Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana 2023-24 – राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई वेहिकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी संदर्भाने दिव्यांग अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी या योजनेसाठी इच्छुक व पात्र असलेले उमेदवार 04 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
अपंग मोफत रिक्षा योजना 2023-24 साठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा. अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे. योजनेच्या अटी व शर्ती. अशी संपूर्ण माहिती या लेखामध्ये खाली देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहिती आधी उमेदवाराने वाचून समजून घ्या त्यानंतर अर्ज करायला सुरुवात करा.
Divyang Apang Mofat Riksha Vatap Yojana 2023-24 Online Application Form Fill Up Process in Marathi. Divyang Apang Mofat E-Vehicles/ E-Cart Scheme 2023-24 Eligibility Criteria, Terms and Conditions, Required Documents List, and Online Application Form and Registration Process in Marathi
Divyang Apang Mofat Electric Vehicle Yojana
दिव्यांग अपंग मोफत रिक्षा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याकरिता सदर नोंदणी पोर्टल हे. दि. 03.12. 2023 ते दि. 04.01.2024 पर्यंत सकाळी दहा वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरी दिव्यांग अपंग मोफत इलेक्ट्रिक व्हेइकल योजनेचा संबंधित माहिती खाली देण्यात आलेली आहे.
योजनेच्या अटी व शर्ती / Terms and Conditions of the scheme
1) अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
2) अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र किमान 40% असावे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक/ सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र धारक असावा.
3) अर्जदाराकडे दिवंगत्वाचे UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
4) अर्जदार दिनांक 1 जानेवारी 2024 या दिनांकाच्या दिवशी 18 ते 55 या वयोगटातील असावा
5) मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील.
6) दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख पेक्षा अधिक नसावे.
7) लाभार्थी निवड करताना जास्त अपंग असल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे निवडीचा क्रम हा अतिथी व दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहील.
8) अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालवण्याचा परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीत देखील परवानाधारक नसलेल्या अतिथिव्र व्दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबतच्या सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल.
9) अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक राहील.
10) अर्जाचा वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.
11) जिल्हा निहाय लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांग यांच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल.
12) अर्जदार हा शासकीय/निमशासकीय/मंडळे/महामंडळे यांचा कर्मचारी नसावा.
13) या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबाकीदार नसावा.
➡ लेक लाडकी योजना अर्ज कसा करावा पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे | Required Documents List For Online Application Process
1) अर्जदाराचा फोटो (15kb ते 100kb)
2) अर्जदाराची सही (3kb ते 30kb)
3) जातीचा दाखला (Caste Certificate)
4) अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)
5) निवासी पुरावा (Address Proof)
6) UDID प्रमाणपत्र (UDID Certificate)
7) दिवंगत्वाचे प्रमाणपत्र (Disability Certificate)
8) ओळखपत्र (Identity Proof) (उदा. आधार कार्ड,मतदान कार्ड,पॅन कार्ड इत्यादी.)
9) बँक पासबुक (Bank Passbook)
10) अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र (Applicant’s Affidavit)
सूचना – क्रमांक 3 ते 10 पर्यंत ची सर्व कागदपत्रांची साईज 10-100KB असावी आणि फॉरमॅट jpeg, jpg, png and pdf असावा)
ऑनलाइन अर्ज कसा करावा | Online Application Process
1) सर्वात आधी खाली दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करा
2) आता वेबसाईट वरती देण्यात आलेल्या सूचना वाचा.
3) प्रथमच वापरकर्त्याची नोंदणी करा (Registration करा)
4) रजिस्ट्रेशन झाल्यावर एप्लीकेशन पोर्टल वरती लोगिन करा (Sign in करा)
5) त्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल त्याच्या देण्यात आलेली माहिती आधी सविस्तरपणे वाचा.
6) त्यानंतर संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा.
7) फार्ममधील माहिती भरून झाल्यानंतर एकदा तपासून घ्या.
8) आता तुमचा ऑनलाईन अर्ज सबमिट करा.
9) त्यानंतर अर्ज ऑनलाईन सबमिशनची पोचपावती घ्या.
10) अशा पद्धतीने तुम्ही अपंग मोफत रिक्षा योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
Online Application https://evehicleform.mshfdc.co.in/
🌐 ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट | Apply Online |
⬇️ अर्ज करण्यासाठी सूचना व योजना PDF | डाऊनलोड करा |
💁 Conclusion
मित्रांनो या लेखांमध्ये दिव्यांग अपंग मोफत ई – व्हेईकल वाटप योजना बद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. या योजनेसाठी पात्र असलेले उमेदवार कशा पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे. नियम व अटी, पात्रता व अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती दिलेली आहे. तरीही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रपरिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.