाने दिलेल्या पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणाऱ्या व्यक्ती
मुंबई राज्याने चालविलेल्या अभ्यासक्रमासह पशुवैद्यपशुपालन प्रशिक्षण अभ्यासक्रम
पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन आणि राज्यातील विविध संविधीक कृषी विद्यापीठ यांनी चालविलेल्या पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम
पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांनी चालविल्या पशुवैद्य व पशुसंवर्धन शास्त्रामधील दोन वर्षाचा सेवांतर्गत पदविका अभ्यासक्रम
संस्थांनी चालवलेल्या पशुवैद्यशास्त्र विषयासह दुग्ध शाळा व क्षेत्र व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका यामधील 2 वर्षाचा पदविका अभ्यासक्रम
(1) महाराष्ट्र तंत्राची परीक्षा मंडळ
(2) राज्यातील विविध संविधीक कृषी विद्यापीठ
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञानविद्यापीठ नागपूर यांच्यामार्फत चालविण्यात येणारा पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण
माहिती तंत्रज्ञान संचालन महाराष्ट्र शासन यांच्याकडून वेळोवेळी विहित केलेले संगणक वापराबाबत चे प्रमाणपत्र असणे आवश्यक

 

13) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र , जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र ,प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्म जीवशास्त्रयासह पदवी असणे अशा उमेदवारांची नामनिर्देशनाद्वारे निवड करण्यात येईल. (परंतु हाफ किंग संस्थेच्या वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान शास्त्रामध्ये पदविका धारण करीत असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल)

 

14) लघु लेखक ( उच्च श्रेणी)
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम 1965 (सन 1965 महाराष्ट्र अधिनियम 41)या अन्वये स्थापन केलेल्या विभागीय मंडळाचे शिक्षणाच्या माध्यमिक टप्प्याच्या अखेर घेतलेली माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तिच्याशी तुल्य परीक्षा उत्तीर्ण असतील असे उमेदवार
आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य जालना यांनी दिलेल्या किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडून वीनिर्देशक पूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणतेही संस्थेने दिलेल्या इंग्रजी किंवा मराठी लघुलेखानातील दर मिनिटात 120 शब्द पेक्षा कमी नसेल इतक्या गतीने आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटात 40 शब्द किंवा मराठी टंकलेखनातील दर मिळतात 30 शब्द कमी नसेल या गतीने प्रमाणपत्र असणे आवश्यक.

 

15) लघुलेखक (निम्न श्रेणी)
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम 1965 (सन 1965 महाराष्ट्र अधिनियम 41)या अन्वये स्थापन केलेल्या विभागीय मंडळाचे शिक्षणाच्या माध्यमिक टप्प्याच्या अखेर घेतलेली माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तिच्याशी तुल्य परीक्षा उत्तीर्ण असतील असे उमेदवार
आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य जालना यांनी दिलेल्या किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडून वीनिर्देशक पूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणतेही संस्थेने दिलेल्या इंग्रजी किंवा मराठी लघुलेखानातील दर मिनिटात 100 शब्द पेक्षा कमी नसेल इतक्या गतीने आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटात 40 शब्द किंवा मराठी टंकलेखनातील दर मिळतात 30 शब्द कमी नसेल या गतीने प्रमाणपत्र असणे आवश्यक.
परंतु महाराष्ट्रशासन ग्रामीण विकास व संधारण विभागाकडील शासन निर्णय दिनांक 6 जानेवारी 1997 नुसार मराठी टंकलेखन व मराठी लघुलेखन आवश्यक राहील.

 

16) वरिष्ठ सहाय्यक लेखा
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील याबाबत लेखाशास्त्र व लेखापरीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी घेत असलेले पहिल्या किंवा दुसऱ्या वर्गातील पदवी घेत असणाऱ्या कोणत्याही सरकारी कार्यालयात, व्यापारी संस्थेत, स्थानिक प्राधिकरणात 3 वर्षाहून कमी नसेल इतक्या अखंड कालावधीपर्यंत लेखा विषय कामांचा पदवीनंतरचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल

 

17) विस्तार अधिकारी ( शिक्षण)( वर्ग 3 श्रेणी 2)
मान्यता प्राप्त विद्यापीठाची बीए ,बी कॉम, बीएससी ही पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बीएड किंवा समक्ष पदवी किमान 50 टक्के गुणांसह पास असणे आणि ज्यांना मान्यता प्राप्त प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय अध्यापक विद्यालयातील शासनमान्य पदावरील सक्षम प्राधिकार्‍याने वैयक्तिक मान्यता दिलेला किमान तीन वर्षाचा अध्यापनाचा किंवा प्रशासनाचा अनुभव आहे असे विद्यार्थी

 

18) विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
संविधान मान्य विद्यापीठाची विज्ञान कृषी वाणिज्य किंवा वांग्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित किंवा सांख्यिकी विषयासह प्रथम किंवा द्वितीय वर्गातील पदवी घेत असलेल्या किंवा ज्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल किंवा पदवी अनुभव दोन्ही असतील असे विद्यार्थी
परंतु अशा विषयांपैकी एक विषयाची स्नातकोत्तर पदवी घेतलेल्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल

 

19) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम /लघु पाटबंधारे)
माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा पास झाले असतील आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा पास झालेले विद्यार्थी संविधान्य तत्सम खालील पाठ्यक्रम
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एका वर्षाचा पाठ्यक्रम पास किंवा
आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन (वास्तुशास्त्रीय आरेखक) किंवा
कन्स्ट्रक्शन सुपरवायझर (बांधकाम पर्यवेक्षक) किंवा
आरेखक (स्थापत्य) हा दोन वर्षाचा पाठ्यक्रम पास किंवा
सैनिक सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र किंव स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदविका पदवी पदव्युत्तर पदवी घेत असलेले उमेदवार.

 

 💡 प्रधानमंत्री मुद्रा लोन कसे मिळवायचे

 

वेतन/ पगार Zilha Parishad Bharti 2023 Jalana Salary 

जिल्हा परिषद भरती 2023 जालना जिल्ह्यासाठी वेतन/ पगार खालील प्रमाणे.
1) आरोग्य पर्यवेक्षक – एस 13 (35400- 112400)
2) आरोग्य सेवक ( पुरुष) 40% – एस 8 (25500- 81100)
3) आरोग्य सेवक ( पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) – एस 8 (25500- 81100)
4) आरोग्य परिचारिका /आरोग्य सेवक ( महिला) – एस 8 (25500- 81100)
5) औषध निर्माण अधिकारी – एस 10 (29200- 92300)
6) कंत्राटी ग्रामसेवक – 16000 /- दरमहा मानधन
7) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ( बांधकाम/ ग्रामीण पाणी पुरवठा) – एस 14 (38600- 122800)
8) कनिष्ठ लेखा अधिकारी – एस 13 (35400- 112400)
9) कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) – एस 6 (19900- 63200)
10) कनिष्ठ सहाय्यक लेखा – एस 6 (19900- 63200)
11) पर्यवेक्षिका – एस 13 (35400- 112400)
12) पशुधन पर्यवेक्षक – एस 8 (25500- 81100)
13) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – एस 13 (35400- 112400)
14) लघुलेखक ( उच्च श्रेणी ) – एस 15 (41800- 132300)
15) लघुलेखक (निम्न श्रेणी) – एस 14 (38600- 122800)
16) वरिष्ठ सहाय्यक लेखा – एस 8 (25500- 81100)
17) विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग 3 श्रेणी 2) एस15 (41800- 132300)
18) विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – एस 13 (35400- 112400)
19) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम /लघु पाटबंधारे) – एस 8 (25500- 81100)

 

वयोमर्यादा Zilha Parishad Bharti 2023 Jalana Age limit

संवर्गनिहाय वयोमर्यादा
1) आरोग्य सेवक (महिला) – खुला प्रवर्ग 18 ते 42
2) आरोग्य सेवक (महिला) – मागास प्रवर्ग 18 ते 45
3) आरोग्य सेवक (पुरुष) 50 % – 18 ते 47
4) पर्यवेक्षिका (सरळ सेवा) – खुला प्रवर्ग 21 ते 40 मागास प्रवर्ग 21 ते 45

 

सामाजिक व समांतर आरक्षण निहाय वयोमर्यादा

1) खुला प्रवर्ग – 18 ते 40
2) मागासवर्गीय उमेदवार – 18 ते 45
3) दिव्यांग उमेदवार – 18 ते 47
4) प्रकल्पग्रस्त – 18 ते 47
5) भूकंपग्रस्त – 18 ते 47
6) अंशकालीन – 18 ते 57
7) माजी सैनिक – 45 ते 47
8) माजी सैनिक (दिव्यांग) – 45 ते 47
9) खेळाडू – 18 ते 45
10) अनाथ – 18 ते 45
11) स्वातंत्र्य सैनिक पाल्य – 18 ते 47 1991 चे जनगणना कर्मचारी 1994 नंतरची निवडणूक कर्मचारी शासकीय कर्मचारी/ जि. प. कर्मचारी

 

नोकरीचे ठिकाण  (Job location ) – जालना (महाराष्ट्र)

 

अर्ज फी – Zilha Parishad Bharti 2023 Jalana Application Form Fee

1) खुल्या प्रवर्गासाठी – 1000/- रुपये
2) मागास प्रवर्गासाठी – 900/- रुपये
3) अनाथ उमेदवारांसाठी – 900/- रुपये
4) माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी अर्ज फी माफ राहील.

 

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date)  – 25 ऑगस्ट 2023

 

Zilha Parishad Bharti 2023 Jalna Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट www.zpjalna.com
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट येथे क्लिक करा
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा

 

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा : येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

 

FAQ. Zilha Parishad Bharti 2023 Jalna Application Form Link Last Date Apply Online Syllabus Documents 

Q. Zp Zilha bharti 2023 Jalna Syllabus?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 Syllabus (पाठ्यक्रम) वरती लेखांमध्ये लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही जिल्हा परिषद भरतीच्या पूर्ण Syllabus चेक करू शकता.
Q. Zilha Parishad Bharti Jalna?
Ans. Computer world centre या वेबसाईटवर जाऊन तुम्ही जिल्हा परिषद भरतीची पूर्ण सविस्तर माहिती बघू शकता.
Q. Zilla Parishad Bharti 2023 Jalna Qualifications?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 साठी शिक्षण पात्रता वरती लेखांमध्ये पदानुसार देण्यात आलेली आहे. किंवा Computer world centre या वेबसाईटवर जाऊन तुम्ही जिल्हा परिषद भरती 2023 पूर्ण पदांची शिक्षण पात्रता बघू शकता.
Q. जिल्हा परिषद भरती 2023 जालना जिल्ह्यात कोणत्या पदासाठी जास्त जागा आहेत?
Ans. आरोग्य परिचारिका आरोग्य सेवक (महिला) या पदासाठी एकूण 182 जागा आहेत.
Q. Zilha Parishad Bharti 2023 jalana Apply Online?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज करण्याकरिता लेखांमध्ये देण्यात आलेल्या लिंकचा वापर करून भरतीच्या अर्ज करू शकता.
Q. जिल्हा परिषद भरती 2023 जालना Pdf?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 पीडीएफ वरील लेखांमध्ये देण्यात आलेली आहे त्याच्या वापर करून तुम्ही भरतीची पूर्ण माहिती बघू शकता किंवा Computer world centre या वेबसाईटवर जिल्हा परिषद भरती 2023 ची पीडीएफ मिळेल.
Q. Zilha Parishad Bharti Jalna last date to Apply?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 साठी 25 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करू शकता.
Q. जिल्हा परिषद भरती 2023 जालना जिल्ह्यात किती पदांसाठी भरती आहे?
Ans. एकूण 467 पदांसाठी होणार आहे.
Q. जिल्हा परिषद भरती 2023 जालना जिल्ह्यात कोणत्या पदांसाठी सर्वात कमी जागा आहेत?
Ans. जालना जिल्ह्यात आरोग्य पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी आहेत.
Q. जिल्हा परिषद भरती 2023 मोबाईल मधून अर्ज कसा करावा?
Ans. मोबाईल मधून अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती Computer world centre यूट्यूब चैनल वर व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देण्यात .
मित्रांना शेअर करा
Scroll to Top