Kisan Cradit Card Application Form Eligibility Criteria Required Documents Registration In Marathi – शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आज आपण किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय आणि क्रेडिट कार्ड कसे मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती तसेच किसान क्रेडिट कार्ड योजना, किसान क्रेडिट कार्ड योजनेचा उद्देश, किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे, KCC एक्सीडेंट विमा काय आहे, किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी पात्रता, किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे, किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा, पीएम किसान क्रेडिट कार्ड अधिकृत वेबसाईट, किसान क्रेडिट कार्ड साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, किसान कार्ड साठी किती जमिनीची आवश्यकता आहे का?, भारतामध्ये किसान क्रेडिट कार्ड योजना राबवणारा बँक, किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत बँकेमार्फत अर्ज करण्याची प्रक्रिया, किसान क्रेडिट कार्ड ची मर्यादा वाढण्याची किंवा बंद कार्ड पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया, किसान क्रेडिट कार्ड हेल्पलाइन नंबर ही सर्व माहिती तुमच्यासाठी सोप्या भाषेत या लेखांमध्ये देण्यात आली आहे.
क्रेडिट कार्ड म्हणजे काय (What is credit card)
सर्वप्रथम आपण क्रेडिट या शब्दाच्या अर्थ समजून घेऊया, क्रेडिट हा एक इंग्रजी शब्द आहे. त्याच्या मराठी अर्थ म्हणजे पत, विश्वास, श्रद्धा व प्रतिष्ठा असा होतो. उदाहरणार्थ आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला सांगतो की माझं नाव सांग तुझं काम होऊन जाईल किंवा आपल्याला जेव्हा एखादा दुकानदार विश्वास वर उदार वस्तू देतो, कारण दुकानदाराला माहिती आहे की तुम्ही उधारीचे पैसे लवकरच देणार यालाच क्रेडिट असे म्हणतात. याच पद्धतीने क्रेडिट कार्ड चे काम चालते. सध्याच्या डिजिटल युगामध्ये क्रेडिट कार्डचा खूप उपयोग केला जात आहे. क्रेडिट कार्डचा ही बँकेकडून आपल्यासाठी दिले जाणारे एक विशेष सुविधा आहे. क्रेडिट कार्ड माध्यमातून आपल्याला एका प्रकारचे लोन बँकेने दिलेले असते. त्यामुळे आपल्याकडे पैसे नसले तरी आपल्याला कोणती पण वस्तू किंवा पेमेंट क्रेडिट कार्ड द्वारे करता येते. म्हणजेच पेमेंट करण्यासाठी किंवा वस्तू घेण्यासाठी स्वतः बँक पैसे देते. आणि त्यानंतर काळात बँक त्या रकमेवर व्याज लावून रक्कम आपल्याकडून घेत असते. क्रेडिट कार्डच्या वापर आपण अनेक कामासाठी करू शकतो. म्हणजेच आपल्याला ऑनलाइन पेमेंट किंवा ऑनलाइन शॉपिंग सुद्धा करता येते.
बांधकाम कामगार पेटी योजना असा करा अर्ज
किसान क्रेडिट कार्ड योजना (Kisan credit card yojna)
किसान क्रेडिट कार्ड योजना ही भारत सरकार, नाबार्ड आणि आरबीआय यांच्यामार्फत 1998 मध्ये स्थापना करण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत शेतकरी मित्रांना त्यांची शेती कारण देऊन लोन दिले जाते. त्यामुळे शेतकरी बांधव त्यांची शेतीचे उत्पन्न वाढवू शकणार आहेत. किसान क्रेडिट कार्ड योजना काही शेतकरी मित्रांच्या करिता मर्यादित आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी मित्रांना शेती करण्यासाठी खूप कमी व्याज दराने कर्ज देण्यात येते. KCC योजना 2022 ते 2023 अंतर्गत येणारे शेतकरी बंधना प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजना 2023 च्या मदतीने 3 लाख रुपये पर्यंत कर्ज 4% व्याजदराने दिले जाते.
किसान क्रेडिट कार्ड योजनेचा उद्देश
जसे की तुम्हां सर्वांना माहिती आहे आपल्या भारत देशात अधिक तर शेतकऱ्यांची अजून पर्यंत आर्थिक स्थिती चांगली नाही आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी शेतकरी बांधवांना शेतीसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू घेण्यासाठी पैशाची गरज पडते. पैसे नसल्या कारणामुळे शेतकरी पाहिजे तेवढे उत्पन्न शेतीमधून काढू शकत नाही. शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत करण्याकरिता किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आलेली आहे.
1) शेतकऱ्यांना शेतातील पिकांच्या लागवडीकरिता कमी वेळात कर्ज देणे.
2) पिकाच्या काढणीनंतर ही खर्च देणे
3) विपणन कर्ज तयार करणे
4) शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी वापरणाऱ्या गरजा पूर्ण करणे
5) शेतकऱ्यांच्या शेतातील मालमत्तेच्या देखभालीसाठी खेळते भांडवल तसेच दुग्धजन्य प्राणी, अंतर्देशीय मत्स्यपालन, फलोत्पादन, फुलशेती इत्यादी करिता आवश्यक भांडवल.
6) फवारणी, पंपसंच, दुग्धजन्य प्राणी, फुल शेती, फलोत्पादन इत्यादी व्यवसायांसाठी गुंतवणूक करण्यासाठी कर्ज देणे
7) प्राणी, पक्षी, मासे असे अनेक जलसारांचे संगोपन आणि मासे पकडण्यासाठी कमी वेळात कर्ज देणे
किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे (Kisan credit card benefits)
1) किसान क्रेडिट कार्ड योजनेमार्फत शेतकरी मित्रांना बँकेकडून फक्त 4% टक्के व्याजदराणे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
2) शेतकऱ्यांनी 5 वर्षाच्या कालावधीमध्ये वेळेवर घेतलेले कर्ज परतफेड केले तर त्या शेतकऱ्यांना 2% टक्के व्याजदराने सवलती दिली जाते.
3) किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या अंतर्गत भारत सरकार शेतकऱ्यांकरिता कमी व्याजात 3 लाख पर्यंत कर्ज दिले जाते. आणि हे कर्ज फक्त 4% टक्के व्याजाने दिले जाते.
4) शेतकरी बांधवांना कर्ज घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही
5) शेतकरी मित्र शेतीसाठी किंवा शेतकरी त्याच्या वैयक्तिक खर्च, वैयक्तिक गरजा, मुलांचे शिक्षण, मुलाचे लग्न अशा अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकरी किसान क्रेडिट कार्डच्या उपयोग करू शकतो
6) किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकरी कर्जबाजारी होणार नाही.
7) किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकरी शेती शिवाय पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्पालन असे अनेक व्यवसाय करू शकतो. त्यामुळे शेतकऱ्याला अधिक उत्पन्नाच्या स्त्रोत निर्माण होतो
8) किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खाद्य, पशु आहार आणि चिकित्सा यावरील खर्च करिता कर्ज पुरवठा केला जातो
9) किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अपंगत्व किंवा मृत्यू झाला असेल त्यांना 50,000 हजारापर्यंत विमा संरक्षण दिले जाते तसेच इतर जोखीम साठी 25,000 चे कव्हर दिले जाते
10) किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड व्यतिरिक्त स्मार्ट कार्ड आणि डेबिट कार्ड सह कमी व्याजदरात बरोबरचे बचत खाते दिले जाते
11) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी एका वर्षात कर्जाची परतफेड केली नाहीतर त्या शेतकऱ्यांना व्याजदर हा 7% टक्के भरावा लागतो
KCC एक्सीडेंट विमा काय आहे (What is kcc accident insurance)
व्यक्तिगत अपघात विमा योजना अंतर्गत बँकेकडून क्रेडिट कार्ड धारकांसाठी विमा केला जातो. विमाचे काही फायदे खाली देण्यात आलेले आहेत.
1) शेतकरी बंधूंच्या अपघाती मृत्यू झाल्यावर 50,000 हजार पर्यंत विमा दिला जातो.
2) शेतकरी बंधू साठे फक्त 5 रुपये प्रीमियम भरायचा आहे आणि इतर प्रीमियम 10 रुपये बँक भरणार आहे.
3) शेतकरी बंधूंना 3 वर्षांमध्ये फक्त 15 रुपयाच्या प्रीमियम जमा करायचे आहे.
4) किसान क्रेडिट कार्ड अपघात विमा वय 70 वर्षे पर्यंत शेतकरी मित्रांसाठी आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी पात्रता (Kisan credit card eligibiliy)
1) किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेती स्वतः शेतकऱ्याच्या मालकीची असावी.
2) शेतकरी बंधू चे वय 18 वर्षे ते 70 वर्षे दरम्यान असावे
3) शेतकरी बंधू हा पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी असेल तर त्यांनाही या योजनेच्या पात्र ठरवले जाईल
4) मच्छीपालन, पशुपालन यासारख्या बिगरशेती शेतकरी व इतर क्रिया कलापानसह किंवा पिकांच्या उत्पन्नात संबंधित सहभागी शेतकरी
किसान क्रेडिट कार्ड साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Kisan credit card required documents list)
1) ओळखीच्या प्रवर्गासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी
2) पत्ता पुरावासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, विज बिल या पुराव्यामध्ये अर्जदाराच्या सध्याच्या पत्ता असणे आवश्यक आहे
3) शेतीची कागदपत्रे उदाहरणार्थ (8 अ किंवा सातबारा उतारा)
4) दुसऱ्या बँकेत कर्ज घेतले नसल्याच्या पुरावा म्हणून शपथपत्र
5) अर्जदाराच्या पासपोर्ट आकाराची फोटो
6) बँकेचे पासबुक प्रत
7) मोबाईल क्रमांक (आधार कार्डला लिंक केलेला असावा)
किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे (How to get kisan credit card)
किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीचा वापर करू शकता ऑफलाइन पद्धतीने किसान क्रेडिट कार्ड करण्याकरिता खूप सोपी पद्धत आहे तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन अर्ज करू शकता. तुम्हाला तुमच्या जवळील बँकेत जाऊन किसान क्रेडिट कार्डचा अर्ज करायचे आहे. त्यानंतर लागणारे आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जमा करायची आहेत. त्यानंतर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळेल. परंतु क्रेडिट कार्ड साठी अर्ज करत असताना तुमचे पीएम किसान योजनेअंतर्गत बँक खाते असणे आवश्यक आहे.
किसान क्रेडिट कार्ड साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा (Kisan credit card online apply)
किसान क्रेडिट कार्डसाठी तुम्ही बँकेत जाऊन अर्ज करू शकता परंतु अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे शेती असणे आवश्यक आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने किसान क्रेडिट कार्ड अर्ज करण्यासाठी PM Kisan अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता किंवा अर्ज डाऊनलोड करू शकता.
1) सर्वप्रथम जवळील सरकार सेवा केंद्रामध्ये जावे लागेल
2) किसान क्रेडिट कार्ड साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन जाणे
3) सेवा केंद्रावर गेल्यावर ऑनलाईन अर्ज भरला जातो
4) किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी ज्या बँकेच्या अर्ज करायचा आहे त्या बँकेच्या वेबसाईटवर जाऊन पर्यायी सूची मधून किसान क्रेडिट कार्ड निवडावे
5) अर्ज करा या पर्यावरण क्लिक केल्यानंतर त्या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज फॉर्म भरण्याच्या आहे आवश्यक तपशील सह सर्व माहिती भरून फॉर्म भरायचे आहे त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे
6) फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला संदर्भ क्रमांक मिळेल किंवा मेसेज केला जातो
7) फॉर्म भरल्यानंतर मिळालेली पावती कागदपत्रांच्या सोबत तुम्हाला बँकेमध्ये जमा करावे लागते
8) तुम्ही जर किसान क्रेडिट कार्डचे पात्र असाल तुम्हाला पंधरा दिवसाच्या आत किसान क्रेडिट कार्ड मिळेल
पीएम किसान क्रेडिट कार्ड अधिकृत वेबसाईट
अधिकृत वेबसाईट – www.pmkisan.gov.in
किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत बँकेमार्फत अर्ज करण्याची प्रक्रिया
1) सर्वप्रथम तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन भेट द्यावी लागेल
2) वेबसाईट ओपन झाल्यावर समोर होम पेज ओपन होईल
3) मुख्यपृष्ठावर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड फॉर्मच्या पर्याय निवडायचा आहे आणि त्यावर क्लिक करायचे आहे
4) त्यानंतर तुम्हाला Apply Now या पर्यायावर क्लिक करायचे आहे
5) त्यानंतर राज्य तुमच्यासमोर उघडेल
6) त्याच्या मध्ये तुमचे नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी इत्यादी सारख्या अर्जामध्ये विचारलेले अचूक माहिती भरायची आहे
7) त्यानंतर योजनेच्या संबंधित सर्व महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील
8) अपलोड झाल्यावर सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे
9) अशा पद्धतीने तुम्ही किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत अर्ज करू शकता (Application Process through Bank under Kisan Credit Card Scheme)
किसान क्रेडिट कार्ड फॉर्म PDF – DOWNLOAD
किसान कार्ड साठी किती जमिनीची आवश्यकता आहे का?
किसान क्रेडिट कार्ड साठी सर्वप्रथम व्यक्ती शेतकरी असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे शेती स्वतः मालकीची असावी अशा सर्व शेतकऱ्यांना भारत शासनाकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे शेतकऱ्याची शेती कमीत कमी 1 एकर जमीन असणे आवश्यक आहे अशा शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे. किसान क्रेडिट कार्ड योजना मार्फत 30,000 ते 3 लाखांपर्यंत कर्ज शेतकऱ्यांना मिळणार आहे.
भारतामध्ये किसान क्रेडिट कार्ड योजना राबवणारा बँक
अलाबाद बँक | किसान क्रेडिट कार्ड |
आंध्रा बँक | ए बी किसान ग्रीन कार्ड |
बँक ऑफ बडोदा | किसान समाधान कार्ड |
बीकेसीसी बँक ऑफ इंडिया | किसान समाधान कार्ड |
ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स | ओरिएंटल ग्रीन कार्ड |
पंजाब नॅशनल बँक – | पी एन बी कृषी कार्ड |
स्टेट बँक ऑफ इंडिया | किसान क्रेडिट कार्ड |
एचडीएफसी बँक | किसान क्रेडिट कार्ड |
ॲक्सिस बँक | किसान क्रेडिट कार्ड |
कॅनरा बँक | किसान क्रेडिट कार्ड |
कार्पोरेशन बॅंक | किसान क्रेडिट कार्ड |
सिद्धी कॅट बँक | SKCC |
विजया बँक | विजया किसान कार्ड |
तुमच्या जिल्हास्तरीय सहकारी बँकेत सुद्धा ही योजना राबवली जाते परंतु काही बँकेपेक्षा सहकारी बँकेत किसान क्रेडिट कार्ड कर्जाची प्रक्रिया वेगळी आहे.
किसान क्रेडिट कार्ड ची मर्यादा वाढण्याची किंवा बंद कार्ड पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया
1) सर्वात आधी पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन क्लिक करायचे आहे
2) त्यानंतर समोर होंगे उघडेल
3) त्यानंतर फार्मर्स कॉर्नरवर जावे लागेल
4) फार्मर्स कॉर्नरवर गेल्यानंतर KCC फॉर्मल वर क्लिक करायचे आहे
5) आता तुम्हाला हा फॉर्म डाउनलोड करावा लागेल
6) फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला फॉर्म आऊट घ्यावी लागेल
7) त्यानंतर तुम्हाला सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांसह भरलेला फॉर्म जवळील बँकेत जमा करायचे आहे
8) या पद्धतीने तुम्ही किसान क्रेडिट कार्ड ची मर्यादा वाढवू शकता किंवा बंद कार्ड पुन्हा सुरू करू शकता
किसान क्रेडिट कार्ड हेल्पलाइन नंबर
शेतकरी बांधवांना इतर माहिती विचारण्यासाठी टोल फ्री हेल्पलाइन नंबर 011-24300606 कॉल करून विचारू शकता.
थोडक्यात माहिती Kisan Credit Cards Yojana Hightlights
योजना | किसान क्रेडिट कार्ड |
कोणी सुरू केली | भारत सरकार |
सुरू होण्याचे वर्ष | 1998 |
लाभार्थी | देशातील शेतकरी |
उद्देश | शेतकऱ्यांना शेतातील पिकांच्या लागवडीकरिता कमी वेळात कर्ज देणे |
विभाग | कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग |
किती कर्ज मिळते | 3 लाख पर्यंत (3 लाख पेक्षा कर्ज अधिक घेतल्यास व्याज दर वाढतो) |
व्याज दर | 7% (3 लाख पर्यंत) |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन/ऑफलाइन |
श्रेणी | केंद्र सरकार योजना |
💡 हे पण तुमच्यासाठी
FAQ. Kisan Credit Card Application Form Eligibility Criteria Required Documents Registration Process In Marathi
Q. शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी कोणत्या योजना मार्फत क्रेडिट कार्ड दिले जाते?
Ans. किसान क्रेडिट कार्ड योजना
Q. किसान क्रेडिट कार्ड योजना कोणी सुरू केली?
Ans. भारत सरकार
Q. किसान क्रेडिट कार्ड ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
Ans. 1998 साली
Q. किसान क्रेडिट कार्ड योजना अधिकृत वेबसाईट?
Ans. https://pmkisan.gov.in
Q. किसान क्रेडिट कार्ड योजनेचा उद्देश काय आहे?
Ans. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना सर्व समावेश कर्जाच्या गरजांसाठी त्यांच्या पीक लागवडीसाठी व इतर गरजांसाठी वेळेवर आर्थिक मदत देणे हा उद्देश आहे
Q. किसान क्रेडिट कार्ड विभाग?
Ans. कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग
Q. किसान क्रेडिट कार्ड योजना मार्फत किती कर्ज मिळते?
Ans. 3 लाखापर्यंत कर्ज मिळते आणि अधिक कर्ज घेण्यासाठी व्याजदर वाढविला जातो
Q. किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या 3 लाखासाठी किती व्याजदर आहे?
Ans. 7% टक्के
Q. किसान क्रेडिट कार्ड योजना वयाची अट?
Ans. शेतकऱ्याचे वय कमीत कमी वय 18 वर्षे व जास्तीत जास्त वय 75 वर्षे असावे
Q. भारतात किसान क्रेडिट कार्डची योजना कधी सुरू झाली?
Ans. किसान क्रेडिट कार्ड योजना भारत सरकार रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि नाबार्ड मार्फत 1998 मध्ये सुरू झाली
Q. KCC योजनेअंतर्गत कर्जाची कमाल मर्यादा किती आहे?
Ans. 1,60,000 पर्यंत
Q. किसान क्रेडिट कार्ड वरून बँक खात्यातून पैसे कसे काढावे?
Ans. बँकेतील उपलब्ध असलेले विड्रॉल स्लिप आणि किसान क्रेडिट कार्ड पासबुक वापरून तुम्ही रोख रक्कम पंचवीस हजार रुपये पर्यंत काढू शकता जास्त रक्कम असल्यास चेक बुक सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे
Q. भारतात किती किसान क्रेडिट कार्डधारक आहेत?
Ans. 6.67 कोटी
Q. क्रेडिट म्हणजे काय? (what is credit card)
Ans. क्रेडिट हा इंग्रजी शब्द आहे त्याच्या मराठी मध्ये अर्थ पत, विश्वास किंवा श्रद्धा असा होतो
Q. कृषी कर्जाच्या परतफेडीची वारंवारता किती आहे?
Ans. एक महिना, तीन महिना, सहा महिना किंवा एक वर्ष हप्ते असू शकतात.
Q. कृषी कर्ज का दिले जाते?
Ans. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक वस्तू घेण्यासाठी किंवा हंगामी कृषी ऑपरेशन असे अनेक कामांसाठी कृषी कर्ज दिले जाते.
Q. पूर्ण KCC म्हणजे काय?
Ans. किसान क्रेडिट कार्ड
Q. कोणत्या बँका KCC जारी करू शकता?
Ans. भारत देशातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँक आणि लघुवीत्त बँका
Q. शेती तारण कर्ज म्हणजे काय?
Ans. शेतकरी कर्जदाराला मालकीची शेती वरून दिले गेलेले कर्ज त्या शेतीला तारण शेती म्हणून कर्ज दिले जाते
Q. देना बँकेच्या लॉन्चिंग च्या वेळी कृषी क्रेडिट कार्डचे नाव काय होते?
Ans. देना किसान कार्ड
Q. KCC अर्ज कसा करायचा?
Ans. किसान क्रेडिट कार्ड साठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता
Q. किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या परतफेड कालावधी?
Ans. 3 वर्षे ते 5 वर्षे