PM Kisan Yojana 11th installment

PM किसान योजना 11 वा हप्ता या बँक खात्यात जमा झाला चेक करा मोबाईल मधून | PM Kisan Yojana 11th installment Credited in this bank account check

Rate this post

PM Kisan Yojana 11th installment : PM Kisan योजनेचा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात 31 मे 2022 पासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. खूप साऱ्या शेतकऱ्यांना हा 11 वा हप्ता मिळाला आहे. पण खूप सारे असे शेतकरी आहेत की त्यांना वाटत आहे की आम्हाला अजून पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेला नाही. पण शेतकरी बंधूंनो सर्वांना पी एम किसान योजनेचा 11 वा हप्ता मिळाला आहे. पण तू तुमच्या एका बँक खात्यात जमा झाला असेल ते कोणते बँक खाते आहे आणि ते कसे चेक करायचे ते या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. तर मग चला पाहूया. “PM Kisan Yojana 11th installment “

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM किसान 11 वा हप्ता कोणत्या बँक खात्यात गेला

पीएम किसान योजना 11 वा मिळण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना eKYC बंधनकारक करण्यात आली होती. ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजना अंतर्गत केवायसी केली आहे. त्या शेतकऱ्यांचा पी एम किसान योजनेचा 11 वा हप्ता त्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात जमा झाला आहे. पी एम किसान योजना अंतर्गत केवायसी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आधार कार्ड नंबर वरती पैसे येणार होते. शेतकऱ्यांच्या आधार कार्ड ला जी बँक खाते लिंक असेल त्या बँक खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. शेतकरी बंधूंनो खूप सार्‍या शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम होता की त्यांचा बँक अकाउंट नंबर चुकल्यामुळे पैसे जमा होत नव्हते. मग शेतकऱ्यांचा हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मोदी सरकारने पी एम किसान योजना अंतर्गत केवायसी करायला सांगितले. केवायसी केल्यामुळे शेतकऱ्यांचा हा फायदा झाला की शेतकऱ्यांना हवे असलेल्या बँक खात्यात पैसे मिळू शकतात. त्याच्यासाठी शेतकऱ्यांना बँकेत जाऊन त्यांचे बँक खाते NPCI चा फॉर्म भरून आधार कार्ड ला लिंक करावे लागेल. जे बँक खाते आधार कार्ड लिंक करतील त्याच बँक खात्यात शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे पैसे मिळतील. म्हणजेच आता अकाउंट नंबर चुकण्याचा प्रॉब्लेम होणार नाही आणि शेतकऱ्यांना सुरळीतपणे पी एम किसान योजनेचा लाभ मिळेल.

आधार कार्ड ला कोणते बँक खाते लिंक आहे कसे चेक करायचे येथे क्लिक करा

 

जर का तुमचे बँक खाते आधार कार्ड लिंक नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला ज्या बँक खात्यात पी एम किसान योजनेचे पैसे हवे आहेत ते बँक खाते आधार कार्ड ला लिंक करून घ्या.

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top