Apple Farming in Maharashtra – आपल्या सर्वांना माहीत आहे. आतापर्यंत सफरचंदाची शेती करायची म्हटली म्हणजे जम्मू-काश्मीर कडेच आपल्या विचारात पण येत नव्हतं की आपण महाराष्ट्रात Apple Farming करू शकतो.
परंतु आता हा प्रयोग यशस्वीरित्या महाराष्ट्रात केला गेला आहे. महाराष्ट्रात सफरचंदाची लागवड करून. चांगल्या प्रकारे उत्पन्न देखील त्याच्यातून शेतकऱ्यांनी काढले आहे.
Apple Plantation in Maharashtra
खूप साऱ्या शेतकऱ्यांनी आता महाराष्ट्रात सुद्धा सफरचंदाची लागवड करून या ठिकाणी उत्पन्न घेतले आहे. सांगायचं म्हटलं म्हणजे काश्मीरची चव आता महाराष्ट्रातील सफरचंदांमध्ये यायला लागली आहे.
काश्मीरच्या सफरचंदाची चव आता महाराष्ट्राच्या मातीत यायला लागली आहे. हा प्रयोग एका शेतकऱ्याने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
महाराष्ट्रात सफरचंदाची शेती
सफरचंद थंड हवेच्या ठिकाणात घेतले जाते. पाहायला गेलं तर हिमाचल प्रदेश किंवा जम्मू-काश्मीर सारख्या थंड हवामान असलेल्या प्रदेशात सफरचंद फळ हे पिकवले जाते.
देऊळगाव तालुका परतुर येथील शेतकरी संतोष नारायण वानखेडे यांनी हा प्रयोग केला.असून त्यांनी या प्रयोगातून समाधान जनक असे उत्पन्न काढले आहे. (maharashtrat saparchandachi sheti)
Farmer Grow Apple Farming In Maharashtra
जस्ट जशी शेती करण्याची पद्धत बदलत आहे. त्यानुसार आता महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा प्रगत झाले आहेत. महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, देवळा, पुणे महाराष्ट्रातील या भागात आता सफरचंदाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
सफरचंदाच्या एका झाडापासून किती उत्पन्न
सफरचंदाचे झाड लावल्यानंतर त्याला फळ येण्यासाठी तीन वर्षे लागतात. हा तीन वर्षाचा कालावधी गेल्यानंतर जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्याच्या काळात सफरचंदाच्या झाडाला फुले येतात. त्यानंतर कडे तयार होऊन ते पिकतात मग फळ काढण्यास सुरुवात होते.
सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सफरचंद लागवडीच्या प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार. एका झाडापासून वीस किलो फळाचे उत्पादन मिळू शकते. अशा पद्धतीने शेतकरी आता महाराष्ट्रात राहून Apply Farming in Maharashtra करू शकता.