Bandkam Kamgar Peti Yojana Application Form Eligibility Document Marathi -आज आपण बांधकाम कामगार योजना बद्दलची संपूर्ण माहिती तसेच बांधकाम कामगार योजना काय आहे, बांधकाम कामगार पेटी योजना, बांधकाम कामगार घरकुल योजना, बांधकाम कामगार योजना उद्दिष्टे, बांधकाम कामगार योजना फायदे, बांधकाम कामगार योजना लाभ, बांधकाम कामगार योजनेसाठी पात्रता, बांधकाम कामगार योजना अर्ज कुठे मिळेल व कसा मिळेल, बांधकाम कामगार योजना स्मार्ट कार्ड, बांधकाम कामगार योजना फॉर्म, बांधकाम कामगार योजना वेबसाईट व बांधकाम कामगार योजना 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र कोण देणार, बांधकाम कामगार योजना फॉर्म PDF ही संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सोप्या भाषेत या लेखामार्फत देण्यात आलेली आहे. या माहितीच्या आधारे तुम्ही योजनेच्या लाभ घेऊ शकता.
बांधकाम कामगार योजना काय आहे (What is Bandhkam Kamgar Yojana in Marathi)
महाराष्ट्र राज्यात असणाऱ्या कामगारांचे भविष्य उज्वल होण्याकरिता महाराष्ट्र सरकार अनेक प्रकारच्या योजना काढल्या आहेत आणि त्या योजनामध्ये बांधकाम कामगार योजना ही एक योजना आहे. या योजनेमार्फत बांधकाम करणाऱ्या कामगारांना रोजगार देणे, सामाजिक सुरक्षा देणे, कामगाराच्या मुलांचे शिक्षण करिता स्कॉलरशिप देणे, कामगाराच्या आरोग्यासाठी मदत देणे अशा अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना, महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार योजनेमार्फत सुरू केल्या आहेत. बांधकाम कामगार योजनेमार्फत कामगारांना आर्थिक मदत आणि जीवनावश्यक वस्तू सुद्धा दिल्या जातात.
बांधकाम कामगार पेटी योजना (Bandhkam kamgar peti yojana)
कामगार मित्रांनो तुम्हाला राज्य सरकार तुमच्या सुरक्षेसाठी अनेक प्रकारचे साहित्य किंवा वस्तू बांधकाम कामगार योजनेअंतर्गत देत असतात. त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकार दरवर्षी कामगारांना बांधकाम कामगार पेटी योजनेमार्फत पेटी Sefety Kit सुद्धा देतात. या पेटीमध्ये तुमच्या सुरक्षेसाठी विविध प्रकारच्या वस्तू Sefety Kit दिल्या जातात. या वस्तूंच्या फायदा तुम्ही काम करताना घेऊ शकतात. बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत तुम्हाला पेटी घ्यायची असेल तर, तुमचे नाव बांधकाम कामगार योजना अंतर्गत नोंदलेले असणे आवश्यक आहे. आणि नाव जर नोंदलेले असेल तर तुम्हाला लगेचच पेटी किट मिळेल. त्यासाठी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे की, पेटी कुठे व कोणत्या पद्धतीने मिळेल. त्याकरिता सर्व माहिती खाली देण्यात आली आहे त्या माहितीचा वापर करून तुम्हाला पेटी लवकरच मिळवू शकता. (worker online registration, renewal and claim)
बांधकाम कामगार योजना पेटी मधील मिळणाऱ्या वस्तू (peti vatap yojana)
बांधकाम कामगार पेटी योजना मार्फत कामगारांना एकूण 12 आवश्यक वस्तू पेटीमध्ये दिल्या जाणार आहेत.
1) बॅग 2) जॅकेट 3) सेफ्टी हेल्मेट 4) चार कप्प्याच्या जेवणाचा डबा 5) सेफ्टी बूट 6) सोलर टॉर्च 7) सोलर चार्जर 8) पाण्याची बॉटल 9) मच्छरदाणी जाळी 10) सेफ्टी बूट 11) हात मोजे 12) चटई
बांधकाम कामगार पेटी योजनेसाठी पात्रता (Bandhkam kamgar peti yojana eligibility)
महाराष्ट्र शासन योजनेअंतर्गत जे बांधकाम कामगार नवीन इमारत बांधण्यात असून ते इमारत पूर्ण होईपर्यंत काम करतात. अशा सर्व कामगारांना या योजनेमार्फत लाभ मिळणार आहे. बांधकाम कामगार पेटी योजनेच्या लाभ घेण्यासाठी आणि नोंदणी करण्यास पात्र ठरतील. त्यानंतर खाली देण्यात आलेल्या अटी लक्षात ठेवा.
1) कामगार महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असावा
2) कामगाराचे वय 18 वर्षे ते 60 वर्षे दरम्यान असावे
3) कामगाराने मागील वर्षांमध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे
4) कामगाराचे नाव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी केलेले असावे
5) कामगार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असावे
6) योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारचा पहिल्या दोन मुलांसाठी योजना लागू होईल
7) बांधकाम कामगार केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू एखाद्या योजनेमार्फत लाभ घेत असेल तर, अशा परिस्थितीत त्या कामगाराला या योजनेच्या लाभ दिला जात नाही
8) इतर क्षेत्रातील कामगारांना या योजनेच्या लाभ दिला जात नाही
बांधकाम कामगार योजना मान्यताप्राप्त प्रकारांची यादी
इमारती, रस्त्यावर, रस्ते, रेल्वे, ट्रामवेज, एअरफिल्ड, सिंचन, ड्रेनेज, तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह, निर्मिती, पारेषन आणि पॉवर वितरण, पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे, तेल आणि गॅसची स्थापना, इलेक्ट्रिक लाइन्स, वायरलेस, रेडिओ, दूरदर्शन, दूरध्वनी, टेलिग्राफ आणि ओव्हरसिज कम्युनिकेशन, डॅम, नद्या, रक्षक, पाणीपुरवठा, टनेल, पुल, पदवीधर, जल विदयुत, पाइपलाइन, टावर्स, कुलिंग टॉवर्स, ट्रान्समिशन टॉवर्स आणि अशा इतर कार्य, दगडे कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे, लाडी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे, रंग, वार्निश लावने, इत्यादी सह सुतार काम, गटार व नळ जोडणीची कामे, वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादी सहित विद्युत कामे, अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे, उद्वाहाने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे, सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे, लोखंडाच्या किंवा धातूच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे, जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे, सुतार काम करणे, आभासी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरिस, यासहित अंतर्गत सजावटीचे कामे, काच कापणे, काचरोगण लावणे, व काचेची तावदाने बसविणे, कारखाना अधिनियम 1948 खाली समावेश असलेल्या विटा छ प्परावरील कौल इत्यादी तयार करणे, सौर तावदाने इत्यादी सारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे, स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडूलर आधुनिक युनिट बसविणे, सिमेंट काँक्रीटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे, माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवासी निवारे किंवा बस स्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे, रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी, सार्वजनिक उड्डाणे, पदपथ, रमणीय भूप्रदेश इत्यादींचे बांधकाम. (mahabocw online registration)
बांधकाम कामगार योजना पेटी कागदपत्रे (Bandhkam kamgar peti kagadpatre)
बांधकाम कामगार पेटी साठी अर्ज करण्यासाठी खाली देण्यात आलेले कागदपत्रे सोबत घेऊन जाणे.
1) कामगार ओळखपत्र
2) आधार कार्ड
3) अर्जदाराच्या पासपोर्ट साईज फोटो
4) कामगाराच्या मूळ गावाच्या रहिवासी दाखला
5) बांधकाम कामगार म्हणून तीन महिने काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
6) वय वर्ष 18 पूर्ण असल्याचा पुरावा.
बांधकाम कामगार योजना उद्देश (Bandhkam kamgar yojana purpose)
1) बांधकाम कामगार योजने मार्फत कामगारांचे जीवनमान व परस्थिती सुधारने
2) बाल कामगारांना धोकादायक क्षेत्रात काम न करू देणे
3) कामगारांची रोजगार क्षमता आणि रोजगाराची संधी वाढवणे
4) कामगाराच्या कौशल्य विकास करणे
5) कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी उपायांसाठी काम करणे
6) कामगारांचे व्यवसायिक आरोग्य आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी धोरण किंवा कार्यक्रम करून कामगारांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणणे
7) कामगारांना घातक कामापासून बाल श्रम काढून श्रम कायद्याच्या अंमलबजावणीस बळकटीकरण प्राप्त करणे
8) कामगारांच्या रोजगार सेवांचा प्रचार करणे
बांधकाम कामगार योजना फायदे (Bandhkam kamgar yojana benefits)
नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक मदत, आरोग्य विषयक मदत व आर्थिक मदत महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेमार्फत दिले जाते. या योजनेअंतर्गत तुम्ही कोणकोणते फायदे घेऊ शकता खाली देण्यात आलेले आहे.
सामाजिक सुरक्षा (Social security)
1) नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना त्यांच्या लग्नाच्या खर्चासाठी 30,000 रुपये अनुदान म्हणून दिले जातात. त्यासाठी कामगाराला विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. नोंदणीकृत लाभार्थी कामगारांना मोफत मध्यान्ह जेवण सुविधा या योजनेअंतर्गत दिली जाते.
2) बांधकाम कामगारांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेच्या लाभ दिला जातो.
3) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नोंदीत पात्र असलेल्या बांधकाम कामगारांना उपयुक्त असलेली अवजारे खरेदी करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला 500 रुपये अर्थसहाय्य दिले जाते. त्यासाठी अवजारे खरेदी करणार असल्याचे आम्ही पत्र देणे गरजेचे आहे.
4) नोंदणीकृत बांधकाम कामगार लाभार्थ्याला जीवन ज्योती विमा योजनेमार्फत विविध लाभ दिले जातात.
5) बांधकाम कामगारांना सुरक्षा संच पुरवले जातात.
6) दिनांक 31 ऑगस्ट 2014 रोजी नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी प्रति कामगारास 30 हजार रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते.
शैक्षणिक मदत (Educational Assistance)
1) महाराष्ट्र इमारत बांधकाम विभागात नोंदणी केलेल्या कामगाराचा पहिल्या दोन मुलांना पहिली ते सातवी मध्ये कमीत कमी 75 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण असले, तर 2,500 रुपये प्रोत्सानात्मक शैक्षणिक आर्थिक मदत म्हणून दिले जातात. त्याकरिता 75 टक्के हजेरी बाबतच्या दाखला देणे गरजेचे आहे
2) नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा दोन मुलांना इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये 75 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असतील तर प्रतिवर्षी 500 रुपये प्रोत्सानात्मक शैक्षणिक मदत म्हणून दिले जातात
3) नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांच्या दोन मुलांना इयत्ता 10 वी ते 12वी किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त असतील तर 10,000 रुपये शैक्षणिक आर्थिक मदत म्हणून दिले जातात त्यासाठी 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्याचे गुणपत्रक सादर करणे आवश्यक आहे.
4) बांधकाम कामगाराच्या दोन मुलांना अथवा पुरुष कामगार यांच्या पत्नीला पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचा प्रवेश पुस्तके व शैक्षणिक सामग्रीसाठी दरवर्षी 20,000 रुपये शैक्षणिक मदत म्हणून दिले जातात. त्याकरिता मागील शैक्षणिक इयत्ता पास झाल्याचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्र आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्याची पावती किंवा बोनाफाईड सादर करणे आवश्यक आहे.
5) बांधकाम कामगारांच्या दोन मुलांना शासनमान्य पदवीके मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलास प्रति शैक्षणिक वर्षी 25,000 रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात.
6) बांधकाम कामगारांच्या दोन मुलांना संगणकाचे शिक्षण एम एस सी आय टी घेत असलेल्या नोंदणी केलेल्या कामगारांच्या मुलांना शुल्काची परिपूर्ती तसेच एम एस सी आय टी पास झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास त्याच्या फी शैक्षणिक आर्थिक मदत म्हणून दिली जाते.
7) बांधकाम कामगारांच्या मुलांना व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप या योजनेअंतर्गत केले जाते.
आरोग्य विषयक मदत (Aarogya Vishayak Madat)
1) नोंदणी केलेला बांधकाम कामगार महिला असो किंवा पुरुष बांधकाम कामगार पत्नीला नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000 रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20,000 रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जाते. त्याकरिता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले नैसर्गिक किंवा शास्त्रक्रियेद्वारे प्रसूतीचे प्रमाणपत्र आणि उपचाराची देयके सादर करणे आवश्यक आहे.
2) बांधकाम कामगार कुटुंबीयांना गंभीर आजार झाले तर त्यांच्या उपचारासाठी 1 लाख रुपये वैद्यकीय मदत एकाच सदस्याला एकाच वेळी कुटुंबातील दोन सदस्यांच्या पर्यंत मर्यादित आहे. तसेच आरोग्य विमा योजना लागू नसल्यास सदर योजनेच्या लाभ दिला जातो त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंभीर आजाराबाबत दिलेले प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचार कागदपत्रे देणे आवश्यक आहे
3) बांधकाम कामगाराच्या पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली तर त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत प्रत्येकी एक लाख रुपये मुदत बंद ठेव लाभ दिला जातो. त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बाबतचे प्रमाणपत्र आणि अर्जदार कामगाराला एक पेक्षा अधिक मुले नाहीत याच्या पुरावा आणि शपथपत्र आवश्यक आहे.
4) नोंदणीकृत बांधकाम कामगाराला 75 टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्याला 2 लाख रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात.
5) बांधकाम कामगाराचे विमा संरक्षण असेल, तर विमा रकमेची परिपूर्ती किंवा कोणाला मार्फत 2 लाख रुपये आर्थिक मदत यापैकी कोणताही एक लाख दिला जातो. त्यासाठी कामगाराचे 75 टक्के अपंगत्व असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचाराची देयके सादर करणे आवश्यक आहे.
6) बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या देखील लाभ घेता येणार आहे. कामगारांची वेळोवेळी तपासणी केली जाईल. त्यासाठी शासकीय केंद्रातून उपचार घेतल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
आर्थिक मदत (Arthik Madat)
1) नोंदणीकृत बांधकाम कामगार कामावर असताना मृत्यू झाला तर त्यांच्या वारसाला 5 लाख रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या मृत्यू दाखला किंवा कामावर असताना मृत्यू झाला आहे असा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
2) मम्मी केलेल्या बांधकाम कामगाराच्या नैसर्गिक मृत्यू झाला तर वारसाला 2 लाख रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात. त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या मृत्यूच्या दाखला सादर करणे गरजेचे आहे.
3) नोंदणीकृत बांधकाम कामगाराला अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत 2 लाख रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात. त्याकरिता कामगार प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र आहे याचे सक्षम अधिकाऱ्याचे पत्र देणे आवश्यक आहे.
4) कामगाराला घर बांधण्याकरिता 4,50,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. त्यामध्ये केंद्र शासनाकडून 2 लाख रुपये आणि कल्याणकारी मंडळाकडून 2,50,000 रुपये दिले जातात.
5) नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला तर त्याच्या नामनिर्देशित वारसाला 10 हजार रुपये त्याच्या अंत्यविधीसाठी मदत म्हणून दिले जातात. त्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले मृत्युपत्र आवश्यक आहे.
6) बांधकाम कामगाराच्या मृत्यू झाला तर त्याच्या विधवा पत्नीला अथवा महिला कामगाराचे निधन झाले तर विदुर पतीला 5 वर्षापर्यंत दरवर्षी 24,000 रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात. त्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यूच्या दाखला गरजेचे आहे.
7) कामगाराचे घर बांधण्यासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी बँकेकडून घेतलेल्या होम लोन वरील व्याजाची रक्कम 6 लाख पर्यंत व 02 लाख अनुदान स्वरूपात दिले जाते. त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज घेतल्याचा पुरावा, कर्ज किंवा घर पती पत्नीचा नावे असल्याचा पुरावा गरजेचा आहे.
8) महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगारांसाठी व्यसनमुक्ती केंद्र उपचाराकरिता नोंदणीकृत कामगारास 6 हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात.
बांधकाम कामगार योजना पेटी किट अर्ज कुठे मिळेल (Bandhkam kamgar yojana peti kit arj kuthe milel)
बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत पेटी किट मिळवण्याकरिता तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी महाराष्ट्र बांधकाम कामगार विभागात व इतर बांधकाम कामगार विभागात जाऊन अधिकाऱ्यांकडून पेटी योजनेच्या अर्ज घेऊ शकता. तसेच योजनेच्या लाभ घेण्यासाठी तुमचे नाव महाराष्ट्र बांधकाम कामगार विभागात नोंदलेल्या असावे. तरच तुम्ही योजनेच्या अर्ज करू शकता. पेटी अर्ज कसा करायचा ही सर्व माहिती खाली देण्यात आली आहे. (bocw status check)
बांधकाम कामगार योजना वेबसाईट
अधिकृत वेबसाईट (Official Website) – https://mahabocw.in
बांधकाम कामगार योजना पेटी अर्ज कुठे व कसा करायचा (Bandhkam kamagar yojana peti arj kuthe va kasa karayacha)
बांधकाम कामगार योजना पेटीसाठी अर्ज करायचा असेल तर, तुम्ही योजना अर्ज ऑफलाइन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन महाराष्ट्र इमारत बांधकाम विभागात अर्ज करायचा आहे. किंवा महाराष्ट्र कामगार विभागाचा ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला पेटी देण्यात येते.
बांधकाम कामगार योजना स्मार्ट कार्ड (Bandhkam kamgar yojana smart card)
महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना राज्य शासनाकडून अनेक योजनांच्या लाभ दिला जातो. त्यासाठी बांधकाम कामगाराचे नाव नोंदणीकृत केल्यावर कामगारांना स्मार्ट कार्ड (Construction Labor Smart Card) दिले जाते. स्मार्ट कार्ड हे आधार कार्डचा व पॅन कार्डचा आकाराचे असते. त्या कार्डवर बांधकाम कामगाराची माहिती दिलेली असते. आणि स्मार्ट कार्ड बांधकाम कामगाराकडे असेल तेव्हाच महाराष्ट्र शासन अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या लाभ घेऊ शकता. स्मार्ट कार्डवरील माहिती खाली देण्यात आलेले आहे.
1) बांधकाम कामगारांच्या नोंदणी क्रमांक
2) बांधकाम कामगाराचे नाव
3) लिंग (Gender)
4) बांधकाम कामगाराची जन्म तारीख
5) बांधकाम कामगारांचा मोबाईल क्रमांक
6) नोंदणी ठिकाण
7) जिल्हा
बांधकाम कामगार घरकुल योजना (Bandhkam kamagar gharkul yojna)
बांधकाम कामगार घरकुल योजना मार्फत ग्रामीण भागातील आणि बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी स्वतःचे पक्के घर मिळावे याकरिता महाराष्ट्र शासनाअंतर्गत अटल बांधकाम कामगार आवास योजना बांधकाम कामगारांसाठी राबवली जाते. आणि योजनेसाठी इच्छुक व पात्र कामगारांना लाभ मिळावा असे आव्हान राज्य शासनामार्फत करण्यात आले आहे. ग्रामीण भागात कामगारांकडे किंवा कुटुंब कुटुंबातील व्यक्तीकडे हक्काचे घर नसते. त्या कुटुंबकरिता योजनेमार्फत 269 स्क्वेअर फुट एवढे क्षेत्राचे बांधकाम करण्यासाठी महाराष्ट्र शासन 1,50,000 रुपये अनुदान देते. बांधकाम कामगार घरकुल योजनेच्या लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे. त्यानंतर कुटुंबाने इतर कोणत्याही सरकारी आवास योजनेच्या लाभ घेतलेला नसावा. आणि संबंधित कुटुंबाकडे पक्के घर नसावे किंवा कुटुंबाकडे घर नसावे. या सर्व अटी महाराष्ट्र शासनामार्फत सांगण्यात आलेले आहेत. (maharashtra building and other construction worker’s welfare board)
बांधकाम कामगार घरकुल योजनेचा अर्ज कसा करावा (Bandhakam kamagar gharkul yojana arj kasa karava)
बांधकाम कामगार कुटुंबीयांना घरकुल योजनेमार्फत घर बांधण्यासाठी जागा खरेदी करायला 50 हजार रुपये पर्यंत रक्कम देण्यात येते. जागेच्या लाभ घेण्यासाठी कुटुंबाकडे जागा नसावी किंवा कुटुंब बेघर असावे. बांधकाम कामगार घरकुल योजना लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. त्यानंतर प्रस्ताव कामगार कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. घरकुल योजनेसाठी अर्जाचा नमुना ग्रामसेवक ग्रामपंचायत यांच्या स्तरावरून उपलब्ध करून देण्यात येतो.
बांधकाम कामगार योजना 90 दिवस काम केल्याने प्रमाणपत्र कोण देणार
बांधकाम कामगार योजना 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हे तुम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टदार, ठेकेदार किंवा इतर दुसऱ्याकडे बांधकाम करत असाल तर तुम्हाला त्यांच्याकडून 90 दिवसाचे प्रमाणपत्र घेता येते. या प्रमाणपत्र मध्ये ठेकेदाराची सर्व माहिती व ठेकेदाराकडे जो बांधकाम कामगार आहे त्या कामगाराला या प्रमाणपत्राची आवश्यकता असेल तर तुमची संपूर्ण माहिती दाखल्यामध्ये भरावी लागते व ठेकेदाराची सही व शिक्का या प्रमाणपत्रावर घ्यावा लागतो.
बांधकाम कामगार योजनेचा लाभ (Bandhkam kamgar yojana labh)
महाराष्ट्र शासनामार्फत बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या योजनेमार्फत आर्थिक मदत किंवा जीवनावश्यक साहित्य दिले जाते. अशा अनेक योजना महाराष्ट्र सरकारने कामगारांसाठी उज्वल भविष्यासाठी सुरू केल्या आहेत. म्हणजेच बांधकाम कामगारांना रोजगार, कामगारांची सामाजिक सुरक्षा, कामगाराच्या मुलांना शैक्षणिक मदत, कामगारांच्या आरोग्य विषयी मदत, आर्थिक मदत आणि कामगाराच्या कल्याणासाठी अनेक उपाय योजना महाराष्ट्र शासनाच्या राबवल्या जातात. या योजनेमार्फत बांधकाम कामगारांना अनेक योजनांच्या लाभ दिला मिळणार आहे. तसेच कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक मदत सुद्धा दिले जाणार आहे. आणि मुलांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप सुद्धा या योजनेमार्फत दिले जाते. तसेच काम कामगार योजना मार्फत घरकुल सुद्धा कामगारांना मिळते.
बांधकाम कामगार योजना फॉर्म PDF (Bandhakam kamagar yojana form pdf)
बांधकाम कामगार योजनेमार्फत विविध योजना महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येतात त्यामुळे बांधकाम कामगार योजना मध्ये विविध योजनांचे फॉर्म सुद्धा दिलेले आहेत ते फॉर्म तुम्ही डाऊनलोड करू शकता. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत विविध योजनांच्या लाभ घेऊ शकता. योजनेमधील सर्व प्रकारचे फॉर्म खाली देण्यात आलेले आहेत.
1) फॉर्म – बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म (संदर्भासाठी)
2) फॉर्म – बांधकाम कामगार नूतनीकरण फॉर्म (संदर्भासाठी)
3) फॉर्म – ग्रामसेवक/महानगरपालिका/नगरपरिषदेतर्फे बांधकाम कामगारांनी मागील वर्षभरात 90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र (संदर्भासाठी) नोंदणी व नूतनीकरण करण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले नवीन 90 दिवसांचे प्रमाणपत्र वापरण्यात यावे.
4) फॉर्म – बांधकाम कंत्राटदाराचे/ठेकेदाराचे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात 90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र (संदर्भासाठी)
5) फॉर्म – ऑनलाइन नोंदणीसाठी: आधार संमती फॉर्म (संदर्भासाठी)
6) फॉर्म – ऑनलाइन नोंदणीसाठी: स्वयंघोषणापत्र (संदर्भासाठी)
सामाजिक सुरक्षा योजना कर्जाचे फॉर्म
7) फॉर्म – नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रू. 30,000/-
8) फॉर्म – व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप.
9) फॉर्म – नोंदीत बांधकाम कामगारास हत्यारे/अवजारे खरेदी करण्याकरिता रू. 5000/- अर्थसहाय्य
10) फॉर्म – नोंदीत बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना.
11) फॉर्म – नोंदीत बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना.
12) फॉर्म – नोंदीत बांधकाम कामगारांसाठी कौशल्य वृद्धीकरण योजना.
शैक्षणिक योजना अर्जाचे फॉर्म
13) फॉर्म – नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना 1 ली ते 7 वी साठी प्रति वर्षी रू. 2500/- किंवा इ. 8 वी ते 10 वी साठी प्रतिवर्षी रू. 5000/-
14) फॉर्म – नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता 10 वी ते 12 वी मध्ये 50% किंवा अधिक गुण मिळाल्यास रू. 10,000/-
15) फॉर्म – नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता 11 वी व 12 वी च्या शैक्षणिक वर्षी रू. 10,000/-
16) फॉर्म – नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस पदवी च्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या पुस्तके व शैक्षणिक सामग्रीसाठी प्रतिवर्षी रू. 20,000/-
17) फॉर्म – नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी रू. 1,00,000/- व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता रू. 60,000/-
18) फॉर्म – बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना शासनमान्य पदवीके करिता प्रतिवर्षी रू. 20,000/- व पदव्युत्तर पदवीके करिता रू. 25,000/-
19) फॉर्म – बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण MSCIT करिता शुल्काची प्रतिपूर्ती.
आरोग्य विषयक योजना अर्जाचे फॉर्म
20) फॉर्म – नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन जीवेत अपत्यांच्या नैसर्गिक प्रसूतीसाठी रू. 15,000/- व शस्त्रक्रिया द्वारे प्रसूतीसाठी रू. 20,000/-
21) नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ रू. 1,00,000/- (आरोग्य विमा योजना लागू नसल्यास)
22) फॉर्म – पती/पत्नीने पहिला मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीचे नावे राष्ट्रीयकृत बँकेत 18 वर्षापर्यंत रू. 1,00,000 मुदत बंद ठेव
23) फॉर्म – नोंदीत बांधकाम कामगारास 75% अपंगत्व आल्यास रू. 2,00,000/-
24) फॉर्म – नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
अर्थसहाय्य योजना अर्जाचे फॉर्म
25) फॉर्म – नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास रू. 5,00,000/-
26) फॉर्म – नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या नैसर्गिक मृत्यू झाल्यास रू. 2,00,000/-
27) फॉर्म – नोंदणीकृत बांधकाम कामगाराला घरखरेदी किंवा घर बांधणी करिता बँकेकडून घेतलेल्या गृह कर्जावरील रू. 6 लक्ष पर्यंतच्या व्याजाची रक्कम अथवा रू. 2 लक्ष अनुदान.
28) फॉर्म – नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधी करिता रू. 10,000/-
29) फॉर्म – नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस रू. 24,000/- (5 वर्षांकरिता), (प्रतिवर्षी अर्ज करणे आवश्यक राहील).
सूचना – खाली दिलेल्या वेबसाईट लिंकचा वापर करून वरील फॉर्म डाऊनलोड करू शकता.
वेबसाईट लिंक – येथे क्लिक करा
💡 हे पण तुमच्यासाठी
FAQ. Bandkam Kamgar Peti Yojana Application Form Eligibility Document In Marathi
Q. बांधकाम कामगार नोंदणी अधिकृत वेबसाईट?
Ans. https://mahabocw.in/mr
Q. बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची?
Ans. तुमच्या तालुक्याच्या महाराष्ट्र बांधकाम कामगार विभागात जाऊन नोंदणी करू शकता. किंवा विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
Q. बांधकाम कामगार योजना नोंदणी फॉर्म PDF
Ans. बांधकाम कामगार योजनेच्या अधिकृत व्यवसाय वर जाऊन तुम्हाला वेगवेगळ्या योजनांचा फॉर्म मिळेल.
Q. बांधकाम कामगार योजना पेटीमध्ये किती वस्तू आहेत?
Ans. कामगार पेटी किट मध्ये एकूण 12 वस्तू आहेत
Q. पेटी किट साठी अर्ज कसा करायचा?
Ans. बांधकाम कामगार विभागात जाऊन तुम्हाला पेटी किट मिळण्यासाठी अर्ज मगायचा आहे. त्यानंतर तो अर्ज भरून तिथेच जमा करायचा आहे.
Q. बांधकाम कामगार योजना पेटी किट मिळण्यासाठी वय किती पाहिजे?
Ans. किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे.
Q. बांधकाम कामगार योजना पेटी किटसाठी महिला अर्ज करू शकते का?
Ans. हो महिलांना सुद्धा या योजने अंतर्गत पेटी किट मिळणार आहे.
Q. बांधकाम कामगार योजना इंग्रजीमध्ये काय म्हणतात?
Ans. Construction Workers Scheme
Q. एका कुटुंबात किती जणांना बांधकाम कामगार योजना पेटी मिळेल?
Ans. कुटुंबातील जे व्यक्ती पात्र असतील त्या सर्वांना या योजने मार्फत पेटी किट मिळेल.
Q. बांधकाम कामगारांना कोणते कार्ड मिळते?
Ans. बांधकाम विभागात कामगाराचे नाव नोंदणीकृत असेल तर कामगाराला स्मार्ट कार्ड Construction Labour Smart Card दिले जाते.
Q. स्मार्ट कार्ड हरवल्यास काय करावे?
Ans. ओळखपत्र स्मार्ट कार्ड हरवल्यास त्वरित संबंधित जिल्हा कार्यालयास कळवावे.
Q. कामगार कार्ड कोणाला मिळते?
Ans. बांधकाम कामगाराची कामगार म्हणून नोंदणी झाली असेल अशा व्यक्तींना बांधकाम कामगार कल्याण मंडळ कडून बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड मिळते.
Q. बांधकाम कामगारांना कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळतो?
Ans. महाराष्ट्र शासनाकडून एकूण 32 योजनांच्या लाभ मिळतो.
Q. बांधकाम कामगार योजनेच्या उद्देश काय आहे?
Ans. बांधकाम कामगारांचे सामाजिक व आर्थिक विकास करणे.
Q. बांधकाम कामगार योजना लाभ काय आहे?
Ans. योजनेमार्फत आर्थिक सहाय्य देणे.
Q. नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारास लग्नासाठी किती रुपये खर्च मिळतो?
Ans. बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिकृतीसाठी 30 हजार रुपये अनुदान दिले जाते. त्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
Q. मराठीत mbocww म्हणजे काय?
Ans. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ.
Q. बांधकाम कामगारांना कोणत्या योजना मार्फत घरकुल मिळते?
Ans. अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण)
Q. बांधकाम कामगारांना घरकुल आर्थिक लाभ किती?
Ans. बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी 1,50,000 परंतु आर्थिक सहाय्य मिळते.
Q. अटल बांधकाम कामगार आवास योजना सुरुवात केव्हा झाली?
Ans. 2018 मध्ये
Q. बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड?
Ans. बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड आतापर्यंत डाउनलोड सुविधा उपलब्ध झालेली नाही आहे. बांधकाम कामगार संदर्भातील योजनेची माहिती तुम्हाला बांधकाम कामगार मंडळाच्या वेबसाईटवर जाऊन मिळेल.
Q. बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय?
Ans. नोंदणीकृत कामगारांना बांधकामासाठी आवश्यक असलेले अवजारे खरेदी करण्याकरिता राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेअंतर्गत 5 हजार रुपये अर्थसहाय्य देण्याबाबत निर्णय घेतला आहे.
Q. अनुभव प्रमाणपत्र म्हणजे काय?
Ans. अनुभव प्रमाणपत्र हे लिखित दस्तावेज आहे. हे प्रमाणपत्र कामगाराला त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मिळते.
Q. कंपन्यांमध्ये BOCW लागू आहे का?
Ans. कंपन्यांमध्ये जे बांधकाम कामगार काम करत असतील त्यांच्यासाठी BOCW कायद्यांतर्गत कल्याणकारी उपायांच्या अधिकार दिला जातो.
Q. कामगार योजना कोणी सुरू केली?
Ans. बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्र शासन अंतर्गत सुरू झाली.
Q. महाराष्ट्राचे कामगार विभाग मंत्री कोण आहेत?
Ans. सुरेश खाडे.
Q. बांधकाम कामगार एक संज्ञा आहे का?
Ans. भौतिक बांधकाम साइटवर काम करणारा कर्मचारी
Q. बांधकाम कामगार योजनेच्या लाभ घेण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे का?
Ans. बांधकाम कामगार योजना अंतर्गत कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाची आवश्यकता नाही आहे.
Q. बांधकाम कामगार योजना मार्फत माझ्या मुलांना शिक्षणाकरिता आर्थिक मदत मिळेल का?
Ans. हो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाकरिता आर्थिक सहाय्यक योजना राबवली जात आहे त्या योजनेमार्फत तुमच्या मुलांना शिक्षणाकरिता लाभ मिळेल.
Q. मी बांधकाम करतो मला योजनेच्या लाभ मिळेल का?
Ans. हो महाराष्ट्र बांधकाम कामगार विभागात तुमचे नाव नोंदणीकृत असेल तर तुम्हाला योजनांच्या लाभ मिळू शकतो.
Q. मी महाराष्ट्र बाहेर राज्याच्या आहे मला बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळेल का?
Ans. नाही बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र राज्य अंतर्गत मर्यादित आहे.
Q. मला बांधकाम कामगार योजनेची नोंदणी करायची आहे कुठे करू शकतो?
Ans. तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने बांधकाम कामगार योजनेसाठी नाव नोंदवू शकता. ऑफलाइन पद्धतीने तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी बांधकाम विभागात जाऊन नाव नोंदवू शकता आणि ऑनलाइन पद्धतीने योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदवू शकता.
Q. माझे वय 17 आहे मला बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळेल का?
Ans. नाही या योजनेसाठी कामगाराचे वय वर्ष अठरा पूर्ण असावे.
Q. बांधकाम कामगार योजना मार्फत मजुरांना पण लाभ मिळेल का?
Ans. हो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मजूर वर्ग, बांधकाम कामगार वर्ग व इतर अनेक कामगार वर्गांसाठी ही योजना राबवली जात आहे.
Q. कामगारांना घरकुल मिळेल का?
Ans. हो महाराष्ट्र शासनाअंतर्गत अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत तुम्हाला घरकुल मिळेल. त्याकरिता तुमचे नाव बांधकाम कामगार विभागात नोंदणीकृत असावे.
Q. अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत किती अनुदान मिळते?
Ans. 1 लाख 50 हजार रुपये अनुदान मिळते.
Q. मला कामगार ओळखपत्र कुठे मिळेल?
Ans. तुमचे नाव तालुक्यातील बांधकाम कामगार विभागात नोंदणीकृत असेल तर तुम्हाला लगेचच स्मार्ट कार्ड मिळते.
Q. मी बांधकाम कामगार आहे. मला योजनेचा लाभ कसा मिळेल?
Ans. सर्वात आधी तुमचे नाव योजनेअंतर्गत नोंदणी करत असावे. असेल तर तालुक्यातील महाराष्ट्र बांधकाम कामगार विभागात नाव नोंदणी करून तुम्ही विविध योजनांच्या लाभ घेऊ शकता.