Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra

👴🏻Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra Apply Online | मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता कागदपत्रे संपूर्ण माहिती

3/5 - (24 votes)

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra Online Registration, Eligibility Criteria, Required Documents List, Benefits, Last date, Form PDF, Shasan Nirnay GR All information in Marathi. [vayoshri yojana maharashtra. mukhyamantri vayoshri yojana maharashtra apply online. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhyamantri Vayoshri Yojna Maharashtra

तुमच्या कुटुंबात पण जर का 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले व्यक्ती असतील. तर त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून 3,000 हजार दिले जाणार आहे. हे पैसे मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत दिले जाणार असून, या योजनेबाबतची संपूर्ण माहिती या लेखामध्ये तुम्हाला मिळणार आहे. जसे की या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतील. कोणते व्यक्ती या योजनेसाठी पात्र राहतील. योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

 

Mukhyamantri Vayoshri Yojana in Marathi

महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानामुळे येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना म्हणून आवश्यक साह्य साधने व उपकरणे खरेदी करणे करिता तसेच मन स्वास्थ्य केंद्र योग्यापचार केंद्र व इतर याद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अभाधीत ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणा करिता एक वेळी एक रक्कम 3 हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण (D.B.T) प्रणाली द्वारे लाभ प्रदान करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबवली जाणार आहे.

 

योजनेचे स्वरूप |Nature of the scheme

या योजनेअंतर्गत पात्र व वृद्ध लाभार्थ्यांना 3000 हजार रुपये खालील साधने खरेदी करण्यासाठी दिले जाणार आहेत.

1 चष्मा
2 श्रवण यंत्र
3 ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर
4 फोल्डिंग वॉकर
5 कमोड खुर्ची
6 नी- ब्रेस
7 लंबर बेल्ट
8 सायकल कॉलर इ.

तसेच या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योग्यउपचार केंद्र, मन स्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल.

 

योजनेचे उद्दिष्टे | Objectives of the Scheme

1) राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल
2) थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे 3000 हजार रुपये च्या मर्यादित निधी वितरण करण्यात येईल.
3) शिबिराचे आयोजन करण्यात येईल, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा उपचार मोफत होईल.

 

योजनेसाठी पात्रता | Eligibility Criteria

1) या मुख्यमंत्री वयोश्री योजना योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील जेष्ठ नागरिक असावा.
2) त्या नागरिकाचे वय 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत 65 वर्षे पूर्ण केलेली असावीत.
3) त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असावे किंवा आधार नोंदणी पावती असावी.
4) लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा BPL रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धपकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करणे.
5) उत्पन्न मर्यादा : लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असावे. याबाबतचे लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील.
6) सदर लाभार्थी व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकार द्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्तोत्राकडून तेच उपकार विनामूल्य प्राप्त केले नसावे. याबाबतचे लाभार्थ्याने सुयोग घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. मात्र दोषपूर्ण कार्यक्षम उपकरणे इत्यादी बदललेला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते.
7) पात्र लाभार्थीच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात तीन हजार रुपये थेट लाभ वितरण प्रणाली द्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थीच्या देयक प्रमाणपत्र 30 दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था मार्फत विकसित पोर्टलवर 30 दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील. अन्यथा लाभार्थी कडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल.
8) निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्ये पैकी 30 टक्के महिला असतील.

 

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Required Documents List

1) आधार कार्ड मतदान कार्ड
2) राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स
3) पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
4) स्वयंघोषणापत्र
5) शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे.

 

बांधकाम कामगार पेटी योजना

 

अर्ज कसा करावा | पोर्टल तयार करणे (How to Apply Online)

राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येईल. ते पोर्टल तयार झाल्यानंतर उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. पोर्टल तयार झाल्यानंतर त्याबाबतची माहिती आपल्या वेबसाईट वरती अद्यावत करण्यात येईल.

 

✅ वयोश्री योजना GR Download करा – येथे क्लिक करा

 

 

FAQ : Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online

Q. मुख्यमंत्री वयोश्री योजना कोणी सुरू केली?
Ans. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची सुरुवात केली.

Q. मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत किती पैसे मिळणार आहेत.
Ans. या योजनअंतर्गत जेष्ठ नागरिकांना 3000 हजार रु मिळणार आहेत.

Q. मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्रता?
Ans. या योजनेसाठी असे ज्येष्ठ नागरिक की ज्यांचे वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे.

Q. मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन?
Ans. या योजनेसाठी अजून पोर्टल तयार करण्यास सुरू आहे. तरी पोर्टल सुरू झाल्यावर त्यावरून तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top