pik karj mathiti, pik karj documents

पिक कर्ज कसे काढावे? त्यासाठी आवश्यक कागदपत्रे | What is Crop Loan and How to get Required Documents List

3.3/5 - (25 votes)

What is Crop Loan and How to get Required Documents List -शेतकरी बंधूंनो आज आपण पाहणार आहोत पिक कर्ज म्हणजे काय? पिक कर्ज कसे मिळवायचं व त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणते याची यादी. तसेच Crop Loan देणाऱ्या चांगल्या बँका कोणत्या. पिक कर्जाबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे. याचा वापर करून तुम्ही सहजरीत्या तुमच्या शेतीसाठी पीक कर्ज काढू शकता. तर चला मग पाहूया पिक कर्जा बद्दलची संपूर्ण माहिती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पिक कर्ज म्हणजे काय? | What is Crop Loan?

शेती करत असताना, शेतीसाठी लागणारे आवश्यक भांडवल किंव्हा शेतीसाठी लागणारे आवश्यक वस्तूसाठी आपण जे कर्ज घेतो त्याला पिक कर्ज म्हणतात.
पिक कर्जाची परिभाषा जे आपण साधारण कर्ज घेतो त्याचप्रमाणे आहे. फक्त जे आपण पीक कर्ज घेत असतो ते आपण शेतीसाठी वापरतो. आणि जे स्वतःसाठी आपण कर्ज घेत असतो त्याला आपण वैयक्तिक कर्ज असे म्हणतात.

 

पिक कर्ज कसे मिळवायचे | How to get Agriculture Crop Loan

शेतकरी बंधूंनो पीक कर्ज कसे मिळवायचं याबद्दलची माहिती तुम्हाला कुठे दिली जाणार आहे. शेतकऱ्यांचे सर्वप्रथम सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँकेत अकाउंट असणे आवश्यक आहे. तसेच जुने अकाउंट (old Account)  असलेले शेतकरी लगेच अर्ज करू शकता. त्यासाठी शेतकऱ्याला आवश्यक कागदपत्र तलाठी मार्फत घ्यावी लागतात. (pik karj information in marathi)

 

पिक कर्ज घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Agriculture Crop Loan Required Documents List

तुम्हाला जर का पीक कर्ज मिळवायचे असेल तर खाली दिलेल्या आवश्यक कागदपत्रांची तुम्हाला पूर्तता करावी लागते. ही सर्व कागदपत्रे तुम्हाला एका लाखापर्यंतच्या कर्जासाठी पुरेशी आहेत.
1) सातबारा उतारा (7/12 उतारा)
2) खाते उतारा (8 अ उतारा)
3) सोसायटीचा कर्ज नसलेला दाखला
4) आपल्या परिसरातील बँकांचे कर्ज नसल्याचा दाखला (नो ड्युज सर्टिफिकेट)
5) आधार कार्ड
6) पॅन कार्ड
7) अधिकृत बँकेचे खाते

 

हे पण पहा – 1 रु पीक विमा कसा भरायचा पहा

 

पिक कर्ज देणाऱ्या चांगल्या बँक कोणत्या | Best Banks For Corp Loan

शेतकरी बंधूंनो आज तुम्हाला मी अशा बँका सांगणार आहे ज्या तुम्हाला सहजरीत्या चांगल्या प्रकारे पीक कर्ज देऊ शकणार. पीक कर्ज देणाऱ्या चांगल्या बँका कोणत्या त्यांची यादी खालील प्रमाणे.
1) State Bank of India (स्टेट बँक ऑफ इंडिया)
2) Union Bank of India (युनियन बँक ऑफ इंडिया)
3) Bank of India (बँक ऑफ इंडिया)
4) Bank of Maharashtra (बँक ऑफ महाराष्ट्र)
5) Bank of Badhoda (बँक ऑफ बडोदा)
6) HDFC Bank (एचडीएफसी बँक)
7) Central Bank of India (सेंट्रल बँक ऑफ इंडिया)
8) Dena Bank (देना बँक)
9) Panjab National Bank (पंजाब नॅशनल बँक)

 

पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा | Agricluter Crop Loan Online Application Form

पीक कर्जासाठी प्रत्येक राज्यात आणि जिल्ह्यात वेगवेगळी पद्धत असते. काही राज्यांमध्ये व जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने Crop Loan मिळवण्यासाठी अर्ज केला जातो. तर काही जिल्ह्यांमध्ये ऑफलाइन पद्धतीने बँकांकडे जाऊन अर्ज केला जात असतो. त्यामुळे तुम्हाला जर का पीक कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करायचा असेल. तर तुम्हाला आधी चेक करावे लागेल की तुमच्या जिल्ह्यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे का. जर का ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नसेल. तर तुम्हाला स्वतः बँकेत जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे वरती देण्यात आले आहेत. त्याचा वापर करून तुम्ही पीक कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करू शकता. (pik karj mahiti)

 

पीकर्जाचा व्याज दर किती असतो | Interest Rate of Corp Loan

पीक कर्ज घेत असताना सर्वात काळजी घेण्याची गोष्ट म्हणजे त्याचा व्याजदर (Interest Rate) असतो. आणि व्याजदर म्हटला तर हा प्रत्येक बँकांचा वेगवेगळ्या असतो. काही बँकांचा जास्त असू शकतो तर काही बँकांचा कमी सुद्धा असू शकतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनो तुम्ही ज्याही बँकेतून पीक कर्ज घेत आहात. त्या बँकेकडून पीक कर्जाच्या व्याजदर बद्दलची खात्री करून घेणे महत्त्वाचे असते. पिक कर्जाच्या व्याजदर ची माहिती मिळाल्याशिवाय पीक कर्जासाठी अर्ज करू नये. साधारणता पाहायला गेलं तर पीक कर्जाचा कमीत कमी व्याजदर 8% टक्के एवढा असतो. तर जास्तीत जास्त व्याजदर हा 15% टक्के असतो. तर अशा विभिन्न व्याजदरामुळे तुम्हाला स्वतः बँकेकडून चौकशी करून व्याजदर हा माहिती करून घ्यावा लागेल. बँकांच्या नियमानुसार व्याजदर कमी किंवा जास्त होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आधी बँकेतून चौकशी करून घ्यावी त्यानंतरच पीक कर्ज घ्यावे.

FAQ – What is Crop Loan and How to get Required Documents List

Q. शेती कर्ज म्हणजे काय?
Ans. भारतात अनेक वित्तीय संस्था आणि बँका आहेत. ज्या शेतकऱ्यांना त्यांची शेती अधिक चांगली करण्यासाठी व सुपीक करण्यासाठी व शेतीमध्ये कीटकनाशके, खते, सिंचन, पाणी आणि बरेच काही खरेदी करण्यासाठी कर्ज देतात त्यालाच शेती कर्ज असे म्हणतात.

Q. क्रॉप लोन म्हणजे काय?
Ans. शेतकरी त्याची शेती उपजाऊ तसेच शेतीमध्ये लागणारा. कच्चामाल बी बियाणे व कीटकनाशके विकत घेण्यासाठी सावकारांकडून किंवा वित्तीय संस्था तसेच बँकांकडून जे कर्ज घेतो त्यालाच Crop Loan असे म्हणतात.

Q. शेतकरी कर्ज का घेतात?
Ans. शेतकऱ्यांना शेतीमधून उत्पन्न काढण्यासाठी आधी पैसा खर्च करावा लागतो. परंतु शेतीमधून उत्पन्न खूप कमी प्रमाणात येत असतो. आणि तो पैसा परत शेतीमध्ये लागवड करण्यासाठी पुरेसा नसतो. त्यामुळे शेतकरी कर्ज घेतात.

Q. पिक कर्जासाठी कोण पात्र आहे?
Ans. पिक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्याचे वय कमीत कमी 21 वर्ष ते जास्तीत जास्त 65 वर्ष असावे. तसेच शेती व स्वतः मालकीची असावी. असे सर्व शेतकरी पिक कर्ज घेण्यासाठी पात्र राहतात.

मित्रांना शेअर करा