ZP Bharti 2023 Qualification Zilha Parishad Bharti Shikshan Patrata

जिल्हा परिषद भरती 2023 पदानुसार शिक्षण पात्रता पहा | ZP Bharti 2023 Qualification Zilha Parishad Bharti Shikshan Patrata

4/5 - (10 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ZP Bharti 2023 Qualification Zilha Parishad Bharti Shikshan Patrata In Marathi -जिल्हा परिषद भरती 2023 राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांचा समावेश या जिल्हा परिषद भरती मध्ये असणार आहे. या जिल्हा परिषद भरतीमध्ये असणारी पदे आणि त्या पदांसाठी आवश्यक शिक्षण पात्रता बद्दल ची संपूर्ण माहिती पदनुसार खाली देण्यात आलेली आहे.

 

Zilha Prishad Bharti 2023 Maharashtra Education Qualification

1) आरोग्य पर्यवेक्षक

ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याच्या पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल.

 

2) आरोग्य सेवक (पुरुष) 40%

विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शाळा परीक्षा पास झालेले उमेदवार. ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याच्या मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर परीक्षण नियुक्तीनंतर तीन संधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील.

 

3) आरोग्य सेवक (पुरुष) 50%

विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसांच्या अनुभवधारकांना प्राधान्य देण्यात येईल. ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याच्या मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्तीनंतर तीन संधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील.

 

4) आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक महिला)

ज्यांची अहर्ता प्राप्त सहाय्यकारी प्रासविका आणि महाराष्ट्र परिचार्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.

 

5) औषध निर्माण अधिकारी

औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार.

 

6) कंत्राटी ग्रामसेवक

किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अहर्ता परीक्षेत किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका तीन वर्षाच्या अभ्यासक्रम किंवा शासनमान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी BSW किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अहर्ता आणि कृषी पदविका दोन वर्षांच्या अभ्यासक्रम किंवा कृषी विषयाची पदवी किंवा उच्च अहर्ता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेच्या अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेले उमेदवारांना अधिक पसंती. संगणक हाताळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.

 

7) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) बांधकाम/ग्रामीण पाणीपुरवठा

स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका तीन वर्षाच्या पाठ्यक्रम किंवा तुल्य अहर्ता धारण करत असतील असे उमेदवार.

 

8) कनिष्ठ अभियंता (विद्युत)

विद्युत अभियांत्रिकी या विषयातील मान्यता प्राप्त पदवी किंवा पदविका तीन वर्षाच्या पाठ्यक्रम किंवा तुल्य अहर्ता आराम करत असतील असे उमेदवार.

 

9) कनिष्ठ आरेखक

माध्यमिक शाळा प्रकल्प उत्तीर्ण झालेले असतील किंवा तुल्य अहर्ता धारण करीत असतील आणि ज्यांनी शासनाने मान्यता दिलेला स्थापत्य आरेखाच्या पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला असेल असे उमेदवार.

 

10) कनिष्ठ लेखाअधिकारी

ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणत्याही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान पाच वर्षाच्या अखंड सेवेच्या ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. या बाबतीत लेखा शास्त्र आणि लेखापरीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्यांना अथवा प्रथम व द्वितीय वर्गातील पदवी धारण करणाऱ्यांना अधिक पसंती दिली जाईल. किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखाशास्त्र लेखापरीक्षा हे प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल याबाबत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधिकरणातील लेखा कार्याच्या अनुभव असणाऱ्या अधिक पसंती दिली जाईल.

 

11) कनिष्ठ सहाय्यक

माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा पास झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनिटात 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार परंतु असे की, इंग्रजी विषय घेऊन माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या किंवा इतर भाषेतील टंकलेखनाच्या अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल.

महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय दिनांक 6 जानेवारी 1997 नुसार मराठी टंकलेखन आवश्यक राहील परंतु उक्त दोन भाषण पैकी मराठी भाषेतील गतीच्या प्रमाणपत्रानुसार नियुक्ती केलेले उमेदवार नियुक्त केलेल्या तारखेपासून दोन वर्षाच्या कालावधीत इंग्रजी भाषेतील दोन मिनिटात 40 शब्द होऊन कमी नाही अशा टंकलेखनाच्या गतीचे प्रमाणपत्र मिळतील असे उमेदवार.

 

12) कनिष्ठ सहाय्यक लेखा

माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा पास झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनिटात 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार परंतु असे की, इंग्रजी विषय घेऊन माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या किंवा इतर भाषेतील टंकलेखनाच्या अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल.

 

13) पर्यवेक्षिका

ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या सांविधिक विद्यापीठाची, खास करून समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली आहे तसेच महिला व बालविकास विभागाकडे शासनाची सूचना दिनांक 04 जून 2021 नुसार ज्यांनी पदवी धारण केली असेल असे उमेदवार.

 

14) पशुधन पर्यवेक्षक

दोन अ संविधिक विद्यापीठाची, पशुवैदक शास्त्रातील पदवी धारण करीत असलेल्या व्यक्ती किंवा ब पशुधन पर्यवेक्षक, पशुपाल, पशुधन सहाय्यक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी ब श्रेणी याबाबतची पशुसंवर्धन संचालन्यायालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणाऱ्या व्यक्ती. 1) त्यावेळच्या मुंबई राज्याने चालवलेल्या अभ्यासक्रमासह, पशुवैद्यक पशुपाल प्रशिक्षण अभ्यासक्रम 2) परशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन आणि राज्यातील विविध विविध कृषी विद्यापीठाचे यांनी चालविलेल्या पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम 3) पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी चालविलेला पशुवैद्यक व पशुसंवर्धन शास्त्र मधील दोन वर्षाच्या सेवांतर्गत पदविका अभ्यासक्रम आणि 4) खालील संस्थांनी चालवलेल्या पशुवैदक शास्त्र विषयासह दुग्ध शाळा व क्षेत्र व्यवस्थापक व पशुसंवर्धन पदविका यामधील दोन वर्षाच्या पदविका अभ्यासक्रम
1) महाराष्ट्र तंत्र शिक्षण परीक्षा मंडळ किंवा 2) राज्यातील विविध संविधिक कृषी विद्यापीठे किंवा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर त्यांच्या मार्फत झालेल्या पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका प्रमाणपत्र.

 

15) प्रयोगशाळा तंत्रज्ञ

ज्याने मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवन शास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणी शास्त्र किंवा सूक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयांमध्ये पदवी धारण केले असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल परंतु हाफकिन संस्थेच्या वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्र शास्त्रामध्ये पदविका धारण करीत असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

 

16) वरिष्ठ सहाय्यक – सांविधिक विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार.

 

17) वरिष्ठ सहाय्यक लेखा

मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील याबाबत लेखा शास्त्र व लेखापरीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्या अथवा पहिल्या किंवा दुसऱ्या वर्गातील पदवी धारण करणाऱ्या अथवा कोणत्याही सरकारी कार्यालयात अथवा व्यापारी संस्थेत अथवा स्थानिक प्राधिकरणातील वर्षाहून कमी नसेल इतके अखंड कालावधी पर्यंत लेखाविषयक कामांच्या पदवी नंतरच्या प्रत्यक्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल.

 

18) विस्तार अधिकारी (कृषी)

ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची कृषी विषयातील पदवी किंवा इतर कोणतेही समतुल्य अहर्ता धारण केली असेल अशा उमेदवारांची नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल परंतु कृषी विषयातील उच्च शैक्षणिक अहर्ता आणि कृषी विषयक कामाच्या अनुभव किंवा कृषी पद्धतीचे व्यवसायाचे ज्ञान व ग्रामीण जीवनाच्या अनुभव असेल अशा उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.

 

19) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे)

माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा पास झाले असतील आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाच्या एक वर्षाच्या पाठ्यक्रम परीक्षा पास झालेले उमेदवार संविधीमान्य तत्सम खालील पाठ्यक्रम 1) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एक वर्षाच्या पाठ्यक्रम पास किंवा 2) आर्किटेक्चरल ड्राफ्टसमन वास्तुशास्त्री आरेखक स्थापत्य हा दोन वर्षाच्या पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा सैनिक सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदविका पदवी, पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील असे उमेदवार.

 

20) लघुलेखक (उच्च श्रेणी)

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम 1965 सन 1965 चा महाराष्ट्र अधिनियम 41 या अन्वये स्थापन केलेल्या विभागीय मंडळाने शिक्षणाच्या माध्यमिक टप्प्याच्या घेतलेली माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तिच्याशी तुल्य परीक्षा पास असतील असे उमेदवार, तसेच आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडून विनिर्देशर पूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले इंग्रजी किंवा मराठी

 

21) लघुलेखक (निम्न श्रेणी)

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम 1965 सन 1965 चा महाराष्ट्र अधिनियम 41 या अन्वये स्थापन केलेल्या विभागीय मंडळाने शिक्षणाच्या माध्यमिक टप्प्याच्या घेतलेली माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तिच्याशी तुल्य परीक्षा पास असतील असे उमेदवार, तसेच आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडून विनिर्देशर पूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले इंग्रजी किंवा मराठी

 

22) रिगमन (दोरखंडवाला)

शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा तिच्याशी समतुल्य जाहीर शैक्षणिक अहर्ता आणि जड माल वाहन अथवा जड प्रवासी वाहनाच्या जड वाहन कामाच्या वैद्य परवानाधारक असेल तर त्यास जड माल वाहनाच्या अथवा जड प्रवासी वाहनाचा चालविण्याचा एक वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा. ज्याच्याकडे विभिन्न यंत्राद्वारे खुदाईचा दोन वर्षापेक्षा कमी नाही इतका अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य. परंतु विहित केलेली वयोमर्यादा अथवा अनुभव संवर्गाची शर्थ अथवा ही दोन्हीही असाधारण अहर्ता किंवा असाधारण अनुभव किंवा दोन्ही धारण करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत शासन निवड मंडळाच्या शिफारशीनुसार शिथील करू शकेल.

 

23) विस्तार धिकारी (शिक्षण)

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.A./B.Com/B.Sc ही पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी एड अथवा समकक्ष पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांना मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, अध्यापक विद्यालयातील शासनमान्य पदावरील सक्षम अधिकाऱ्यांनी वैयक्तिक मान्यता दिलेला किमान तीन वर्षाच्या अध्यापनाच्या किंवा प्रशासनाच्या अनुभव आहे असे उमेदवार.

 

24) विस्तार अधिकारी (सांख्यिकी)

संविधिकमान्य विद्यापीठाची विज्ञान, कृषी, वाणिज्य किंवा वाड्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी धारण करीत असतील किंवा ज्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल किंवा पदवी व अनुभव दोन्ही असतील असे उमेदवार परंतु अशा विषयांपैकी एका विषयाची स्नात कोत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.

 

25) तारतंत्री – महाराष्ट्र शासनाच्या अनुज्ञापण मंडळांनी दिलेले तारतंत्रीचे दुसऱ्या वर्गाचे प्रमाणपत्र किंवा तुल्य अहर्ता धारण करीत असतील असे उमेदवार.

 

26) यांत्रिकी

शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी अथवा शासनाने तिच्याशी समतोल्य म्हणून जाहीर केलेली अन्य कोणतेही अहर्ता असावी त्याच्याकडे शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था अथवा मान्यता प्राप्त संस्थांमध्ये यांत्रिक विद्युत अथवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मधील प्रमाणपत्र असावे. वरील नमूद केलेली शिक्षण अहर्ता संपादन केल्यानंतर त्यास ऑटोमोबाईल व न्यूमॅटिक मशीनच्या देखभाली व दोस्तीच्या एक वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा. तो जड वाहन चालविण्याच्या वैद्य परवानाधारक असावा परंतु विहित केलेली वयोमर्यादा अथवा अनुभव संवर्गाची शर्त अथवा ही दोन्हीही व साधारण अहर्ता किंवा साधारण अनुभव किंवा दोन्ही धारण करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत शासन निवड मंडळाच्या शिफारशीनुसार शिथिल करू शकेल.

 

27) विस्तार अधिकारी (पंचायत)

जे उमेदवार विधीद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील असे उमेदवार, परंतु ग्रामीण समाज कल्याण व स्थानिक विकास कार्यक्रमांच्या तीन वर्षांच्या अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य.

 

28) विस्तार अधिकारी (सांख्यिकी)

संविधिमान्य विद्यापीठाची विज्ञान, कृषी, वाणिज्य किंवा वाड्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी धारण करीत असतील किंवा ज्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल किंवा पदवी व अनुभव दोन्ही असतील असे उमेदवार परंतु अशा विषयांपैकी एका विषयाची स्नात कोत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.

 

29) जोडारी

उमेदवार चौथी उत्तीर्ण झाले असतील तर कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असेल शासकीय तंत्र शाळेतून विहित केलेला जोडाऱ्याचा पाठ्यक्रम किंवा तुल्य पाठ्यक्रम उत्तीर्ण असलेले उमेदवार.

 

30) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)

यंत्र अभियांत्रिकी विषयातील मान्यता प्राप्त संस्थेमधील पदवी किंवा पदविका (3वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा तुल्य अहर्ता घेत असणारे विद्यार्थी.

 

31) अंगणवाडी पर्यवेक्षिका

ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या संविधिक विद्यापीठाची, खास करून समाजशास्त्र किंवा गृह विज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील नाटक ही पदवी धारण केलेली आहे. तसेच महिला व बालविकास विभागाकडील शासन अधिसूचना दि.4 जून 2021 नुसार ज्यांनी पदवी धारण केली असेल असे उमेदवार.

 

सूचना – वरील नमूद केलेले शिक्षण पात्रता यामध्ये काही विसंगती असल्यास सेवा प्रवेश नियम, शासन निर्णय, शासन परिपत्रक, शासन अधिसूचना या अंतिम राहतील.

 

ZP Zilha Parishad Bharti Education Qualification in marathi

 

ZP भरती पदानुसार पगार – येथे क्लिक करा

ZP भरती जिल्हा नुसार जागा – येथे क्लिक करा

 

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा
मित्रांना शेअर करा
Scroll to Top