MIDC भरती 2023 महाराष्ट्र शिक्षण पात्रता | MIDC Bharti 2023 Maharashtra Qualification

शिक्षण पात्रता – MIDC Bharti 2023 Maharashtra Qualification

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ(MIDC) भरती 2023 शिक्षण पात्रता खाली दिलेली आहे.

1) क्रियाशील अभियंता (स्थापत्य)
मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराच्या नियुक्तीने.
स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदव्युत्तर पदी पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामासाठी कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव आणि पदवीधारकांसाठी 7 वर्षाचा अनुभव.

 

2) उप अभियंता (स्थापत्य)
मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अहर्ता.
स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामांमधील किमान 3 वर्षाचा अनुभव

 

3) उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी)
मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अहर्ता
यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामांमधील कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव

 

4) सहयोगी रचनाकार
मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्रज्ञ विषयांमधील पदवी किंवा समतुल्य अहर्ता.
नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी ME (town planning) किंवा Industrial Town planning मधील पदवी किंवा पदविका

 

5) उप रचनाकार
मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र विषयातील पदवी किंवा समतुल्य अहर्ता
नगर रचना अथवा तत्सम संबंधीच्या कामा विषयाचा कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव

 

6) उपमुख्य लेखा अधिकारी
मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा परीक्षा उत्तीर्ण
मान्यता प्राप्त विद्यापीठाची वित्तीय व्यवस्थापनातील(MBA) (Finance) कमीत कमी B+ किंवा तत्सम श्रेणी.

 

7) सहाय्यक अभियंता (स्थापत्य) – स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी.

 

8) सहाय्यक अभियंता (वियुत/ यंत्री) – यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकी मधील पदवी.

 

9) सहाय्यक रचनाकार
मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा नगररचना या विषयांमधील पदवी किंवा समतोल्य अहर्ता घेत असणारे उमेदवार.

 

10) सहाय्यक वास्तु – मान्यता प्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्र या विषयातील पदवी

 

11) लेखा अधिकारी – मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.

 

12) क्षेत्र व्यवस्थापन – मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण.

 

13) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अहर्ता.

 

14) कनिष्ठ अभियंता (विद्युत/ यांत्रिकी) – मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण मंडळाची यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तत्सण शैक्षणिक अहर्ता

 

15) लघुलेखक (उच्च श्रेणी)
मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर.
राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची 100 शब्द प्रति मिनिट तसेच इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट व मराठी 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखनाची वेगाची परीक्षा उत्तीर्ण किंवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची 120 शब्द प्रति मिनिट तसेच इंग्रजी टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट व मराठी 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखनाची देवाची परीक्षा उत्तीर्ण.

 

16) लघुलेखक (निम्न श्रेणी)
मान्यता प्राप्त विद्यापीठा चा कोणत्याही शाखेचा पदवीधर.
राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची 80 शब्द प्रति मिनिट व मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण किंवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची 100 शब्द प्रति मिनिट व टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण व मराठी टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण.

 

17) लघुलेखक
मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची 60 शब्द प्रति मिनिट तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाची चाळीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण किंवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची 80 शब्द प्रति मिनिट तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण.

 

18) सहाय्यक
मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
सेवेत दाखल झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत MS – CIT परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

 

19) लिपिक टंकलेखक
मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.
राज्य शासनाची मराठी टंकलेखनाची 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण
MS – CIT परीक्षा उत्तीर्ण.

 

20) वरिष्ठ लेखापाल –  मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य(commerce) शाखेची पदवी.

 

21) तांत्रिक सहाय्यक (श्रेणी 2)
शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य किंवा यांत्रिकी किंवा विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापत्य किंवा अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक विषयाचा अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण.

 

22) वीजतंत्री (श्रेणी 2)
शालांत परीक्षा उत्तीर्ण व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्युत अभ्यासक्रम पूर्ण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक आहे.

 

23) पंपचालक (श्रेणी 2)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.
शासकीय व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची तार यंत्री या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.

 

24) जोडारी (श्रेणी 2)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.
शासकीय किंवा शासन माननीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची जोडारी अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.

 

25) सहाय्यक आरेखक
महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची विज्ञान विषय घेऊन 12 वी परीक्षा किंवा तत्सम शैक्षणिक अहर्ता तसेच स्थापत्य (अभियांत्रिकी) मधील पदविका किंवा शासकीय अथवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखन या विषयाची प्रमाणपत्र परीक्षा प्रथम श्रेणी उत्तीर्ण.
संगणक प्रणालीतील Auto – CAD प्रणालीचा अभ्यासक्रम पूर्ण.
अनुभवास प्राधान्य.

 

26) अनुरेखक
शासकीय शासन मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील स्थापत्य किंवा विद्युत किंवा यांत्रिकी विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण.
संगणकामधील Auto – CAD अभ्यासक्रम पूर्ण.

 

27) गाळणी निरीक्षक – मान्यता प्राप्त विद्यापीठाची (रसायनशास्त्र या प्रमुख विषयासह) विज्ञान शाखेतील पदवी.

 

28) भूमापक – शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक विषयाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण.
संगणक प्रणालीचा Auto – CAD अभ्यासक्रम पूर्ण.

 

29) विभागीय अग्निशमन अधिकारी
मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथील बॅचलर ऑफ फायर इंजिनियर (बी. ई. फायर) किंवा ॲडव्हान्स डिप्लोमा इन फायर इंजीनियरिंग उत्तीर्ण असावा किंवा मेंबरशिप एक्झामिनेशन (एम. आय.) फायर इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनियर्स (युनायटेड किंग्डम) या संस्थेकडून पदवी प्राप्त केलेली असावी. किंवा मान्यताप्राप्त संस्थेची बॅचलर ऑफ फायर इंजीनियरिंग (बी. ई. फायर), बी. ई.सिव्हिल,इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, केमिकल, कॉम्प्युटर, यापैकी कोणतीही एक पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अनुभव –
उमेदवारांना शासकीय संस्थेमधील इतर अग्निशमन सेवेतील मुख्य अग्निशमन अधिकारी किंवा सहमुखी अग्निशमन अधिकारी या पदावर काम केल्याचा अनुभव असणे. आणि नियंत्रणाखाली कमीत कमी 300 अग्निशमन कर्मचाऱ्यांनी कार्य केलेले असावे.
किमान 10 अग्निशमन केंद्र व 30 अग्नि वाहने ज्यामध्ये रुग्णवाहिका, रेस्क्यू वाहन, विशेष कार्य हेतू वाहन व हायड्रोलिक प्लॅटफॉर्म इत्यादींचा समावेश असणाऱ्या अग्निशमन सेवेत कामाचा अनुभव आवश्यक.
उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. मराठी व इंग्रजी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
पाठ्यक्रम –
उमेदवारांची महामंडळाच्या अग्निशमन विभागात नियुक्ती झाल्यानंतर त्यांना राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर, गृह मंत्रालय, भारत सरकार यांचे कडून प्रवेश मिळणाऱ्या प्रक्रियेस अधीन राहून बॅचलर ऑफ फायरिंग इंजीनियरिंग (बी .ई. फायर) किंवा ॲडव्हान्स डिप्लोमा इन फायर इंजीनियरिंग 3 वर्षाच्या कालावधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे बंधनकारक राहील. सदर पाठ्यक्रम विहित कालावधीत यशस्वीरित्या पूर्ण न केल्यास उमेदवार अग्निशमन विभागातील सेवेमधून कार्यमुक्त केला जाण्यास पात्र ठरेल.

शारीरिक पात्रता –
पुरुष –
उंची 165 सेमी
छाती 81 सेमी, फुगवून 86 सेमी
वजन 50 किलो ग्रॅम
दृष्टी सामान्य (विना चष्म्याने दृष्टी 6/6 तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली ) वर्णांधता आजारापासून मुक्त असावे.
महिला –
उंची 157 सेमी
वजन 46 किलो ग्रॅम
दृष्टी सामान्य (विना चष्म्याने दृष्टी 6/6 तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली ) वर्णांधता आजारापासून मुक्त असावे.

 

30) सहाय्यक अग्निशमन अधिकारी
BSc भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र विषय घेऊन किमान 50% मार्कांनी उत्तीर्ण असावा किंवा BSc IT किमान 50 टक्के मार्क किंवा BE civil,इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, केमिकल, यामधील कोणतीही एक पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचा सिविल इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, केमिकल यामधील कोणताही एक पदविका परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
व्यवसायिक पाठ्यक्रम –
उमेदवारांची नियुक्ती पदविका किंवा इतर पदवीच्या आधारे झाल्यास त्यांना राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर गृह मंत्रालय भारत सरकार अथवा राज्य अग्निशमन अकॅडमी महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्रवेश मिळण्याच्या प्रक्रियेत अधीन राहून सब ऑफिसर्स पाठ्यक्रम 3 वर्षाच्या कालावधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे बंधनकारक राहील.सदर पाठ्यक्रम उमेदवारांनी विहित कालावधीत यशस्वीरित्या पूर्ण न केल्यास उमेदवार अग्निशमन विभागातील सेवेमधून कार्यमुक्त केला जाण्यास पात्र ठरेल. किंवागृहमंत्रालय भारत सरकार यांच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांचा सब ऑफिसर्स अथवा राज्य अग्निशमन अकॅडमी महाराष्ट्र राज्य यांचा सर्व ऑफिसर्स पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा.
MS – CIT परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.

शारीरिक पात्रता –
पुरुष –
उंची 165 सेमी
छाती 81 सेमी, फुगवून 86 सेमी
वजन 50 किलो ग्रॅम
दृष्टी सामान्य (विना चष्म्याने दृष्टी 6/6 तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली ) वर्णांधता आजारापासून मुक्त असावे.
महिला –
उंची 157 सेमी
वजन 46 किलो ग्रॅम
दृष्टी सामान्य (विना चष्म्याने दृष्टी 6/6 तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली ) वर्णांधता आजारापासून मुक्त असावे.

 

31) कनिष्ठ संचार अधिकारी
बी. ई. (इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन) किंवा बी. ई. (इलेक्ट्रॉनिक आणि रेडिओ कम्युनिकेशन)किंवा बी. ई. कॉम्प्युटर (कम्युनिकेशन सह) किंवा बी. ई. रेडिओ इंजीनियरिंग किंवा बी. ई. इन्सट्रूमेंटेशन किंवा एम एस सी इन्सट्रूमेंटेशन किंवा
डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ इंजिनिअरिंग प्रथम श्रेणी उत्तीर्ण असावा.
अनुभव – 1 गट
अभियांत्रिकी पदवीधारक उमेदवारास पोलीस, संरक्षण दल, एअरपोर्ट ॲथॉरिटी, महानगरांच्या अग्निशमन सेवा यासारख्या मोठ्या संस्थांच्या रेडिओ ट्रेकिंग तात्रा व मल्टिपल चॅनेल कम्युनिकेशन प्रणाली हाताळण्याचा अनुभव आवश्यक. अद्यावत नियंत्रण कक्ष, प्रादेशिक नियंत्रण व रिस्पॉन्स सेंटर जीपीएस (जी आय एस बेस्ड), व्हेईकल ट्रेकिंग व पश्चिम सिस्टीम उभारण्यासाठी सक्षम असावी. उपरोक्त नमूद केलेल्या संस्थांमध्ये प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

अनुभव – 2 गट
अभियांत्रिकी पदवीधारक उमेदवारास पोलीस, संरक्षण दल, एअरपोर्ट ॲथॉरिटी, महानगरांच्या अग्निशमन सेवा यासारख्या मोठ्या संस्थांच्या रेडिओ ट्रेकिंग तात्रा व मल्टिपल चॅनेल कम्युनिकेशन प्रणाली हाताळण्याचा अनुभव आवश्यक. अद्यावत नियंत्रण कक्ष, प्रादेशिक नियंत्रण व रिस्पॉन्स सेंटर जीपीएस (जी आय एस बेस्ड), व्हेईकल ट्रेकिंग व पश्चिम सिस्टीम उभारण्यासाठी सक्षम असावी. उपरोक्त नमूद केलेल्या संस्थांमध्ये प्रत्यक्ष कामाचा 5 ते 7 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
महत्वाची टीप
उपरोक्त 1 गटासाठी आवश्यक असणारी पात्रता व अनुभव पात्र उमेदवार झाले नाहीत तरच 2 गटासाठी पात्र उमेदवाराचा निवडीसाठी विचार केला जाईल.
MS- CIT परीक्षा किंवा समक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.
उमेदवारांना मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता –
पुरुष –
उंची 165 सेमी
छाती 81 सेमी, फुगवून 86 सेमी
वजन 50 किलो ग्रॅम
दृष्टी सामान्य (विना चष्म्याने दृष्टी 6/6 तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली ) वर्णांधता आजारापासून मुक्त असावे.
महिला –
उंची 157 सेमी
वजन 46 किलो ग्रॅम
दृष्टी सामान्य (विना चष्म्याने दृष्टी 6/6 तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली ) वर्णांधता आजारापासून मुक्त असावे.

 

32) वीजतंत्री (श्रेणी 2) (ऑटोमोबाईल)  –  माध्यमिक शालांत परीक्षा SSC उत्तीर्ण शासन माननीय संस्थेचा ऑटो इलेक्ट्रिशियन कोर्स पूर्ण केलेला असावा.

शारीरिक पात्रता –
पुरुष –
उंची 165 सेमी
छाती 81 सेमी, फुगवून 86 सेमी
वजन 50 किलो ग्रॅम
दृष्टी सामान्य (विना चष्म्याने दृष्टी 6/6 तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली ) वर्णांधता आजारापासून मुक्त असावे.
महिला –
उंची 157 सेमी
वजन 46 किलो ग्रॅम
दृष्टी सामान्य (विना चष्म्याने दृष्टी 6/6 तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली ) वर्णांधता आजारापासून मुक्त असावे.

 

33) चालक तंत्र चालक – माध्यमिक शालांत परीक्षा SSC उत्तीर्ण, वाहन चालक या पदावर 3 वर्ष कामाचा केलेला अनुभव असणे आवश्यक, वैध वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
पाठ्यक्रम –
उमेदवारांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना राज्य अग्निशमन परीक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा चालक यंत्र चालकाचा कोर्स पूर्ण केला नसेल तर त्या सदर प्रशिक्षण केंद्राच्या 6 महिन्याचा अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे.
चे उमेदवार सदरचा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करत नाही तोपर्यंत त्यांचा सेवेचा कालावधी हा परिविक्षाधीन कालावधी समजण्यात येईल.

शारीरिक पात्रता –
पुरुष –
उंची 165 सेमी
छाती 81 सेमी, फुगवून 86 सेमी
वजन 50 किलो ग्रॅम
दृष्टी सामान्य (विना चष्म्याने दृष्टी 6/6 तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली ) वर्णांधता आजारापासून मुक्त असावे.
महिला –
उंची 157 सेमी
वजन 46 किलो ग्रॅम
दृष्टी सामान्य (विना चष्म्याने दृष्टी 6/6 तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली ) वर्णांधता आजारापासून मुक्त असावे.

 

34) अग्निशमन विमोचाक 

माध्यमिक शाळांत परीक्षा SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.एम एस सी आय टी परीक्षा किंवा सम कक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे मराठी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता –
पुरुष –
उंची 165 सेमी
छाती 81 सेमी, फुगवून 86 सेमी
वजन 50 किलो ग्रॅम
दृष्टी सामान्य (विना चष्म्याने दृष्टी 6/6 तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली ) वर्णांधता आजारापासून मुक्त असावे.
महिला –
उंची 157 सेमी
वजन 46 किलो ग्रॅम
दृष्टी सामान्य (विना चष्म्याने दृष्टी 6/6 तसेच Ishihara Chart नुसार रंगदृष्टी चांगली ) वर्णांधता आजारापासून मुक्त असावे.

Scroll to Top