Marriage Certificate Maharashtra Information in Marathi - Vivaha Nondani Form PDF

📑 मॅरेज सर्टिफिकेट कसे काढायचे 2024 मध्ये कोणते कागदपत्रे लागतील फॉर्म डाऊनलोड करा | Marriage Certificate Maharashtra Information in Marathi

5/5 - (1 vote)

Marriage Certificate Maharashtra Information in Marathi – लग्न झाल्यानंतर प्रत्येकाला मॅरेज सर्टिफिकेट काढावं लागतं. पण प्रत्येकाला माहीत नसतं की मॅरेज सर्टिफिकेट कसे काढले जाते. मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी काय करावे लागते. कोण कोणती कागदपत्रे लागतात. त्याचे फायदे काय. विवाह नोंदणी साठी किती फी लागते. त्याचबरोबर मॅरेज सर्टिफिकेट बद्दलची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आलेत वाचल्यानंतर तुम्ही स्वतः विवाह नोंदणी करू शकता. विवाह नोंदणीसाठी लागणारा फार्म डाऊनलोड करू शकता. तर चला मग पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे काय?  (What is Marriage Certificate?)

Vivah Nondani Mahnje Kay – विवाह नोंदणी करण्याची तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. विवाह नोंदणी म्हणजे काय? लग्न झाल्यानंतर लग्नाचे कागदोपत्री प्रमाण नोंदविणे म्हणजे विवाह नोंदणी होईल. नोंदणी झाल्यानंतर पुरावा म्हणून दिले गेलेले प्रमाणपत्र म्हणजे विवाह नोंदणी प्रमाणपत्र होय. त्यालाच मॅरेज सर्टिफिकेट असे ही म्हणतात.”Marriage Certificate Maharashtra


मॅरेज सर्टिफिकेट का काढतात? | Why Marriage Certificate Important?

विवाह नोंदणी प्रमाणपत्र का काढले जाते. हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असतो. साधारणतः विवाह नोंदणी प्रमाणपत्र लग्न झाल्यानंतर खूप ठिकाणी लागत असते. जसे की, आधार कार्ड अद्यावत करण्यासाठी. मुलगा जर का कंपनीत कामाला असेल, तर कंपनीकडून मिळणारे कौटुंबिक लाभ घेण्यासाठी. तसेच मॅरेज सर्टिफिकेट हे लग्न बंधनाचे सरकारी व अधिकृत प्रमाण असते. त्याचा वापर लग्न झाले आहे. असे दाखवण्यासाठी अधिकृतपणे करू शकतो.


मॅरेज सर्टिफिकेट डॉक्युमेंट लिस्ट मराठी | Marriage Certificate Required Documents List

तुम्हाला जर विवाह नोंदणी करायची असेल. तर विवाह नोंदणीसाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतात. तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. तरच तुम्ही विवाह नोंदणी करू शकता. तसेच मॅरेज सर्टिफिकेट काढू शकता. खाली तुम्हाला विवाह नोंदणी करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची पूर्ण यादी देण्यात आली आहे.

Documents Required For Marriage Certificate

1) विवाह नोंदणी फॉर्म (marriage certificate application form)

2) आधार कार्ड (Aadhar Card)

3) शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)

4) पासपोर्ट फोटो (Passport Photo)

6) लग्न पत्रिका (Marriage Invitation Card)

7) ब्राह्मण सोबत लग्नाचा फोटो (Marriage Photo With Bramhan)

8) तीन साक्षीदार त्यांचे आधार कार्ड व फोटो


मॅरेज सर्टिफिकेट कसे काढायचे | How to Apply Marriage Certificate in Marathi

तुम्हाला जर मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात माहिती झाल्यानंतर. मॅरेज सर्टिफिकेट कसे काढायचे हे माहीत असणे गरजेचे आहे. विवाह नोंदणी प्रमाणपत्र कसे काढले जाते संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप खाली देण्यात आली आहे.
विवाह नोंदणी प्रमाणपत्र असे काढा

  1. सर्वात आधी विवाह नोंदणी फार्म खाली दिला आहे. विवाह नोंदणी फॉर्म डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्या.
  2. त्याच्यात दिलेली माहिती न चुकता भरून घ्या. वरती दिलेले सर्व कागदपत्रे गोळा करून त्यांचे झेरॉक्स फार्म सोबत जोडा.
  3. फार्म भरून झाल्यानंतर आवश्यक असलेले कागदपत्रे जोडल्यानंतर. फॉर्म व कागदपत्रे तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जमा करा. जर तुम्ही शहरात राहत असाल तर नगरपालिकेत जमा करा.
  4. तुम्ही दिलेली माहिती बरोबर असल्यास. तुम्हाला विवाह नोंदणी प्रमाणपत्र एक ते दोन दिवसात तयार होऊन मिळते.
  5. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मधून किंवा नगरपालिकेतून विवाह नोंदणी प्रमाणपत्र (Marriage Certificate) काढू शकता.


विवाह नोंदणी फॉर्म pdf डाउनलोड करा | Marriage Certificate Form PDF Download

तुम्हाला जर विवाह नोंदणी करायची असेल. तर तुमच्याकडे विवाह नोंदणी फार्म असणे गरजेचे आहे. विवाह नोंदणी फॉर्म नसला तर तुम्ही विवाह नोंदणी करू शकत नाही. खाली तुम्हाला विवाह नोंदणी एप्लीकेशन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. खाली दिलेल्या लिंक चा वापर करून तुम्ही विवाह नोंदणी फार्म pdf डाऊनलोड करू शकता.

⬇️ विवाह नोंदणी फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा


विवाह नोंदणीचे फायदे | Marriage Certificate Benefits in Marathi

विवाह नोंदणी करण्याचे खूप सारे फायदे आहेत. त्याच्यातून काही महत्त्वाचे फायदे खालील प्रमाणे.

  • विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे एक अधिकृत घोषणापत्र आहे की तुमचं लग्न झालं आहे.
  • भारतात विवाह नोंदणीचा कायदा आहे.(Hindu Marriage Act-1955) त्यानुसार प्रत्येकाला विवाह नोंदणी बंधनकारक आहे.
  • लग्न झाल्यानंतर पती किंवा पत्नी एकमेकांना नकार देत असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्रानुसार. कायदेशीर रित्या एकमेकांवर कारवाई करता येऊ शकते.
  • सर्वात महत्त्वाचं म्हणजे विवाह नोंदणी झाल्यानंतर तुमचा विवाह अधिकृतपणे वैद्य आहे असे ठरवले जाते.
  • विवाह नोंदणी प्रमाणपत्र लग्न झाल्यानंतर नवरी मुलीचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी. तिचे नाव रेशन कार्ड मध्ये टाकण्यासाठी. बँक अकाउंट ओपन करण्यासाठी. तसेच इतर शासकीय ठिकाणी लागत असते.


मॅरेज सर्टिफिकेट नमुना pdf | Marriage Certificate Format PDF Download

ज्यांनी मॅरेज सर्टिफिकेट काढलेले नसते. अशा प्रत्येक व्यक्तीला वाटते की त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट कसे असते पाहायला मिळायला पाहिजे. तर तुमच्यासाठी एक नमुना खाली उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्याच्याने तुम्हाला कळेल की मॅरेज सर्टिफिकेट कसे असते. त्याच्यात काय माहिती देण्यात आलेली असते.

⬇️ Marriage Certificate Sample Format 👉 DOWNLOAD


विवाह नोंदणी किती पैसे लागतात | Marriage Certificate Charges Costs

प्रत्येकाच्या मनात येणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे विवाह नोंदणी साठी किती पैसे लागतात. विवाह नोंदणीसाठी ग्रामपंचायत स्तरावर पैसे देण्याची आवश्यकता नाही. परंतु जर लग्नाला तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ निघून गेला असेल. तर मात्र नियमानुसार दंड आकारला जाऊ शकतो. नगरपालिका स्तरावर 50 ते 100 रुपये घेतले जाऊ शकता.

 💡  हे पण वाचा : रेशकार्ड मध्ये कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव कसे टाकायचे

FAQ : Marriage Certificate Information in Marathi

 

Q: लग्न झाल्यानंतर विवाह नोंदणी किती दिवसानंतर करावी लागते?
Ans: लग्न झाल्यावर विवाह नोंदणी पंधरा दिवसात करून घ्यावी. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जाणार नाही.

Q: विवाह नोंदणी साठी किती दंड लागतो?
Ans: लग्नाला तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला असल्यास 100 रुपये. तर सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असल्यास 300 ते 500 रुपये दंड लागू शकतो.

टीप : हा दंड कोणत्याही प्रकारची फी नसून लोकांनी काळजीपूर्वक विवाह नोंदणी वेळेवर करून घ्यावी त्यासाठी घेण्यात येतो.

Q: विवाह नोंदणी साठी किती फी लागते?
Ans: ग्रामपंचायत स्तरावर लग्न झाल्यानंतर तीन महिन्याच्या आत विवाह नोंदणी केल्यास कोणत्याही प्रकारची फी लागत नाही. नगरपालिका येथे 50 ते 100 रुपये फी लागू शकते.

Q: मॅरेज सर्टिफिकेट किती दिवसांनी मिळते?
Ans: विवाह नोंदणी फॉर्म जमा केल्यानंतर जर शासकीय सुट्या राहिल्या नाहीत तर 2 ते 5 दिवसात मिळते.

Q: मॅरेज सर्टिफिकेट कुठे काढले जाते?

Ans: तुमचं लग्न जर खेड्या गावात झालं असेल तर ग्रामपंचायत मधून मॅरेज सर्टिफिकेट मिळते. जर शहरात झालं असेल तर नगरपालिकेतून मॅरेज सर्टिफिकेट घ्यावे लागते.

Q: लग्न जर सासरवाडीला झालं असेल तर विवाह नोंदणी कुठे करावी लागेल?
Ans: जर एखाद्या मुलाचे लग्न मुलीकडे म्हणजे सासरवाडीला झालं असल्यास. विवाह नोंदणी सुद्धा सासरवाडीलाच करावी लागते.

Q: लग्न जर एखाद्या मंदिरात किंवा ट्रस्टमध्ये झालं असल्यास विवाह नोंदणी कुठे करायची.
Ans: एखाद्या व्यक्तीचे लग्न मंदिरात किंवा झाला असल्यास. विवाह नोंदणी प्रमाणपत्र सुद्धा मंदिर किंवा ट्रस्ट कडूनच घ्यावे लागते.

Q: Van we register marriage certificate anywhere in Maharashtra?
Ans: नाही, तुमचं लग्न ज्या ठिकाणी झालं आहे. त्या गावात किंवा त्या शहरात तेथील ग्रामपंचायत नगरपालिका अधिकृत रजिस्टर ऑफिस या ठिकाणी तुम्ही नोंदणी करू शकता.

Q: How much time it takes for marriage certificate in Maharashtra?
Ans: मॅरेज सर्टिफिकेट बनवण्यासाठी महाराष्ट्रात कमीत कमी दोन ते जास्तीत जास्त दहा दिवसाच्या आत मॅरेज सर्टिफिकेट तयार होते.

Q: How can I gety marriage certificate online in Maharashtra?
Ans: महाराष्ट्रात ऑनलाईन पद्धतीने मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी Aaple Sarkar Portal वरती नागरिक नोंदणी येथे रजिस्ट्रेशन करून मॅरेज सर्टिफिकेट चा फॉर्म भरून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट मिळू शकतात.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top