PM Kisan Mandhan Yojana Information in Marathi – शेतकरी बंधूंनो तुमच्यासाठी परत एकदा नवीन योजना घेऊन आलो आहोत. प्रधानमंत्री किसान मानधन योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा 3000 पेन्शन मिळणार आहे. परंतु ही पेन्शन कधी मिळेल. पेन्शन मिळावी याच्यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागेल. ही योजना ची संपूर्ण माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत तुम्हाला खाली देण्यात आली आहे.
पीएम किसान मानधन योजना 2022 काय आहे? | What is PM Kisan Mandhan Yojana 2022
प्रधानमंत्री पीएम किसान मानधन योजना काय आहे. त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशातील छोट्या व गरीब शेतकऱ्यांना साठ वर्षानंतर 3 हजार रुपये मासिक पेन्शन देणे आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना म्हातारपणी आर्थिक मदत व्हावी हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत बळीराजाचे भविष्य सुरक्षित राहील. जेणेकरून म्हातारपणी शेतकऱ्यांना कोणाकडे जाण्याची आवश्यकता राहणार नाही.
पी एम किसान मानधन योजना 2022 आवश्यक कागदपत्रे | PM Kisan Mandhan Yojana 2022 Required Document
किसान पेन्शन योजना 2022 अंतर्गत अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते. त्याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाणार आहे. खाली दिलेल्या आवश्यक कागदपत्रे फॉर्म भरण्यासाठी लागतात.
1) अर्ज करताना शेतकऱ्याचे वय 18 ते 40 वर्ष असणे आवश्यक आहे.
2) या योजनेअंतर्गत देशातील गरीब व अल्पभूधारक शेतकरी पात्र आहेत.
3) 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्राची शेत जमीन असावी.
4) आधार कार्ड (Aadhar card)
5) बँक खाते पासबुक (Bank PassBook)
6) वयाचा पुरावा
7) मोबाईल नंबर, ईमेल आयडी
8) पास पोर्ट फोटो
9) उत्पन्न दाखला (Income certificate)
पंतप्रधान किसान मानधन योजना फॉर्म कसा भरावा | How to Apply Pantpradhan Kisan Mandhan Yojana
PM किसान मानधन योजना अर्ज कसा करावा. त्याची पद्धत खाली दिली आहे. तुम्ही खाली दिलेल्या माहितीचा वापर करून मोबाईल मधून सुधा हा अर्ज करू शकता.
1) सर्वात आधी फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवा.
2) तुम्हाला स्वतः हा फॉर्म भरता येत नसेल तर जवळच्या सेतू केंद्रात जाऊन फॉर्म भरी शकता.
3) स्वतः फॉर्म भरण्यासाठी https://maandhan.in या वेबसाईट ला भेट द्या किंवा 👉 येथे क्लिक करा.
4) वेबसाईट वरती क्लिक केल्यावर “Click here to Apply” या पर्यायावर क्लिक करा.
5) तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्याच्यावर OTP येईल आधी नाव, पत्ता, मोबाईल नंबर व OTP टाका सबमिट करा.
6) आता तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल, त्याच्यात दिलेली माहिती आधी चेक करा.
7) आता या फॉर्म मध्ये तुमची वैयक्तिक माहिती भरा आणि बँकेची माहिती भरा शेवटी सबमिट बटणावर क्लिक करा.
8) समीर बटनावर क्लिक केल्यानंतर फार्म ची प्रिंट काढून घ्या जेणेकरून गरज पडल्यास कामातील.
9) अशा पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री मानधन योजनेचा फॉर्म भरू शकता.
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचे काही नियम व अटी
1) या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 40 वयोगटातील शेतकरी पात्र राहतील
2) मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना दरमहा 55 रुपये पासून ते 200 रुपये पर्यंत गुंतवणूक करावी लागेल.
3) शेतकऱ्यांच्या वयानुसार गुंतवणुकीची रक्कम कमी जास्त होऊ शकते.
4) शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षापर्यंत ही गुंतवणूक करावी लागेल.