Zilha Parishad Bharti 2023 Parbhani Application Form Link Last Date Apply Online

जिल्हा परिषद भरती 2023 परभणी मोबाईल मधून फॉर्म भरा | Zilha Parishad Bharti 2023 Parbhani Application Form Link Last Date Apply Online

4.4/5 - (13 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Zilha Parishad Bharti 2023 Parbhani Application Form Link Last Date Apply Online – विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी. जिल्हा परिषद अंतर्गत मेगा भरती निघाली आहे. या Jilha Parishad भरतीमध्ये परभणी जिल्हामध्ये 16 पदांसाठी एकूण 301 जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक विद्यार्थी ZP भरतीच्या लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता. Zp जिल्हा परिषद परभणी भरतीसाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची अंतिम तारीख, अधिकृत वेबसाईट, पगार ही सर्व माहिती आणि भरतीच्या अर्ज मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली देण्यात आलेली आहे.

ZP Parbhani Recruitment Bharti Information in Marathi www.parbhani.nic.in.2023 Jilha Parishad.Gov.in Zilla Parishad Parbhani Qualification ZP Parbhani Bharti Syllabus Zilla Parishad Parbhani Jilha Age Limit Jilha Parishad Parbhani Application Form Apply online Zilla Parishad Bharti Notification PDF Parbhani Bharti Official Website Application Form Last Date Exam All Important Information about Parbhani Jilha Parishad bharti 2023

Zilha Parishad Bharti 2023 Parbhani Total Posts, Name Of Posts & No. Of Vacancy

पदाचे नाव व पदा नुसार भरल्या जाणाऱ्या जागा – जिल्हा परिषद परभणी भरतीसाठी भरली जाणारी पदे व जागा खाली तपशील मध्ये देण्यात आलेल्या आहेत.

अ. क्र. पदाचे नाव पद संख्या
1 आरोग्य पर्यवेक्षक 02 जागा
2 आरोग्य सेवक (पुरुष) 40% 09 जागा
3 आरोग्य सेवक (पुरुष) 50% 08 जागा
4 आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक महिला) 160 जागा
5 औषध निर्माण अधिकारी 15 जागा
6 कंत्राटी ग्रामसेवक 33 जागा
7 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) बांधकाम/ग्रामीण पाणीपुरवठा 29 जागा
8 कनिष्ठ आरेखक 02 जागा
9 कनिष्ठ यांत्रिकी 01 जागा
10 कनिष्ठ लेखा अधिकारी 01 जागा
11 कनिष्ठ सहाय्यक 05 जागा
12 पर्यवेक्षिका 04 जागा
13 पशुधन पर्यवेक्षक 08 जागा
14 विस्तार अधिकारी (कृषी) 01 जागा
15 विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 02 जागा
16 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे) 21 जागा
एकूण जागा 301 जागा

 

पनवेल महानगरपालिका भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता  Zilha Parishad Bharti 2023 Parbhani Qualifications

जिल्हा परिषद भरती 2023 परभणी शिक्षण पात्रता पदा नुसार खाली देण्यात आलेली आहे.

1) आरोग्य पर्यवेक्षक 

ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याच्या पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल.

 

2) आरोग्य सेवक (पुरुष) 40%

विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शाळा परीक्षा पास झालेले उमेदवार. ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याच्या मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर परीक्षण नियुक्तीनंतर तीन संधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील.

 

3) आरोग्य सेवक (पुरुष) 50%

विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसांच्या अनुभवधारकांना प्राधान्य देण्यात येईल. ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याच्या मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्तीनंतर तीन संधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील.

 

4) आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक महिला) 

ज्यांची अहर्ता प्राप्त सहाय्यकारी प्रासविका आणि महाराष्ट्र परिचार्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.

 

5) औषध निर्माण अधिकारी 

औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार

 

6) कंत्राटी ग्रामसेवक 

किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अहर्ता परीक्षेत किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका तीन वर्षाच्या अभ्यासक्रम किंवा शासनमान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी BSW किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अहर्ता आणि कृषी पदविका दोन वर्षांच्या अभ्यासक्रम किंवा कृषी विषयाची पदवी किंवा उच्च अहर्ता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेच्या अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेले उमेदवारांना अधिक पसंती. संगणक हाताळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.

 

7) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) बांधकाम/ग्रामीण पाणीपुरवठा 

स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका तीन वर्षाच्या पाठ्यक्रम किंवा तुल्य अहर्ता धारण करत असतील असे उमेदवार

 

8) कनिष्ठ आरेखक 

माध्यमिक शाळा प्रकल्प उत्तीर्ण झालेले असतील किंवा तुल्य अहर्ता धारण करीत असतील आणि ज्यांनी शासनाने मान्यता दिलेला स्थापत्य आरेखाच्या पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला असेल असे उमेदवार

 

9) कनिष्ठ यांत्रिकी 

ज्यांनी तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील अल्पमुदतीच्या पाठ्यक्रम पूर्ण केला असेल किंवा जे समतुल्य अहर्ता धारण करीत असतील असे उमेदवार

 

10) कनिष्ठ लेखाअधिकारी 

ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणत्याही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान पाच वर्षाच्या अखंड सेवेच्या ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. या बाबतीत लेखा शास्त्र आणि लेखापरीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्यांना अथवा प्रथम व द्वितीय वर्गातील पदवी धारण करणाऱ्यांना अधिक पसंती दिली जाईल. किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखाशास्त्र लेखापरीक्षा हे प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल याबाबत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधिकरणातील लेखा कार्याच्या अनुभव असणाऱ्या अधिक पसंती दिली जाईल.

 

11) कनिष्ठ सहाय्यक 

माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा पास झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनिटात 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार परंतु असे की, इंग्रजी विषय घेऊन माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या किंवा इतर भाषेतील टंकलेखनाच्या अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल. महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय दिनांक 6 जानेवारी 1997 नुसार मराठी टंकलेखन आवश्यक राहील परंतु उक्त दोन भाषण पैकी मराठी भाषेतील गतीच्या प्रमाणपत्रानुसार नियुक्ती केलेले उमेदवार नियुक्त केलेल्या तारखेपासून दोन वर्षाच्या कालावधीत इंग्रजी भाषेतील दोन मिनिटात 40 शब्द होऊन कमी नाही अशा टंकलेखनाच्या गतीचे प्रमाणपत्र मिळतील असे उमेदवार

 

12) पर्यवेक्षिका 

ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या सांविधिक विद्यापीठाची, खास करून समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली आहे तसेच महिला व बालविकास विभागाकडे शासनाची सूचना दिनांक 04 जून 2021 नुसार ज्यांनी पदवी धारण केली असेल असे.

 

13) पशुधन पर्यवेक्षक 

दोन अ संविधिक विद्यापीठाची, पशुवैदक शास्त्रातील पदवी धारण करीत असलेल्या व्यक्ती किंवा ब पशुधन पर्यवेक्षक, पशुपाल, पशुधन सहाय्यक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी ब श्रेणी याबाबतची पशुसंवर्धन संचालन्यायालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणाऱ्या व्यक्ती. 1) त्यावेळच्या मुंबई राज्याने चालवलेल्या अभ्यासक्रमासह, पशुवैद्यक पशुपाल प्रशिक्षण अभ्यासक्रम 2) परशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन आणि राज्यातील विविध विविध कृषी विद्यापीठाचे यांनी चालविलेल्या पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम 3) पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी चालविलेला पशुवैद्यक व पशुसंवर्धन शास्त्र मधील दोन वर्षाच्या सेवांतर्गत पदविका अभ्यासक्रम आणि 4) खालील संस्थांनी चालवलेल्या पशुवैदक शास्त्र विषयासह दुग्ध शाळा व क्षेत्र व्यवस्थापक व पशुसंवर्धन पदविका यामधील दोन वर्षाच्या पदविका अभ्यासक्रम

1) महाराष्ट्र तंत्र शिक्षण परीक्षा मंडळ किंवा 2) राज्यातील विविध संविधिक कृषी विद्यापीठे किंवा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर त्यांच्या मार्फत झालेल्या पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका प्रमाणपत्र

 

14) विस्तार अधिकारी (कृषी)

ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची कृषी विषयातील पदवी किंवा इतर कोणतेही समतुल्य अहर्ता धारण केली असेल अशा उमेदवारांची नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल परंतु कृषी विषयातील उच्च शैक्षणिक अहर्ता आणि कृषी विषयक कामाच्या अनुभव किंवा कृषी पद्धतीचे व्यवसायाचे ज्ञान व ग्रामीण जीवनाच्या अनुभव असेल अशा उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.

 

15) विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 

संविधिकमान्य विद्यापीठाची विज्ञान, कृषी, वाणिज्य किंवा वाड्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी धारण करीत असतील किंवा ज्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल किंवा पदवी व अनुभव दोन्ही असतील असे उमेदवार परंतु अशा विषयांपैकी एका विषयाची स्नात कोत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.

 

16) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे) 

माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा पास झाले असतील आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाच्या एक वर्षाच्या पाठ्यक्रम परीक्षा पास झालेले उमेदवार संविधीमान्य तत्सम खालील पाठ्यक्रम 1) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एक वर्षाच्या पाठ्यक्रम पास किंवा 2) आर्किटेक्चरल ड्राफ्टसमन वास्तुशास्त्री आरेखक स्थापत्य हा दोन वर्षाच्या पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा सैनिक सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदविका पदवी, पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील असे उमेदवार.

 

सूचना – वरील नमूद केलेले शिक्षण पात्रता यामध्ये काही विसंगती असल्यास सेवा प्रवेश नियम, शासन निर्णय, शासन परिपत्रक, शासन अधिसूचना या अंतिम राहतील

 

💰 पगार Zp Bharti 2023 Parbhani Salary

जिल्हा परिषद भरती 2023 परभणी पदानुसार पगार खाली तपशीलमध्ये देण्यात आलेला आहे.

अ. क्र. पदाचे नाव पगार
आरोग्य पर्यवेक्षक 35,400 ते 1,22,400
2 आरोग्य सेवक (पुरुष) 40% 25,500 ते 81,100
3 आरोग्य सेवक (पुरुष) 50% 25,500 ते 81,100
4 आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक महिला) 25,500 ते 81,100
5 औषध निर्माण अधिकारी 29,200 ते 92,300
6 कंत्राटी ग्रामसेवक 16,000
7 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) बांधकाम/ग्रामीण पाणीपुरवठा 38,600 ते 1,22,800
8 कनिष्ठ आरेखक 25,500 ते 81,100
9 कनिष्ठ यांत्रिकी 19,900 ते 63,200
10 कनिष्ठ लेखाअधिकारी 35,400 ते 1,22,400
11 कनिष्ठ सहाय्यक 19,900 ते 63,200
12 पर्यवेक्षिका 35,400 ते 1,22,400
13 पशुधन पर्यवेक्षक 25,500 ते 81,100
14 विस्तार अधिकारी (कृषी) 35,400 ते 1,22,400
15 विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 35,400 ते 1,22,400
१६ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे) 25,500 ते 81,100

 

ग्रामसेवक भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

🤷 वयाची अट Zilla Parishad Bharti 2023 Parbhani Age Limit

जिल्हा परिषद भरती 2023 परभणी वयोमर्यादा खाली तपशीलमध्ये देण्यात आलेली आहे.

1 खुला प्रवर्ग 18 वर्षे ते 40 वर्षे
2 मागासवर्गीय उमेदवार 18 वर्षे ते 45 वर्षे
3 दिव्यांग उमेदवार 18 वर्षे ते 47 वर्षे
5 प्रकल्पग्रस्त 18 वर्षे ते 47 वर्षे
6 भूकंपग्रस्त 18 वर्षे ते 47 वर्षे
7 अंशकालीन 18 वर्षे ते 57 वर्षे
8 माजी सैनिक सशस्त्र दलात केलेली सेवा + 5 वर्षे सूट
9 माजी सैनिक (दिव्यांग) 47 वर्षे
10 खेळाडू 18 वर्षे ते 45 वर्षे
11 अनाथ 18 वर्षे ते 43 वर्षे
12 स्वतंत्र सैनिकाचे पाल्य, 1991 चे जनगणना कर्मचारी, 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी, शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी 18 वर्षे ते 47 वर्षे

 

संवर्गनिहाय वयोमर्यादा

1 आरोग्य सेवक (महिला) खुला प्रवर्ग 18 वर्षे ते 42 वर्षे
2 आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग 18 वर्षे ते 45 वर्षे
3 आरोग्य सेवक (पुरुष) 50% मागास प्रवर्ग 18 वर्षे ते 47 वर्षे
4 पर्यवेक्षिका (सरळ सेवा) खुला प्रवर्ग 21 वर्षे ते 40 वर्षे
5 पर्यवेक्षिका (सरळ सेवा) मागास प्रवर्ग 21 वर्षे ते 45 वर्षे

 

🏪 नोकरीचे ठिकाण (Job Location)परभणी (महाराष्ट्र)

 

अर्ज फी Zilha Parishad Bharti 2023 Parbhani Application Form Fee

जिल्हा परिषद भरती 2023 परभणी अर्ज फी खाली तपशीमध्ये देण्यात आलेली आहे.

1 खुला प्रवर्ग 1000/-
2 मागास प्रवर्ग 900/-
3 अनाथ वर्ग 900/-
4 माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिक फी नाही.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Zilla Parishad Bharti 2023 Parbhani Last Date Of Online Application)

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023
अर्ज सुरू होण्याची तारीख 05 ऑगस्ट 2023

 

आरोग्य सेवक भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

🌐 Zilla Parishad Bharti 2023 Parbhani Official Websits Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट www.zpparbhani.gov.in
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

FAQ. Zilha Parishad Bharti 2023 Parbhani Application Form Link Last Date Apply Online

Q. जिल्हा परिषद परभणी भरती 2023 एकूण जागा?

Ans. जिल्हा परिषद भरती 2023 परभणी जिल्ह्यात एकूण 301 पदांसाठी जागा भरली जाणार आहे.

Q. जिल्हा परिषद परभणी भरती 2023 एकूण पदे?

Ans. जिल्हा परिषद भरती 2023 परभणी जिल्ह्यात एकूण 16 पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत.

Q. Zilla Parishad Parbhani Bharti 2023 Official Websits?

Ans. www.zpparbhani.gov.in

Q. Jilha parishad Parbhani Bharti 2023 last date?

Ans. 25 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करू शकता.

Q. Zp Parbhani Bharti 2023 form fee?

Ans. जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज फी प्रवर्गानुसार वरती देण्यात आलेली आहे.

Q. Zp Bharti 2023 Parbhani age limit?

Ans. जिल्हा परिषद भरती 2023 वयोमर्यादा पदानुसार वरती देण्यात आलेली आहे.

Q. Zp Jilha bharti 2023 Parbhani Syllabus?

Ans. जिल्हा परिषद भरती 2023 Syllabus (पाठ्यक्रम) वरती लेखांमध्ये लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही जिल्हा परिषद भरतीच्या पूर्ण Syllabus चेक करू शकता.

Q. Jilha Parishad Bharti Parbhani?

Ans. Computer world centre या वेबसाईटवर जाऊन तुम्ही जिल्हा परिषद भरतीची पूर्ण सविस्तर माहिती बघू शकता.

Q. Zilla Parishad Bharti 2023 Parbhani Qualifications?

Ans. जिल्हा परिषद भरती 2023 साठी शिक्षण पात्रता वरती लेखांमध्ये पदानुसार देण्यात आलेली आहे. किंवा Computer world centre या वेबसाईटवर जाऊन तुम्ही जिल्हा परिषद भरती 2023 पूर्ण पदांची शिक्षण पात्रता बघू शकता.

Q. Zilla Parishad Bharti 2023 Parbhani Apply Online?

Ans. जिल्हा परिषद भरती 2023 अर्ज करण्याकरिता लेखांमध्ये देण्यात आलेल्या लिंकचा वापर करून भरतीच्या अर्ज करू शकता.

Q. जिल्हा परिषद भरती 2023 परभणी Pdf?

Ans. जिल्हा परिषद भरती 2023 पीडीएफ वरील लेखांमध्ये देण्यात आलेली आहे त्याच्या वापर करून तुम्ही भरतीची पूर्ण माहिती बघू शकता किंवा Computer world centre या वेबसाईटवर जिल्हा परिषद भरती 2023 ची पीडीएफ मिळेल.

Q. Zilla Parishad Bharti Parbhani last date to Apply?

Ans. जिल्हा परिषद भरती 2023 साठी 25 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करू शकता.

Q. जिल्हा परिषद भरती 2023 परभणी जिल्ह्यात ग्रामसेवक पदासाठी जागा आहेत का?

Ans. हो. जिल्हा परिषद भरती 2023 मार्फत परभणी जिल्ह्यात कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी जागा आहेत.

Q. जिल्हा परिषद भरती 2023 महिलांसाठी जागा आहे का?

Ans. जिल्हा परिषद भरती 2023 मेगा भरती निघाली असून या भरतीमध्ये सर्वाधिक जागा महिलांच्या आहेत.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top