आर टी ए ऍडमिशन साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी डाऊनलोड करा मोबाईल मध्ये | RTE Admission Documents List in Marathi Download PDF

RTE Admission Documents List in Marathi Download PDF – आरटीई पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2023 – 2024 साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल. तर ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची गरज भासते. जे तुम्हाला ऑनलाईन करायचे करत असताना लागतात. तसेच तुमच्या प्रवेश अर्जाची निवड झाल्यानंतर. ऍडमिशन घेत असताना जमा करावे लागतात. तर तुम्ही RTE ऍडमिशन साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे अधिकृत यादी खाली डाऊनलोड करू शकता.

 

Importan Documents List To Apply Online 2023-24

  1. आधार कार्ड
  2. जन्म दाखला
  3. जात प्रमाणपत्र
  4. उत्पन्न दाखला
  5. अपंग असल्यास प्रमाणपत्र
  6. फोटो

RTE 25% Admission Required Documents List Download PDF

1) रहिवाशी पुरावा – आधार कार्ड/ रेशन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन

2) जात प्रमाणपत्र (वडिलांचे/ बालकाचे) – उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी उपविभागीय महसूल अधिकारी यांचे जात प्रमाणपत्र.

3) अपंग असल्यास आवश्यक कागदपत्रे- 40% पेक्षा अपंग असल्यास प्रमाणपत्र.

4) HIV बाधित असल्यास आवश्यक कागदपत्रे – जिल्हा शल्य चिकित्सक शासकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्र

5) आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असल्यास उत्पन्नाचा दाखला (EWS) – एका लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा दाखला.

6) जन्माचा दाखला – ग्रामपंचायत अंगणवाडी किंवा रुग्णालयाचा जन्म दाखला.

7) घटस्फोटीत महिला असल्यास आवश्यक कागदपत्रे – न्यायालयाचा निर्णय तसेच घटस्फोटीत महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा.

8) विधवा महिला असल्यास आवश्यक कागदपत्रे – पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, विधवा महिलेच्या बालकाच्या आईचा रहिवासी दाखला

9) एकल पालकत्व असल्यास आवश्यक कागदपत्रे – आई किंवा वडील यापैकी निवडलेल्या व्यक्तीचे कागदपत्रे.

10) अनाथ बालके असल्यास आवश्यक कागदपत्रे – बालगृह किंवा अनाथ बालकाच्या बाबतीत अनाथालयाची कागदपत्रे.


कागदपत्रांची पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Scroll to Top