Tractor Subsidy Anudan Scheme

Tractor Subsidy Anudan Scheme | नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार अनुदान शासनाचा नवीन जीआर

Rate this post

Tractor Subsidy Anudan Scheme – शेतकरी बंधूंनो आज आपण नवीन ट्रॅक्टर अनुदान योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी आता शेतकऱ्यांना भरघोस अनुदान मिळणार आहे त्याचा जीआर सुद्धा आला आहे.
ट्रॅक्टर अनुदान योजना ही कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजनेअंतर्गत राबवली जात आहे. म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत तुम्हाला ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे. नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी किती अनुदान मिळेल? अर्ज कसा करायचा? कागदपत्रे कोणते लागते? अटी व शर्ती काय आहेत? किती एचपी चे ट्रॅक्टर आला अनुदान मिळेल? अशी सर्व माहिती तुम्हाला खाली दिली जाणार आहे. तर चला मग पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

ट्रॅक्टर सबसिडी स्कीम जीआर माहिती | Tractor Subsidy Scheme Shetkari Anudan Yojana GR

नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी व अनुदानाचा लाभ घेण्यासाठी. शेतकऱ्यांना MahaDBT Farmer Portal वरती अर्ज करावा लागणार आहे. या पोर्टल वरती शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन योजना फळबाग योजना अशा खूप सार्‍या योजनांचा लाभ दिला जातो. या योजना अंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. शेतकरी बंधू या सर्व योजनांचा लाभ स्वतः महाडीबीटी फार्मर पोर्टलवरून घेऊ शकता. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजना सन 2022-22 मध्ये राबविण्याकरिता रुपये 56 कोटी निधी वितरित करण्यात आला आहे. म्हणजेच ट्रॅक्टर सबसिडी योजनेसाठी 56 कोटी एवढा निधी या जीआर मध्ये मंजूर करण्यात आला आहे.


ट्रॅक्टर सबसिडी अनुदान किती मिळेल ? | Tractor Subsidy Anudan Kiti Milel?

शासन निर्णयात दिलेल्या माहितीनुसार, सदर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती/ जमाती, महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 50% किंवा 1.25 लाख यापैकी कमी असलेले ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 40% किंवा एक लाख यापैकी कमी असलेले ते याप्रमाणे अनुदान देण्यात यावे अशी माहिती देण्यात आली आहे.
ट्रॅक्टर्स सबसिडी व अनुदानासाठी सन 2022-23 या वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजनेची अंमलबजावणी करताना 56 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.

 

👉 हे पण पहा : लम्पी आजारामुळे मृत झालेल्या जनावरांना 30 हजार अनुदान

 

ट्रॅक्टर अनुदान योजना कागदपत्रे 2022 | Tractor Anudan Yojana Document List 2022


1) आधार कार्ड

2) 7/12 उतारा व 8 अ (खाते उतारा)

3) ट्रॅक्टरचे कोटेशन

4) जातीचा दाखला (SC/ST कॅटेगिरी साठी)

5) बँक पासबुक

6) स्वयंघोषणापत्र

7) पूर्वा संमती पत्र

8) मोबाईल नंबर, ईमेल आयडी


ट्रॅक्टर अनुदान योजना पात्रता | Tractor Anudan Yojana Eligibility Criteria

1) शेतकऱ्यांकडे सातबारा उतारा व खाते उतारा असणे आवश्यक आहे

2) शेतकरी SC/ ST कॅटेगिरी चा असेल तर जातीचा दाखला लागेल

3) शेतकऱ्याचे आधार कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे.

4) कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत फक्त एकाच अवजारासाठी अनुदान दिले जाते.

5) एखाद्या घटकासाठी/ अवजारासाठी/ यंत्रासाठी लाभ घेतला असल्यास पुढील दहा वर्ष त्याच बाबीसाठी अर्ज करता येत नाही.


किसान ट्रॅक्टर योजना 2022 असा करा अर्ज | Tractor Anudan Yojana Apply Online 2022 Maharashtra

किसान ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 अंतर्गत तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर अर्ज करताना कोणती काळजी घ्यावी अशी सर्व माहिती तुम्हाला देण्यात आली आहे. फॉर्म भरायला सुरुवात करण्याआधी वरती दिलेल्या अटी व आवश्यक असलेले कागदपत्रे गोळा करून घ्या. त्यानंतर हा फार्म तुम्ही मोबाईल मध्ये सुद्धा भरू शकता. फॉर्म भरण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा.
ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

 

जिआर Pdf डाऊनलोड करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
पी एम किसान योजनेचे आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळाले चेक करा 👉 येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा
Scroll to Top