Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना हप्ता कधी येणार | Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana

2.9/5 - (164 votes)

Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana – नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेली योजना म्हणजेच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना काय आहे तसेच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभ कोणाला मिळणार, Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana शासन निर्णय, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना पात्रता, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना हप्ता कधी पडणार याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला या लेखामार्फत सोप्या आणि सरळ भाषेत मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्षी 6 हजार रुपये आर्थिक मदत मिळत होती. ही आर्थिक मदत दर 4 महिन्याच्या अंतरावर 2 हजार रुपये आर्थिक मदत म्हणून हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा केला जात होता. परंतु आता अजून राज्य शासनाच्या नवीन योजनेअंतर्गत 6 हजार रुपये शेतकरी बांधवांना मिळणार आहेत. म्हणजेच याचा आधी केंद्र शासनाने पी एम किसान योजनेअंतर्गत 6 हजार रुपये शेतकऱ्यांना आर्थिक मदत देत होते आणि आता राज्य शासनामार्फत 6 हजार रुपये शेतकरी बांधवांना कुटुंबासाठी आर्थिक मदत म्हणून मिळणार आहेत त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना दरवर्षी 12 हजार रुपये मिळणार आहेत.

 

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना बद्दल माहिती

योजना नाव Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana
कोणी सुरू केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
लाभ कोणाला मिळेल महाराष्ट्र राज्याचे शेतकरी
राज्य महाराष्ट्र
आर्थिक लाभ 6,000 रु
चालू होणाचे वर्ष 2023
उद्देश शेतकर्‍यांना आर्थिक मदत
अर्ज करण्याची पद्धत अजून उपलब्ध नाही
अधिकृत वेबसाइट चालू झाली नाही
आधिक योजना पहा येथे क्लिक करा

 

पीक विमा काढण्याचे फायदे

 

Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana मंजुरी

शेतकरी मित्रांनो माननीय वित्तमंत्री महोदय सन 2023,2024 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अन्नदाता शेतकरी बांधवांकरिता उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनात राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महा सन्मान निधी ही योजना राबवण्याबाबतची घोषणा केलेली आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना महाराष्ट्र राज्यात राबविण्याबाबतच्या प्रस्ताव दिनांक 30 मे 2023 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

 

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ कोणाला मिळणार

शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभ घेण्याकरिता ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांनाचनमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या योजनेच्या लाभ मिळणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार जेवढी आर्थिक मदत शेतकऱ्यांना देत होते, तेवढीच आर्थिक मदत राज्य सरकार देणार आहे.

 

ई पीक पाहणी कशी करायची

 

Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana शासन निर्णय

शेतकरी मित्रांनो सन 2023,2024 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित करण्यात आले आहे की, शेतकरी बांधवांना उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनात राज्य शासन अनुदानाची भर घालणारी योजना म्हणजेच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सन 2023,2024 पासून राबवण्याची मान्यता देण्यात आली आहे.

 

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना पात्रता

शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची पात्रता खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
1) सदर योजने करिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना म्हणून गृहित करण्यात येणार आहेत.
2) प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत पीएम किसान पोर्टल वर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निक्षानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहणार आहेत.
3) केंद्र शासनाने लाभार्थी पात्रतेबाबत वेळोवेळी निकषांमध्ये केलेले बदल तात्काळ परिणामाने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना देखील लागू होतील.
4) पी एम किसान पोर्टलवर नवीन नोंदणी होऊन मिळालेले पात्र लाभार्थी देखील या योजनेचे लाभार्थी राहतील.

 

किसान क्रेडिट कार्ड कसे काढायचे

 

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना हप्ता कधी येणार

शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत केंद्र शासनाच्या योजनेनुसार खालील प्रमाणे लाभपात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर थेट हस्त्तांतरणाद्वारे आयुक्त कृषी अधिकारी यांच्या मार्फत देण्यात येणार आहेत.

पहिला हप्ता एप्रिल ते जुलै 2000/-
दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर 2000/-
तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च 2000/-


नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाल्यास करावयाची वसुली

शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने अंतर्गत अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेच्या लाभ घेतला तर, सदर लाभ धारकाकडून करण्यात येणारी वसुली महसूल यंत्रणेमार्फत करण्यात येईल आणि आयुक्त कृषी अधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे जमा करण्यात येईल.

 

बांधकाम कामगार पेटी योजना असा मिळवा लाभ

 

FAQ. Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana Kay Aahe, Hapta Kadhi Yenar


Q. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना कोणामार्फत सुरू करण्यात आली?
Ans. ही योजना राज्य सरकार मार्फत सुरू करण्यात आली.

Q. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना कधी सुरू करण्यात आली?
Ans. 30 मे 2023 रोजी.

Q. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने मार्फत किती पैसे मिळतील?
Ans. वर्षाला 6000 हजार रु.

Q. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ कोणाला घेता येईल?
Ans. जे शेतकरी पीएम किसान अंतर्गत लाभ घेत आहेत, तेच शेतकरी या योजनेच्या लाभ घेऊ शकता.

Q. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेमार्फत पैसे कुठे मिळतील?
Ans. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होईल.

Q. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक मदत कशी मिळणार आहे?
Ans. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्या तीन समान हप्त्यांमध्ये रक्कम जमा केली जाणार आहे.

Q. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना कोणासाठी आहे?
Ans. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी योजना राबवली जात आहे.

Q. पी एम किसान सन्मान निधी कोणामार्फत मिळते?
Ans. पी एम किसान सन्मान निधी भारत सरकार मार्फत मिळते.

Q. मी माझी किसान सन्मान योजनेची रक्कम कशी तपासू शकतो?
Ans. या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन तिथे तुमच्या मोबाईल नंबर, नोंदणी क्रमांक व आधार कार्ड तपशील देऊन स्थिती तपासू शकत.

Q. पी एम किसान योजनेत किती हप्ते आहेत?
Ans. 2000 हजार रुपयांचे 3 हप्ते आहेत.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top