Mudra Loan Yojana Eligibility Interest Rate Documents Online Apply Information In Marathi – मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. मुद्रा लोन म्हणजे का, मुद्रा लोन योजनेचा उद्देश, प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे फायदे, मुद्रा लोन घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, मुद्रा लोन घेण्यासाठी पात्रता, मुद्रा कार्ड, मुद्रा कर्ज अंतर्गत समाविष्ट क्षेत्र, महिला उद्योजकांसाठी मुद्रा कर्ज योजना, मुद्रा लोन घेण्याची प्रक्रिया, लोन मुद्रा देणाऱ्या बँका ही सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या लेखाद्वारे मिळणार आहे.
मुद्रा लोन म्हणजे काय? (What is mudra loan yojana in marathi)
भारतामधील लहान व्यवसायाकरिता मदत म्हणून आणि लहान उद्योगांसाठी सरळपणे कर्ज मिळावे या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 कोटी रुपये भांडवलची एजन्सी मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स म्हणजेच मुद्रा बँकेची स्थापना 8 एप्रिल 2015 रोजी करण्यात आली. लहान उद्योगांचा विकास व उद्योगांना पैशांची मदत म्हणून एक वित्तीय संस्था चालू करण्यात आली. या योजनेमार्फत लहान कारखानदारांना व दुकानदारांना त्यांच्या नवीन उद्योग चालू करण्याकरिता हे कर्ज दिले जाते. तसेच लहान उद्योग जसे महिला उद्योग, घरगुती उद्योग, भाजीपाला उद्योग व इतर उद्योगकरिता मुद्रा लोन दिले जाते. मुद्रा लोनसाठी रिझर्व बँक इंद्रा खाली काम करते. 23 मार्च 2018 पर्यंत मुद्रा योजने अंतर्गत 22,8144 कोटी रुपये कर्ज मंजूर करण्यात आलेली आहेत. त्यानंतर या योजनेमार्फत चालूवर्षी 23 मार्चपर्यंत 22,0596 कोटी रुपये कर्ज घेण्यात आलेले आहेत.
मुद्रा लोन घेण्यासाठी पात्रता (Eligibility Mudra Loan)
मुद्रा कर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षे ते 65 वर्षे दरम्यान असावे. त्याचप्रमाणे अर्जदार एखादा व्यवसाय असावा. दुकानदार, लहान उद्योग, उत्पादन, स्टार्टअप मालक, व्यवसाय मालक, शेतीच्या कामात महिलांच्या सहभाग व इतर.
मुद्रा लोन योजनेचे प्रकार (Types Of Mudra Loan Yojana)
मुद्रा लोन योजनेत कर्जाचे तीन प्रकार आहेत खाली दिलेल्या प्रमाणे
मुद्रा योजना कर्ज शिशु वर्ग, मुद्रा योजना कर्ज किशोर वर्ग व मुद्रा योजना तरुण वर्ग
मुद्रा लोन योजना प्रकाराची माहिती (Information Of Mudra Loan Yojana)
मुद्रा योजना कर्ज शिशु वर्ग – या प्रकारच्या कर्जामध्ये 50 हजारापर्यंत कर्ज मिळते. आणि कशावर प्रत्येकी महिन्याला 9 टक्के व्याजदर असतो व वार्षिक व्याजदर 12 टक्के असतो. या प्रकारच्या कर्जाच्या कालावधी 3 वर्षे ते 5 वर्षे दरम्यान असतो.
मुद्रा योजना कर्ज किशोर वर्ग – या प्रकारच्या कर्जामध्ये 50 हजार ते 5 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. या खर्चाच्या व्याजदर बँकेनुसार निश्चित केलेला आहे. आणि कर्जाच्या कालावधी बँकेवर अवलंबून आहे.
मुद्रा योजना तरुण वर्ग – या प्रकारच्या कर्जामध्ये 5 लाख ते 10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. या कर्जाचा व्याजदर बँकेनुसार निश्चित केलेला असतो व कर्जाच्या कालावधी बँकेनुसार अवलंबून आहे.
मुद्रा लोन योजनेचे उद्देश (Objectives of Mudra Loan Scheme)
लहान उद्योगांसाठी सरळ आणि स्वस्त कर्ज मिळवून देण्याचा उद्देश मुद्रा लोन योजनेचा आहे. ग्रामीण भागातील खूप प्रमाणात बेरोजगारी आहे. तसेच बेरोजगारांना योजनेमार्फत लाभ मिळवून व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा हेतू मुद्रा लोन योजनेचा आहे. लहान व्यवसायासाठी लोकांना कर्ज देऊन स्वतः व्यवसाय करण्यासाठी प्रेरणा देणे. व रोजगार चालू करायला कर्ज देणे. आणि व्यवसाय मोठा व क्षमता वाढवण्यासाठी कर्ज देण्याचा मुख्य उद्देश या योजनेच्या आहे.
💡 तुमचा Credit Score असा वाढवा
मुद्रा लोन घेण्यासाठी वयोमर्यादा (Age Limit For Mudra Loan Yojana)
मुद्रा लोण पाहिजे असेल तर आधी माहीत असायला हवे की loan घेण्यासाठी Age Limit काय आहे. तर मुद्रा लोन अर्ज करण्यासाठी अर्जदार 18 वर्षे ते 65 वर्षे दरम्यान असावा. तुमचे वय या दरम्यान असेल तरच तुम्ही Mudra Loan योजनेचा लाभ घेऊ शकतात.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे फायदे (Benefits of Pradhan Mantri Mudra Yojana)
मुद्रा कर्ज अनेक कामाकरीता दिले जाते. त्यामुळे उत्पन्न विस्तार होतो व रोजगार निर्माण केला जातो. अनेक व्यवसाय आहेत ते व्यवसाय करण्यासाठी वाहनाची गरज भासते. हे ध्यानात धरून मुद्रा संस्था वाहतुकीसाठी सुध्धा कर्ज देते. ते फक्त व्यवसायासाठी वापरण्याकरीता असते. त्यानंतर मुद्रा कर्ज हे वित्तीय संस्था लहान उद्योगांसाठी ही Loan देत असते. शेती संबधित उत्पन्न घेण्यासाठी, जसे की कुक्कुटपालन व मच्छी पालन करीत संस्था कर्ज देते.आणि मुद्रा लोन घेण्याकरिता कोणत्याही प्रकारचे कारण ठेवण्याची गरज असते. किंवा जमीन लागत नाही फक्त आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली तर, मुद्रा लोन मिळते. या लोन मध्ये इतर कर्जाप्रमाणे शुल्क आकारला जात नाही. मुद्रा लोन ची नोंदणी केल्यानंतर आपल्याला मुद्रा कार्ड म्हणजेच डेबिट कार्ड मिळते. त्याच्या साह्याने आपण आपल्याला लागतील तसे पैसे काढू शकतो. मुद्रा लोनच्या व्याजदर इतर लोणपेक्षा कमी असतो. या लोणच्या कालावधी 3 वर्षे ते 5 वर्षे मर्यादित असतो. त्यामुळे कर्ज फेड करायला मोठा कालावधी मिळतो.
जास्त करून दुकानदार, भाजीपाला विक्री, फेरीवाले अशा लहान व्यवसायाकरिता मुद्रालोन चा जास्त फायदा होतो. कारण दुसरे प्रकारचे कर्ज घेण्यासाठी वेगवेगळे कागदपत्रे व कर्जासाठी जामीनदार लागतो अशा विविध गोष्टीमुळे कर्ज मिळत नाही. काही लोकांना बँकेकडून कर्ज घेण्यासाठी बऱ्यापैकी प्रयत्न करूनही कर्ज मिळत नाही त्यासाठी गरजू व्यक्तीला सहजपणे कर्ज मिळवण्याकरिता सरकारने जबाबदारी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे महिलांसाठी मुद्रा योजनेअंतर्गत सवलत मिळते.
मुद्रा लोन घेण्याकरिता लागणारे आवश्यक कागदपत्रे (Mudra Loan Documents)
1) ओळखीच्या पुरावांमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स व पासपोर्ट इत्यादी मधील कोणताही एक पुरावा.
2) रहिवासी दाखला पुरवामध्ये टेलिफोन बिल, विज बिल व आधार कार्ड कोणताही एक पुरावा.
3) अर्जदाराच्या पासपोर्ट साईज फोटो.
4) व्यवसाय किंवा उद्योग करण्याकरिता संबंधित संपूर्ण तपशील.
5) यंत्रसामग्री किंवा इतर वस्तू खरेदी करायचे कोटेशन व बिले.
6) जिथून आपण यंत्र सामग्री घेणार आहोत त्या पुरवठा दाराचे नाव तपशील व इतर माहिती.
7) जातीचा दाखला
8) SC/ST/OBC/अल्पसंख्यांक इत्यादी सारख्या विशेष श्रेणीशी संबंधित असल्याचा पुरावा.
9) बँक खात्याच्या तपशील.
10) मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट.
11) व्यवसायाच्या पत्ता, नोंदणी प्रमाणपत्र, शॉप ॲक्ट लायसन.
12) बँक खात्याला आधार नंबर लिंक असावा.
मुद्रा लोन घेण्यासाथी अर्ज कुठे करायचं (Where to apply for Mudra loan)
मुद्रा लोन घेण्यासाठी दोन पद्धती आहेत एक म्हणजे ऑफलाइन व दुसरी ऑनलाईन. आपल्या पद्धतीने ज्या बँकेत कर्ज घेणार आहात. च्या बँकेत जाऊन मुद्रा लोन अर्ज करायचे आहे. त्यानंतर अर्जसोबत आवश्यक कागदपत्रे बँकेत जमा करावे लागतील. आणि कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर मुद्रा लोन एक महिन्यात बँक खात्यात जमा होते. तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ज्या बँकेत कर्ज घेणार आहात त्या बँकेची अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. अर्जासोबत लागणारे कागदपत्रे सबमिट करायची आहेत. त्यानंतर कागदपत्रे पडताळणीनंतर मुद्रा लोन बँक खात्यात जमा होते.
अधिकृत आणि आधिक माहिती साठी वेबसाइट
मुद्रा लोन योजनेबद्दल तुम्हाला अधिकृत माहिती पाहिजे असेल. तर नक्की फॉर्म भरणे आधी मुद्रा लोन योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तसेच मुद्रा लोन योजनेसाठी ऑफलाइन फॉर्म किंवा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी मुद्रा लोन योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. मुद्रा लोन योजनेची ऑफिशियल वेबसाईट खाली देण्यात आले आहे
अधिकृत वेबसाईट (Official Website) – https://www.mudra.org.in/
मुद्रा लोन देणाऱ्या बँका (Mudra Loan Bank List)
खाली दिलेल्या बँकांमध्ये मुद्रा लोन योजना मार्फत कर्ज देण्यात येते.
1 | बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharatra) |
2 | देना बँक (Dena Bank) |
3 | युनियन बँक (Union Bank) |
4 | एचडीएफसी बँक (HDFC Bank) |
5 | बँक ऑफ इंडिया (Bank Of India) |
6 | स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) |
7 | इंडियन बँक (Indian Bank) |
8 | ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (Oriantal Bank Of India) |
9 | कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) |
10 | युको बँक (Uco Bank) |
11 | कॅनरा बँक (Canara Bank) |
12 | सिटी बँक (City Bank) |
13 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank Of India |
14 | बँक ऑफ बडोदा (Bank Of baroda) |
मुद्रा लोन व्याज दर 2023 (Mudra Loan Interest Rate)
पंजाब नॅशनल बँक (Panjab National Bank) | 8.80% पासून सुरू |
यूनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) | 10.30% पासून सुरू |
सारस्वत बँक (Saraswat Bank) | 11.65% पासून सुरू |
सिटि यूनियन बँक (City Union Bank) | 12.00% ते 12.65% |
स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) | 8.65% ते 16.95% |
बँक ऑफ इंडिया (Bank Of India) | बँक नुसार (MCLR) |
बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra) |
MCLR+BSS+0.75% – MCLR+BSS+2.00% |
बँक ऑफ बरोडा (Bank Off Baroda) | MCLR+SP – MCLR+SP+0.85 |
💡 सूचना : वरती देण्यात आलेले व्याज दर, फी ही बँक आणि आरबीआय (RBI) निच्चीत करते. त्यामुळे याच्यात कधीही बदल होऊ शकतो. तर तुम्ही ज्याही बँकेतून मुद्रा लोण घेत असाल त्याचे सध्या स्थितीचे व्याज दर अधिकृत वेबसाइट वरती जाणून चेक करावे
मुद्रा कार्ड (Mudra Card)
मुद्रा कर्ज मंजूर झाल्यानंतर अर्जदार मुद्रा कार्डचा लाभ घेऊ शकतो. बँकेत अर्जदारासाठी कर्ज खाते ओपन होते आणि निर्धारित रक्कम खात्यात जमा होते. त्यानंतर अर्जदार मुद्रामार्फत रक्कम काढू शकतो. डेबिट कार्ड अर्जदाराच्या क्रेडिट हिस्टरी रेकॉर्ड करिता महत्वाचा आहे.
मुद्रा कर्ज अंतर्गत समाविष्ट क्षेत्रे (Areas covered under Mudra loan)
मुद्रा कर्ज घेण्यासाठी व्यवसायिक महिला, दुकानदार व इतर आर्थिक मदतीसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. कर्जाच्या पैशांनी भांडवल यांनी लागणारी उपकरणे किंवा वाहन सुविधा खरेदी केले जाऊ शकते. त्याचप्रमाणे मुद्रा कर्ज अंतर्गत क्षेत्रे खाली देण्यात आलेले आहेत. अन्न क्षेत्र, व्यापार क्षेत्र, कृषी क्षेत्र, दुकानदार.
महिला उद्योगांसाठी मुद्रा कर्ज योजना (Mudra Loan Scheme for Women Enterprises)
मुद्रा लोन अंतर्गत सरकारने महिलांसाठी जास्त अधिकार दिलेला आहे. महिला रोजगार व व्यवसायावर जास्त सहभाग होतील तेव्हाच महिलांना अधिकार मिळेल. महिलांसाठी सरकारांतर्गत विविध रोजगार कर्ज योजना राबविल्या जातात. त्यानुसार मुद्रा लोन योजना मुख्य योजना आहे. या योजनेमध्ये विशेष गोष्ट म्हणजे योजनांमध्ये 4 जणांना व्यवसायिक मुद्रा कर्ज दिले तर, त्या चार पैकी 3 महिला असतील. मुद्रा कर्ज योजना चालू झाल्यापासून महिलावर्ग व्यवसाय करिता कर्ज घेत आहे.
FAQ. Mudra Loan Yojana Eligibility Interest Rate Documents Online Apply Information In Marathi
Q. मुद्रा योजना कधी सुरू झाली? (Mudra loan yojana kadhi surur zali?)
Ans. 8 एप्रिल 2015 रोजी 20 कोटी रुपये भांडवल असलेली मुद्रा बँकेची स्थापना करण्यात आली.
Q. प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत किती योजना आहेत? (pradhanmantri mudra loan yojna antargat kitit yojana aahet?)
Ans. प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत तीन प्रकारच्या योजना आहेत शिशु वर्ग योजना, किशोर वर्ग योजना, तरुण वर्ग योजना.
Q. मुद्रा कर्जाचे पन्नास हजार ला व्याज किती आहे? (mudra karjache 50 hajar la vyaj kiti aahe?)
Ans. किशोर मुद्रा अंतर्गत 50 हजार ते 5 लाखापर्यंत व्याजदर 8.60 टक्के आहे.
Q. मुद्रा कर्ज ही सरकारी योजना आहे का? (mudra karj hi sarkari yojana aahe ka?)
Ans. मुद्रा कर्ज ही प्रधानमंत्री मुद्रा योजना भारत सरकारची योजना आहे.
Q. मुद्रा कर्ज न भरल्यास काय होईल? (mudra karj n bharlyas kay hoil?)
Ans. मुद्रा कर्ज अर्जदाराने न भरल्यास सरकारकडून कारवाई करण्यात येते. तारण म्हणून दिलेल्या कोणत्याही मालमत्ता जप्त केली जाते.
Q. मुद्रा कोणाच्या मालकीची आहे? (mudra komachya malakichi aahe?)
Ans. मुद्रा लोन योजना ही भारत सरकार मार्फत मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड स्थापना केलेली होती. त्यानंतर स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मालकीची आहे. कारण 100 टक्के भांडवल चे योगदान दिलेले आहे.
Q. महिलांसाठी मुद्रा कर्ज सबसिडी काय आहे? (mahilansathi mudra karj subsidy kay aahe?)
Ans. ज्या महिला उद्योगासाठी 10 लाखापर्यंत लहान व्यवसाय साठी किंवा सूक्ष्म उद्योग करण्यासाठी सबसिडी दिली जाते.
Q. मुद्रा कार्ड कोणत्या बँकेने सुरू केले? (mudra card kontya bankene suru kele?)
Ans. कॉर्पोरेशन बँक ने जुलै 2015 मध्ये मंगलुरु येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना मार्फत लघुउद्योगांसाठी पहिले मुद्रा कार्ड लॉन्च करण्यात आले.