annabhau sathe yojana 2024 apply online

अब्दुल कलाम व अण्णाभाऊ साठे योजना 10वी व 12वी पास विद्यार्थ्यांना 15000 ते 25000 हजार आर्थिक मदत मिळणार | Abdul Kalam & Annabhau Sathe Yojana for 10th 12th Pass Student 2024 Information in Marathi

4.9/5 - (115 votes)

Abdul Kalam and Annabhau Sathe Yojana 2024 – पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या 10वी व 12वी पास विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी. तुम्हाला मिळणार आता पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत. खूप विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याकारणाने पुढील शिक्षण घेऊ शकत नाही. ही योजना अशा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाला आर्थिक मदत होईल असा हेतू या योजनेच्या आहे. ही योजना पुणे महानगरपालिके मार्फत 2 प्रकारच्या योजना राबवण्यात येणार आहेत. 10 वी व 12 वी पास विद्यार्थीसाठी वेगवेगळी योजना आहे. या योजनेमार्फत विद्यार्थ्यांना 15,000 ते 25,000 पर्यंत अर्थ सहाय्या मिळणार आहे. चला मग जाणून घेऊया डॉ. अब्दुल कलाम व अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना 2024 बद्दलची माहिती तसेच योजनेच्या अटी, नियम, कागदपत्रे व या योजनेच्या अर्ज ऑनलाइन पद्धतीने कसा करायचा हे सर्व माहिती पुढच्या लेखात दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अब्दुल कलाम व अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना 2024 संपूर्ण माहिती

10वी व 12वी विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदतीसाठी ही योजना राबवली जात आहे. अदुल कलाम व अण्णाभाऊ साठे योजना 2024 पुणे महानगरपालिकेच्या या 2 योजना आहेत. अब्दुल कलाम शिष्यवृत्ती योजना व अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना. तसेच विद्यार्थ्याला शिक्षण पद्धतीने योजनेची आर्थिक मदत मिळणार आहे. पुणे महानगरपालिका अब्दुल कलाम योजनेअंतर्गत 10 वी विद्यार्थीसाठी 15,000 शिष्यवृत्ती, तसेच 12वी विद्यार्थ्यांसाठी अण्णाभाऊ साठे योजनेअंतर्गत 25,000 देणार आहेत. या योजनेची आर्थिक मदत कोणत्या पद्धतीने मिळू शकेल आणि शिष्यवृत्ती मिळवण्याकरिता स्टेप बाय स्टेप पूर्ण पद्धत. ही सर्व माहिती पुढील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

 

Abdul Kalam Yojana 2024 and Annabhau Sathe Yojna 2024 Eligibility Criteria

नियम व अटी –
1) 10वी व 12वी पास विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी असावेत.

2) योजनेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीने 10वी व 12वी नंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी संस्था मान्यताप्राप्त असणे आवश्यक आहे.

 

Abdul Kalam Yojana 2024 and Annabhau Sathe Yojna 2024 Education

शिक्षण पात्रता – (Qualifications)
1) अर्जदार शैक्षणिक वर्षात 10वी किंवा 12वी मध्ये कमीत कमी 80% टक्के गुण आवश्यक आहेत

2) अर्जदार मागासवर्गीय विद्यार्थी, रात्र शाळेतील विद्यार्थी, व पुणे महानगरपालिकेच्या विद्यार्थी असल्यास. त्यांच्यासाठी 70% टक्के गुण आवश्यक आहेत.

3) अर्जदार विद्यार्थी 40% टक्के अपंग असेल. त्यांच्यासाठी 10वी व 12वी मध्ये कमीत कमी 65% टक्के गुण आवश्यक आहेत.

 

Abdul Kalam Yojana 2024 and Annabhau Sathe Yojna 2024 Document

आवश्यक कागदपत्रे (Required Documents) – 
1) अपत्य पडताळणीसाठी रेशन कार्ड ची पहिले पान व दुसरे पान जोडणे आवश्यक आहे.

2) अर्जदार पुणे महानगरपालिकेचा हद्दीत कमीत कमी 3 वर्षे वास्तव्य असलेला पुरावा. म्हणजेच 3 वर्षाच्या मनपा टॅक्स पावती, लाईट बिल, टेलिफोन बिल व घरभाडे करारनामा. यांच्यापैकी कोणत्याही इकाची पावती आवश्यक आहे.

3) अर्जदाराचे आधार कार्ड व बँक पासबुक आवश्यक आहे.

4) अर्जदाराच्या जन्म दाखला, शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक आहे.

5) अर्जदार मागासवर्गीय असल्यास जातीच्या दाखला व अर्जदार अपंग असल्यास अपंगत्वाच्या दाखला आवश्यक आहे.

6) बोर्ड मार्कशीट, CBSE व ICSE शाळेतील उत्तीर्ण असल्यास शाळेतील टक्केवारी प्रमुख प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

7) अर्जदार ची महाविद्यालयात प्रवेश शुल्क पावती जोडणे आवश्यक आहे.

8) अर्जदाराचे मूळ कागदपत्रे स्कॅनिंग करून अर्ज सोबत अपलोड करणे आवश्यक आहे.

 

डॉ. अब्दुल कलाम व अण्णाभाऊ साठे योजना 2024 Last Date Of Online Application Form

अर्ज करण्याची शेवटची तारीख – फॉर्म लवकरच सुरू होतील

 

Abdul Kalam Yojana 2024 and Annabhau Sathe Yojana 2024 Website Link

अर्ज करण्याची वेबसाईट – Apply Online

 

डॉ. अब्दुल कलाम व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना 2024 PDF

जाहिरात (PDF) – Download PDF

 

FAQ. Abdul Kalam and Annabhau Sathe Yojana 2024 Information in Marathi

Q. अब्दुल कलाम शैक्षणिक योजना 2024 अर्ज करण्याची वेबसाईट?
Ans. www.dbt.punecorporation.org या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता.

Q. Abdul Kalam Yojana 2024 किती आर्थिक मदत मिळणार आहे?
Ans. 10वी व 12वी पास विद्यार्थ्यांसाठी 15,000 ते 25,000 पर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे.

Q. अदुल कलाम व अण्णाभाऊ साठे योजना 2024 अर्ज करण्याची तारीख?
Ans. 30 जून 2024 पर्यंत अर्ज करू शकता.

Q. अदुल कलाम व अण्णाभाऊ साठे योजना 2024 कागदपत्रे?
Ans. वरील दिलेल्या माहिती मार्फत तुम्हाला लागणारी आवश्यक कागदपत्रे बघू शकता.

Q. अदुल कलाम व अण्णाभाऊ साठे योजना 2024 अर्ज मोबाईल मध्ये भरू शकतो का?
Ans. दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मध्ये अर्ज करू शकता.

मित्रांना शेअर करा