Free Ration Scheme 2023 Check Ration Quantity Online

1 वर्ष रेशन फ्री मिळेल पण तुम्हाला किती मिळेल चेक करा मोबाईल मध्ये | Free Ration Scheme 2023 Check Ration Quantity Online

Rate this post

Free Ration Scheme 2023 – या एका वर्षासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना. 01 जानेवारी 2023 पासून ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत फ्री रेशन मिळणार आहे. परंतु तुम्हाला फ्री रेशन किती मिळेल. हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. तर तुम्हाला फ्री रेशन पुढील एका वर्षासाठी किती मिळेल. गहू किती मिळतील व तांदूळ किती मिळतील. सर्व माहिती मोबाईल मधून चेक करू शकता. याबद्दल सविस्तर माहिती खाली दिलेल्या लेखामध्ये देण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Ration Scheme 2023 Check Ration Quantity Online

पुढील एका वर्षासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य वाटप होणार आहे. नवीन सुरू झालेल्या एकात्मिक अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत हे अन्नधान्य वाटप होणार आहे. या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मान्यता देण्यात आले आहेत. एकात्मिक अन्नसुरक्षा योजनेला नवीन नाव देण्यात आलेले आहे. या योजनेचे नाव आता पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना 2023 असे झाले आहे. एक जानेवारी 2023 पासून ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत. सर्व देशभरात या योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्य वाटप केले जाणार आहे. पण हे अन्नधान्य तुम्हाला प्रत्येक कुटुंबाला किती मिळणार आहे. हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल मधून चेक करू शकता. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत कोणाला किती धान्य मिळेल. (Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana 2023)


तुम्हाला 1 वर्ष फ्री रेशन किती मिळेल चेक करा मोबाईल मध्ये | Free Ration Scheme 2023 Check Online in Mobile

1) तुम्हाला किती रेशन मिळेल हे चेक करण्यासाठी “Google Play Store” मध्ये Mera Ration असे सर्च करा.

2) आता तुम्हाला “Mera Ration” App दिसेल त्याला Install करून घ्या.

3) Mera Ration App Install झाल्यानंतर त्याला उघडा येथे तुम्हाला खूप सारे पर्याय दिसतील.

4) येथे तुम्हाला Know Your Entitlement या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

5) तुम्हाला येथे दोन पर्याय दिसतील “Ration Card No” व “Aadhaar No” तुम्हाला “Aadhaar No” हा पर्याय निवडायचा आहे.

6) आता येथे तुमचा 12 अंकी आधार नंबर टाका. त्यानंतर खाली दिलेल्या “Submit” बटनावर क्लिक करा.

7) आता येथे तुम्हाला खूप सारी माहिती दिसेल. येथे “Entitlement Details for Current Month in Kgs” असा पर्याय दिसेल.

8) येथे तुम्हाला गहू (Wheat) किती मिळेल व तांदूळ (Rice) किती मिळेल. तसेच किती पैसे लागतील. सर्व माहिती दिली असेल.

9) अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की, फ्री मध्ये तुम्हाला किती रेशन मिळेल.

Commodity: म्हणजे तुम्हाला कोणत्या वस्तू मिळतील. त्याची माहिती या तक्त्यामध्ये देण्यात आली आहे. जसे की गहू तांदूळ भरडधान्य यांची नावं तुम्हाला येथे दिसते.

Price(₹) : येथे तुम्हाला Commodity मध्ये देण्यात आलेल्या वस्तूंची किंमत दाखवली जाईल. अर्थातच तुम्हाला गहू तांदूळ किंवा भरडधान्य घेण्यासाठी किती पैसे लागतील किंवा त्यांची 1 किलो (KG) किंमत येथे देण्यात आली असेल.

Allocation : या तक्त्या मध्ये तुम्हाला किती धान्य मिळणार आहे. त्याची माहिती देण्यात आली असेल. जसे की गहू किती मिळतील. तांदूळ किती मिळतील. भरड धान्य किती मिळेल.

Balance: बॅलन्स या पर्यायांमध्ये तुम्ही किती गहू तांदूळ किंवा भरडधान्य आतापर्यंत घेतले आहे. त्याच्यातून तुमचा किती साठा उरला आहे त्याची माहिती येथे देण्यात येईल.

 

 💡

  हे पण वाचा : रेशकार्ड मध्ये कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव कसे टाकायचे

 💡

  हे पण वाचा : 1 वर्ष रेशन फ्री पैसे देण्याची गरज नाही, प्रिंट केलेली पावती नक्की घ्या


FAQ : Ration Scheme 2023 New Update

Q: एक वर्ष फ्री रेशन मिळणाऱ्या योजनेचे नाव काय?
Ans: या योजनेला सुरुवातीला एकात्मिक अन्नसुरक्षा योजना म्हणून संबोधले गेले होते. परंतु त्याचे नवीन नामकरण करण्यात आले असून. आता या योजनेला “Pradhanmantri Garib Kalyan Anna Yojana” असे नाव देण्यात आले आहे.

Q: मोफत रेशन किती दिवस मिळणार आहे?
Ans: पुढील एका वर्षापर्यंत मोफत रेशन 01 जानेवारी 2023 पासून ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत मिळणार आहे.

Q: प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ कधीपासून सुरू होणार आहे.
Ans: प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 01 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आलेली असून तिचा लाभ सुरू झाला आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top