mukhyamantri saur krushi pump

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 नवीन सुरू | Mukhyamatri Saur Krushi Pump Yojana 2023 in Marathi

1.5/5 - (2 votes)

Mukhyamatri Saur Krushi Pump Yojana 2023 in Marathi – मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023. त्यालाच मुख्यमंत्री सोलर पंप योजना असे सुद्धा म्हटले जाते. तर मुख्यमंत्री सोलर पंप योजना पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. याबद्दलचा कालच नवीन अधिकृत शासन निर्णय सुद्धा आलेला आहे. तर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी आवश्यक असलेले कागदपत्रे कोणती. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आलेला नवीन अधिकृत शासन निर्णयात काय माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सौर पंप योजनेसाठी कोणते शेतकरी अर्ज करू शकता अशी सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 संपूर्ण माहिती

Mukhyamatri Saur Krushi Pump Yojana 2023 – शेतकरी बंधूंनो सौर कृषी पंप योजना अंतर्गत 2 लाख सोलर पंप मंजूर करण्यात आलेले आहेत. त्याच्यातून आता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत 1 लाख सोलर पंप वाटप करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री सोलर पंप योजना ही नव्याने सुरू करण्यात आलेली आहे. याचा परिणाम कुसुम सोलर पंप योजनेवर (Kusum Solar Pump Yojana) पडणार आहे. मुख्यमंत्री सोलर पंप योजना नव्याने निघाल्यामुळे या योजनेअंतर्गत 1 लाख सोलर पंप वाटप केले जाणार आहे. तर आधीपासून निघालेली कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत 1 लाख सोलर पंप वाटप केले जाणार आहेत. असे दोघं योजनांचे 2 लाख सोलर पंप सौर कृषी पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आहेत.


Mukhyamatri Saur Krushi Pump Yojana 2023 GR

सौर पंप योजनेअंतर्गत आलेला शासनाचा अधिकृत शासन निर्णय देण्यात आलेली माहिती अशी आहे. प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान कुसुम सौर पंप योजना अंतर्गत. पारेषण विरहित सौर कृषी पंप आस्थापित करण्याबाबतच्या घटक ब (Componant B) अंतर्गत. ऑगस्ट 2022 अखेर महाराष्ट्राला मंजूर करण्यात आलेल्या. एकुण 2,00,000 पारेषण विरहित सौर कृषी पंप पैकी केंद्र शासनाने नव्याने मंजूर केलेल्या 1,00,000 पारेषण विरहित सौर कृषी पंप टेस्ट नोडल एजन्सी (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण) मार्फत महावितरण कंपनीकडून राज्यातील मागणी नोंदविलेल्या प्रलंबित कृषी पंप विद्युत जोडण्याच्या पूर्ततेसाठी (Paid Pending) आस्थापित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. अशी माहिती कृषी सोलर पंप योजनेच्या नवीन आलेल्या अधिकृत जीआर मध्ये देण्यात आलेले आहे.


मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे लिस्ट

Solar Krushi Pump Yojana Documents List 2023
1) 7/12 उतारा व 8अ (खाते उतारा)

2) आधार कार्ड

3) बँक पासबुक झेरॉक्स / कॅन्सल चेक

4) पासपोर्ट आकाराचा फोटो

5) पाण्याची मोटर विहीर किंवा शेती सामायिक असल्यास भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र आवश्यक.

6) ओपनलिका शेतात असल्यास सातबारा उताऱ्यावर नोंद असणे आवश्यक.


सौर कृषी पंप मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी

सौर कृषी पंप मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना त्याची विक्री करता येणार नाही.
अशी विक्री केल्यास निदर्शनास आल्यास त्या लाभार्थ्यावर गुन्हा नोंदविण्यात येईल.
सौर कृषी पंप मिळाल्यानंतर त्याची विक्री केल्यास किंवा आढळून आल्यास पुढे त्याला भरत्याला राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही.


मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना फार्म कसा भरायचा

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा फॉर्म असून सुरू झालेला नाही. लवकरच यासाठी महा ऊर्जामार्फत पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. नवीन सुरू झालेल्या या पोर्टलच्या माध्यमाने इच्छुक असलेले उमेदवार मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजना अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. लवकरच राज्यात सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी टेस्ट नोडल एजन्सी द्वारे पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सोलर पंप योजनेअंतर्गत ऑनलाइन फॉर्म लवकरच सुरू होणार आहेत. ऑनलाइन फॉर्म सुरु झाल्यानंतर लवकरच तुम्हाला कळविण्यात येईल.


FAQ : Mukhya Mantri Solar Krushi Pump Yojana 2023


Q: मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजना काय आहे?
Ans: मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना चा उद्देश असा आहे की ज्या शेतकऱ्यांपर्यंत कारवाहिनीतून वीज पोहोचू शकत नाही अशा सर्व शेतकऱ्यांना 1 लाख सोलर पंप योजनेअंतर्गत पुरवले जाणार आहेत.

Q: मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 कोणत्या राज्यासाठी आहे?
Ans: ही योजना महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आली असल्यामुळे फक्त महाराष्ट्रासाठी आहे.

Q: Mukhyamatri Solar Pump Yojana Maharashtra?
Ans: कुसुम सोलर पंप योजने सारखीच महाराष्ट्र सरकारने नवीन चालू केलेली मुख्यमंत्री सोलर पंप योजना आहे.

Q: Mukhyamatri Solar Pump Yojana Maharashtra Online Application Form Date?
Ans: मुख्यमंत्री सोलर पंप योजना अंतर्गत ऑनलाइन फॉर्म लवकरच सुरू होणार आहेत याच्यासाठी नव्याने पोर्टल तयार करण्याचे काम सुरू आहे.

Q: Mukhyamatri Solar Pump Yojana 2023 Registration?
Ans: मुख्यमंत्री सोलर पंप योजनेचे रजिस्ट्रेशन अजून सुरू झालेले नाहीत.

 

⬇️ GR शासन निर्णय डाउनलोड करा 👉 येथे क्लिक करा

 💡  हे पण वाचा : रेशकार्ड मध्ये कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव कसे टाकायचे

मित्रांना शेअर करा
Scroll to Top