One Nation One Ration Free Ration Scheme 2023

रेशनची नवीन योजना सुरू देशात कुठेही घेऊ शकता रेशन 1 वर्ष फ्री रेशन मिळेल | One Nation One Ration Free Ration Scheme 2023

1.2/5 - (4 votes)

One Nation One Ration Free Ration Scheme 2023 – केंद्र सरकार एक जानेवारी 2023 पासून नवीन एकात्मिक अन्नसुरक्षा योजनेचा प्रारंभ करणार आहे. त्याचबरोबर पुढील एका वर्षासाठी सर्व देशवासीयांना फ्री मध्ये रेशन वाटप केले जाणार आहे. एक जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत या योजनेचा कालावधी असणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा अंतर्गत 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे. एका वर्षासाठी मोफत अन्नधान्य पुरवठा वाटप योजनेअंतर्गत केंद्र सरकार एका वर्षासाठी दोन लाख कोटी रुपये खर्च करणार आहे अशी माहिती पियुष गोयल यांनी दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

One Nation One Ration Free Ration Scheme 2023 | नवीन एकात्मिक योजना 2023

केंद्र सरकारने रेशन बाबतचा सर्वात मोठा नवीन निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार नवीन एकात्मिक योजनेअंतर्गत दोन अनुदान योजना समाविष्ट केल्या जात आहेत. 2023 या वर्षासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदे अंतर्गत 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवण्याची नवीन योजना. तसेच गरीब आणि दुर्बल गटातल्या लोकांसाठी अन्नधान्याची सुलभता ही माहिती दार दर आणि उपलब्धतेच्या बाबतीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2023 च्या तरतुदी मजबूत करण्यासाठी नवीन योजना.

केंद्र सरकारच्या नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजनेचा प्रारंभ एक जानेवारी 2023 पासून सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने घेतलेल्या नियमानुसार, नवीन योजना 2023 या वर्षासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यात अंतर्गत 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवले जाणार आहे. ही योजना राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची प्रभावी आणि एकसमान अंमलबजावणी सुनिश्चित करणार आहे

 ➡ नवीन एकात्मिक योजनेचे अधिकृत प्रसिद्धी पत्रक पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा


देशातून कुठूनही घेऊ शकता रेशन | One Nation One Ration Yojana 2023

केंद्र सरकारने मागे वन नेशन वन रेशन हे धोरण जारी केलेले होते. म्हणजेच देशातील कुठलाही राज्याचा रहिवासी देशातील कोणत्याही राज्यातून व गावातून रेशन घेऊ शकतो. जेणेकरून सरकारच्या अन्नपुरवठा योजनेतून तो वंचित राहणार नाही. याचीच अंमलबजावणी करताना केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत समाविष्ट असलेल्या 81.35 कोटी लोकांसाठी मंत्रिमंडळाने एक राष्ट्र एक किंमत एक रेषा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवीन केंद्रीय क्षेत्र योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मोफत अन्नधान्य एकाच वेळी देशभरात वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत. पोर्टेबिलिटी ची एकसमान अंमलबजावणी सुनिश्चित करणे. आणि हा निवड आधारित मंच अधिक बळकट करणे. केंद्र सरकार 2023 वर्षासाठी दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त अन्न अनुदानाचा भार उचलणार आहे. one ration one nation yojana 2023


एका वर्ष साठी फ्री रेशन मिळेल | Ration Scheme 2023 For 1 Year

केंद्र सरकारने अन्नसुरक्षा महामंडळाच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुढील एका वर्षासाठी रेशन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या सचिवांनी 29 डिसेंबर 2022 रोजी सर्व राज्याच्या खाद्य सचिवांसोबत बैठक घेतली होती. तांत्रिक ठरावासह मोफत धान्य वाटपाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी एक जानेवारी 2023 पासून मोफत अन्नधान्य योजना लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. एक जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी अन्नधान्याची शून्य किंमत दर्शविणारी सुधारित अनुसूची अधिसूचना 31 डिसेंबर 2022 रोजी जारी करण्यात आली आहे. तर आता पुढील एका वर्षासाठी पात्र असलेल्या रेशन कार्ड धारकांना अन्नधान्य पुरवठा मोफत केला जाणार आहे. free ration yojana 2023

 ➡ फ्री रेशन योजनेचे अधिकृत प्रसिद्धी पत्रक पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

 

 ➡ नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान मिळणार : येथे लिक्क करा

मित्रांना शेअर करा
Scroll to Top