PM Kusum Solar Pump Yojana 2023 Maharashtra Documents Application Form Last Date

पीएम कुसुम सोलर पंप योजना 2023 अर्ज कागदपत्रे सविस्तर माहिती | PM Kusum Solar Pump Yojana 2023 Maharashtra Documents Application Form Last Date

4.2/5 - (192 votes)

PM Kusum Solar Pump Yojana 2023 Maharashtra Documents Application Form Last Date नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्वाची योजना म्हणजेच पीएम कुसुम सोलर पंप योजना. PM Solar Pump Yojana  योजनेबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. कुसुम सोलर पंप योजना काय आहे तसेच पीएम कुसुम सोलर पंप योजनेचे फायदे, पीएम कुसुम सोलर पंप योजनेसाठी पात्रता, पीएम कुसुम सोलर पंप योजनेसाठी लागणारी कागपत्रे, पीएम कुसुम सोलर पंप योजना अर्ज कसा करावा, पीएम कुसुम सोलर पंप योजना अधिकृत वेबसाईट, पीएम कुसुम सोलर पंप योजना अर्ज फी, पीएम कुसुम सोलर पंप योजनेसाठी अनुदान किती, पीएम कुसुम सोलर पंप योजना अर्जाची यादी कशी तपासायची, पीएम कुसुम सोलर पंप योजना हेल्पलाइन नंबर ही सर्व सविस्तर तुम्हाला सोप्या भाषेत या लेखामार्फत देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र म्हणजे काय?

भारतात अजून पण असे काही पाडे आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज पोहचू शकत नसल्या कारणाने शेतकरी बांधवांचा शेतातील पिकांना पाणी देण्याकरिता अनेक अडचडींना सामोरे जावे लागते. अश्या अनेकप्रकारचा कारणांमुळे शेतकरी बांधवांचा शेतातील उत्पन्न पाहिजे तेवडे निघत नसल्यामुळे शेतकरी बांधव कर्जबाजारी होतो या सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकरी बांधवांकरिता महत्वाची योजना राबवली आहे. ती योजना म्हणजेच PM पीएम कुसुम सोलर पंप योजना. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना सोलर कृषी पंप मिळणार आहेत. Solar Pump साह्याने शेतकरी बांधव वीज (Light) नसतांनाही त्यांचा शेतातील पिकांना पाणी देऊ शकणार आहे. PM Solar Pump Yojana मुळे शेतकरी बांधवांना खूप मोठी मदत मिळणार आहे.

 

कुसुम सोलर पंप योजनेचे फायदे 

1) या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना अतिशय कमी खर्चात सोलर पंप मिळणार आहे. 
2) या योजनेअंतर्गत 10 लाखापेक्षा जास्त सोलर पंपाचे सौरिकरण केले जाणार आहे.
3) या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त वीज निर्मिती होणार आहे.
4) या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवाला सोलर पंप बसवण्याकरिता 60% टक्के आर्थिक मदत शासनाकडून देण्यात येणार आहे.
5) या योजनेअंतर्गत 30% टक्के आर्थिक मदत बँके कडून दिले जाणार आहे.
6) या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना फक्त 10% टक्के रक्कम भरायची आहे.
7) या योजनेअंतर्गत ज्या राज्यांमध्ये कमी पाऊस आहे किंवा सिंचनासाठी पुरेशी वीज उपलब्ध नाही आहे तिथे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे
8) सोलर प्लांट बसवल्यानंतर 24 तास विज उपलब्ध होणार असून, त्यामुळे शेतातील पिकांना पाहिजे तेव्हा पाणी देऊ शकता.
9) सोलर प्लांटची वीज शेतकरी बांधव त्यांच्या इच्छेनुसार सरकारी किंवा खाजगी विज विभागाला विकू शकतो.

 

बांधकाम कामगार योजना संपूर्ण माहिती

 

पीएम कुसुम सोलर पंप योजनेसाठी पात्रता 

1) पीएम कुसुम योजना अर्ज करणारा शेतकरी भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे.
2) पीएम कुसुम योजना अंतर्गत शेतकरी, शेतकरी गट, सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादन संघटना, पाणी ग्राहक संघटना इत्यादींना लाभ मिळणार आहे.
3) पीएम कुसुम योजना अंतर्गत प्रति मेघावॅटनुसार शेतकरी बांधवांकडे 2 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
4) शेतकरी बांधवाकडे लागणारे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

 

पीएम कुसुम सोलर पंप योजनेसाठी लागणारी कागपत्रे 

1) आधार कार्ड
2) जातीचा दाखला
3) बँक पासबुक
4) पासपोर्ट आकाराचे फोटो
5) सातबारा उतारा (त्यावर विहिरीची किंवा बोरची नोंद आवश्यक आहे)
6) सामायिक सातबारा असेल तर, 200 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर भोगवटदराचे ना हरकत प्रमाणपत्र 

 

ग्रामपंचायत घरकुल यादी अशी पहा मोबाईल मध्ये

 

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अर्ज कसा करावा (Online Form)

1) पीएम कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज करण्याकरिता योजनेची अधिकृत वेबसाईटवर जाऊन भेट द्यावी लागेल.
2) अधिकृत विषय ओपन झाल्यावर मुख्यपृष्ठावर तुम्हाला कुसुम योजनेसाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
3) त्यानंतर अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल.
4) त्यानंतर त्या अर्जावर विचारली जाणारी महत्त्वाची माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.
5) त
6) अर्जामध्ये माहिती भरल्यानंतर समीर पटनावर क्लिक करायचे आहे.
7) अशा पद्धतीने तुम्ही पीएम कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत अर्ज करू शकता.

 

कुसुम सोलर पंप योजना अधिकृत वेबसाईट 

PM KUSUM (MNRE) अधिकृत वेबसाईट https://pmkusum.mnre.gov.in

 

आयुष्मान भारत कार्ड डाऊनलोड करा मोबाईल मध्ये

 

PM कुसुम सोलर पंप योजना अर्ज फी 

शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करण्याकरिता फी 5000/- रू. प्रती मेगावॅट दराने अर्ज फी आणि GST भरावा लागतो. अर्ज फी राजस्थान रिन्यूएबल एनर्जी कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या नावाने डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात देण्यात येते. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याकरिता फी वॅटनुसार आकारली जाते.

1) अर्ज फी 2500+GST – 0.5 मेगावॅट
2) अर्ज फी 5000+GST – 1 मेगावॅट
3) अर्ज फी 7500+GST – 1.5 मेगावॅट
4) अर्ज फी 10,000+GST – 2 मेगावॅट

 

पीएम कुसुम सोलर पंप योजनेसाठी अनुदान किती 

या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकरी मित्रांसाठी मदत करणार आहे.
या योजनेअंतर्गत 90% ते 95% अनुदान आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना 5% ते 10% रक्कम भरावी लागणार आहे.
1) केंद्र सरकार शेतकरी बांधवांना 60% टक्के अनुदान देईल.
2) केंद्र सरकार शेतकरी बांधवांना 30% टक्के कर्ज स्वरूपात देईल.
3) शेतकरी बांधवांना या योजनेसाठी एकूण खर्च फक्त 10% टक्के रक्कम भरावी लागेल.

 

विवाह नोंदणीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

 

PM कुसुम सोलर पंप योजना अर्जाची यादी कशी तपासायची 

या योजनेअंतर्गत निवडलेल्या शेतकऱ्यांचे नाव पाण्याकरिता सर्वात आधी, तुम्हाला पीएम कुसुम सोलर पंप योजना अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल. त्यानंतर कुसुम नोंदणीकृत कर्जाची यादी या पर्यायावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर योजनेसाठी निवडलेल्या शेतकऱ्यांची यादी तुमच्यासमोर ओपन होईल. आणि या यादीतील कोणत्याही व्यक्तीचे नाव शोधू शकता.

 

पीएम कुसुम सोलर पंप योजना हेल्पलाइन नंबर –

या योजनेअंतर्गत तुम्हाला कोणतेही अडचण येत असेल किंवा माहिती हवी असेल त्याकरिता योजनेच्या हेल्पलाइन नंबर वर संपर्क करू शकता.

संपर्क क्रमांक 011-243600707, 011-24360404
टोल फ्री क्रमांक 18001803333

 

ग्रामपंचायत पैसा कुठे खर्च होतो पहा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

FAQ.PM Kusum Solar Pump Yojana 2023 Maharashtra Documents Application Form Last Date

Q. कुसुम सोलर पंप योजनेसाठी कोण पात्र आहे?
Ans. कुसुम योजनेसाठी पात्र उमेदवार शेतकरी, शेतकऱ्यांच्या गट व शेतकरी उत्पादक संघटना.
Q. कुसुम सोलर पंप योजना म्हणजे काय?
Ans. ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना असून, या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना अनुदानावर सौ रुपये दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाला बिना लाईट पाणी सौर पंप द्वारे देऊ शकता.
Q. महाराष्ट्रात पीएम कुसुम योजना आहे का?
Ans. या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे ज्या ठिकाणी वीज पोचू शकत नाही त्यांच्याकरिता कुसुम सोलर पंप योजना राबविण्यात आली आहे या योजनेमार्फत प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90% टक्के अनुदान व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी 95% टक्के अनुदान मिळते.
Q. कुसुम सोलर पंप योजना चालू आहे का?
Ans. हो. 17 मे 2023 पासून सुरू करण्यात येत आहे.
Q. पी एम कुसुम सोलर पंप योजनेसाठी किती जमिनीची आवश्यकता आहे?
Ans. या योजनेअंतर्गत कमीत कमी मेगावॅट नुसार सुमारे 2-2.5 एकर जमिनीची आवश्यकता आहे.
Q. कुसुम सोलर पंप योजना कोणी सुरू केली?
Ans. भारत सरकार
Q. कुसुम सोलर योजना केव्हा सुरू झाली?
Ans. 08 मार्च 2019
Q. कुसुम सोलर योजना विभाग?
Ans. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार
Q. कुसुम सोलर पंप योजनेच्या उद्देश?
Ans. गरजू शेतकऱ्यांना अनुदानित दरात सौर पंप उपलब्ध करून देणे.
Q. सोलर पंप म्हणजे काय?
Ans. सोलर पंप म्हणजे सूर्याच्या उर्जाद्वारे शेतकऱ्यांच्या शेतीतील सिंचनसाठी उपयोगी पडतो.
Q. महाराष्ट्र सौर ऊर्जा ऑनलाईन फॉर्म?
Ans. पीएम कुसुम सोलर योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
Q. सोलर वॉटर पंप चा उपयोग काय?
Ans. शेतातील पिकांना पाणी देण्याकरिता वीज नसेल तरी याचा उपयोग सोलर म्हणजेच सूर्य प्रकाशावर वॉटर पंप चालतो.
Q. सुरज वॉटर पंप किती काळ टिकतात?
Ans. 2 वर्षे ते 4 वर्षे टिकू शकतात.
Q. शेतासाठी कोणते सौर पॅनल सर्वोत्तम आहे?
Ans. मोनोक्रिस्टलाईन पॅनल ज्याला मोनोपॅनल देखील म्हणतात.
Q. सौर पंपाचे दोन प्रकार कोणते आहेत?
Ans. सबमर्सिबल पंप आणि पृष्ठभाग पंप
Q. सौर पंप आणि इलेक्ट्रिक पंप मध्ये काय फरक आहे?
Ans. स्वर पंप डायरेक्ट करंट वर चालतो तर इलेक्ट्रिक पंप विकल्पीय प्रवाहावर चालतो
Q. सौर पॅनल्स संपूर्ण घराला वीज देऊ शकते का?
Ans. हो.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top