Mahajyoti Free Tablet Yojana 2023 Maharashtra Online Registration

फ्री टॅबलेट योजना 2023 महा-ज्योती महाराष्ट्र मोबाईल मध्ये फॉर्म भरा | Mahajyoti Free Tablet Yojana 2023 Maharashtra Online Registration

4.8/5 - (587 votes)

Mahajyoti Free Tablet Yojana 2023 Maharashtra Online Registration – मागासवर्गीय विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणानंतर आर्थिक परिस्थित वाईट असल्यामुळे उच्च शिक्षणासाठी खर्च पुरवने शक्य होत नाही. आणि त्यामुळेच मागासवर्गीय विद्यार्थी हे पुढचे शिक्षण थांबवतात. अशाच विद्यार्थ्यांकरता महा ज्योती योजना इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक शिक्षणानंतर पुढच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना MHT- CET/JEE/NEET या परीक्षेचे मोफत पूर्व प्रशिक्षण महाज्योती कडून देण्यात येणार आहे. महाज्योती योजनेसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, आणि अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती आणि मोबाईल मधून अर्ज कसा करावा अशी संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून दिली जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

💁 Mahajyoti Free Tablet Yojana 2023 Maharashtra Online Registration

महाराष्ट्रातील मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना MHT- CET/JEE/NEET – 2025 साठी पूर्व प्रशिक्षण या महा ज्योती योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे. तरी या महाज्योती योजनेमार्फत पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागणी होणार आहे. महाज्योती MHT- CET/JEE/NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने दिले जाईल. आणि ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती कडून विद्यार्थ्यांना फ्री मध्ये टॅब दिले जातील. आणि 6 GB प्रति दिवस इंटरनेट डेटा दिला जाईल.

 

🤷 Maharashtra Free Tablet Yojna 2023 Mahajyoti

योजनेचे नाव MHT -CET/JEE/NEET- 2025 योजना
विभाग इतर मागासवर्गीय व बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य
शिक्षण पात्रता 2023 मध्ये 10 वी पास
अर्ज करण्याची फी फी नाही
शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईट mahajyoti.org.in
अर्ज करण्याची पद्धत online
अधिक योजना व भरतीसाठी येथे क्लिक करा

 

📢 योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता (Eligibility Criteria) –

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता खाली देण्यात आलेली आहे. 

1) विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.

2) विद्यार्थी हा मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यामधील असावा.

3) विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर उत्पन्न श्रेणी या मधला असणे आवश्यक आहे.

4) ज्या विद्यार्थ्यांनी 2023 मध्ये 10वी ची परीक्षा उत्तीर्ण केली असेल ते विद्यार्थी,आणि त्या विद्यार्थ्यांनी 11वी विज्ञान (science) शाखेत प्रवेश घेतला असावा ते विद्यार्थी पात्र असतील. आणि अर्ज करताना 11वी विज्ञान शाखेचे बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा प्रवेश पत्र व 10 वी चे मार्कशीट अर्जासोबत जोडावे.

 

🧾 अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे – (Required Document List)

अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खाली देण्यात आलेली आहेत.

1) 10 वी मार्कशीट

2) 11 वी विज्ञान (science) बोनाफाईट किंवा प्रवेश पत्र

3) आधार कार्ड

4) जातीचे प्रमाणपत्र (cast certificate)

5) नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र

 

🧑‍💻 अर्ज कसा करायचा – (How to Apply Online Form)

ऑनलाइन अर्ज करण्याची माहिती खाली देण्यात आलेली आहे. 

1) महा ज्योतीच्या official website वर Notice Board मध्ये Application for MHT- CET/JEE/NEET – 2025 Training या ठिकाणी ऑनलाइन अर्ज केला जातो.

2) अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्कॅन करून अपलोड करण्यात येतात.

3) ऑनलाइन अर्ज कसा करायचा याचा व्हिडिओ Computer World Center या युट्यूब चॅनेल दिलेला आहे.

 

Mahjyoti Free Tablet Yojana Website link

जाहिरात PDF Download PDF
अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
डॉक्युमेंट Size कशी कमी करायची व्हिडिओ पहा

 

📱 Free Tablet Yojana 2023 Maharashtra Form Fill Up Process

 

🙋 योजनेसाठी अटी व शर्ती – (Terms and Condition)

योजनेच्या अटी व शर्ती  खाली दिलेल्या आहेत. 

1) अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे.

2) अर्ज पोस्टाने किंवा ई-मेल च्या माध्यमातून केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.

3) योजनेबद्दलची जाहिरात रद्द करणे त्यामध्ये मुदत वाढ करणे आणि अर्ज स्वीकारणे आणि नाकारणे याबद्दलची सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाजोती यांचे असतील.

4) अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास फक्त महाज्योती च्या कॉल सेंटर सोबत संपर्क साधावा.
संपर्क नं. 0712-2870120/21
Email ID mahajyotijeeneet24@gmail.com

 

🔴 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

🤔 FAQ. Mahajyoti Free Tablet Yojana 2023 Maharashtra Online Registration

Q. महा ज्योती योजना म्हणजे काय?
Ans. विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाज्योती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट योजनेची सुरुवात केली आहे.

Q. महा ज्योती योजना 2023 मोफत टॅब अर्ज करण्याची शेवटची तारीख?
Ans. महा ज्योती मोफत टॅब योजनेसाठी 31 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Q. महा ज्योती 2023 मोफत टॅब या योजनेत कोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात?
Ans. 10 वी उत्तीर्ण झाल्यानंतर 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी अर्ज करू शकता.

Q. महाज्योती 2023 मोफत टॅब योजनेसाठी अर्ज फी किती असेल?
Ans. अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही.

Q. Maha Jyoti 2023 free tablet scheme official website?
Ans. www.mahajyoti.org in

Q. महाज्योती योजना कोणी सुरू केली?
Ans. महा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र शासनाने सुरू केली.

Q. महाज्योती अंतर्गत फ्री टॅब योजनेत पूर्व प्रशिक्षण कशाचे दिले जाईल?
Ans. महा ज्योती योजने अंतर्गत MHT- CET/JEE/NEET याचे परीक्षा पूर्व प्रशिक्षण दिले जाईल.

Q. Mahajyoti call centre number ?
Ans. महा ज्योती कॉल सेंटर संपर्क 0712-2870120/21 या नंबरशी संपर्क साधावा.

Q. महाज्योती योजना 2023 ऑनलाइन अर्ज कसा करावा?

Ans. ऑनलाइन अर्ज कसा करायचा याचा व्हिडिओ Computer World Center या युट्यूब चॅनेल दिलेला आहे

मित्रांना शेअर करा
Scroll to Top