50 Hajar Niyamit Karjmafi Patr Apatra Shetkari

50 Hajar Niyamit Karjmafi Patr Apatra Shetkari | 50 हजार कर्ज माफी अपात्र शेतकरी तुम्ही तर नाही ना?

Rate this post

50 Hajar Niyamit Karjmafi Patr Apatr Shetkari – 50000 नियमित कर्ज माफी अनुदान योजना 2022. अंतर्गत कोणते शेतकरी पात्र राहतील व कोणते शेतकरी अपात्र राहतील. हे शेतकऱ्यांना माहीत असणे गरजेचे आहे. रेगुलर नियमित कर्ज माफी योजना अंतर्गत कोण अपात्र आहे. त्याच्या नियम व अटी व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


Niyamit Karjmafi Patr Apatr Shetkari Kon

शेतकरी बंधूंनो महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधी सरसकट कर्जमाफी झाली होती. त्यानंतर परत जे रेगुलर नियमित कर्जफेड करणारे शेतकरी होते. त्यांना सुद्धा 50 हजार रुपये कर्जमाफी अनुदान देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती. या कर्जमाफी अनुदान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला सुद्धा. पण या पन्नास हजार नियमित कर्जमाफी अनुदानाला काही नियम व अटी लादण्यात आल्या आहेत. ज्याच्यात काही शेतकरी हे अपात्र ठरणार आहेत. मग कोणते शेतकरी पात्र असतील व कोणते शेतकरी अपात्र असतील. याबद्दल खाली माहिती देण्यात आली आहे.


💁‍♂️ हे पण वाचा : 50 हजार अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले

 

50 हजार कर्ज माफी अनुदान पात्र शेतकरी हे आहेत. (50 Hajar Karj Mafi Anudan Patra Shetkari)

1) नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर लाभ देण्यासाठी. सन 2017-18, सन 2018-19 व सन 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यात आला आहे.

2) यातील आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित कर्ज फेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

3) नियमित कर्ज परतफेड प्रोत्साहन पर लाभ देण्यासाठी वैयक्तिक शेतकरी विचारात घेतला जाणार आहे.

4) शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त बॅंगांकडून पीक कर्ज घेतलं असेल आणि नियमित परतफेड केली असेल तरी त्यांना कमाल 50 हजार मर्यादित प्रोत्साहन पर लाभ देण्यात येणार आहे.

5) पीक कर्जाची रक्कम पन्नास हजार पेक्षा कमी असल्यास, शेतकऱ्यांनी घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रक्कम इतका त्यांना लाभ देण्यात येणार आहे.

 

नियमित कर्जफेड अनुदान योजना हे शेतकरी अपात्र राहतील. (Niyamit Karjfed Anudan Yojana Apatr Shetkari)

1) महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी.

2) महाराष्ट्र राज्यातील आजी-माजी मंत्री राज्यमंत्री माजी लोकसभा राज्य सभा सदस्य आजी-माजी विधानसभा विधान परिषद सदस्य.

3) केंद्र व राज्य शासनाचे कर्मचारी ज्यांचे वेतन 25 हजारापेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून

4) राज्य सार्वजनिक उपक्रम म्हणजेच महावितरण एसटी महामंडळ व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन 25 हजारापेक्षा जास्त आहे.

5) शेती व्यतिरिक्त बाह्य उत्पन्नातून आयकर भरणारे शेतकरी यांनासुद्धा त्याचा लाभ मिळणार नाही.

6) निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन 25 हजार पेक्षा जास्त आहे, येथे माजी सैनिक सोडून.

7) कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी साखर कारखाना सहकारी सूतगिरणी नागरिक सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी यांचे वेतन 25 हजारापेक्षा जास्त आहे.

8) वरील नियम व अटींमध्ये बसणारे सर्व शेतकरी हे पन्नास हजार नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या अनुदानाला अपात्र राहतील.

 

नियमीत कर्जमाफी अनुदान योजना पात्र व अपात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती

शेतकरी बंधूंनो वरती तुम्हाला कोणते शेतकरी पन्नास हजार नियमित कर्ज परतफेड प्रोत्साहन याला पात्र राहतील. तसेच कोणते शेतकरी नियमित कर्ज फेड प्रोत्साहन अनुदान याला पात्र राहणार नाहीत याबद्दल माहिती सरळ आणि सोप्या भाषेत देण्यात आली आहे. तरीसुद्धा तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना mjpsky.maharashtra.gov.in अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन कर्ज प्रोत्साहन या टॅब मध्ये जाऊन अधिक तर माहिती घेऊ शकता.
💁‍♂️ आधिकृत वेबसाईट : 👉 येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा
Scroll to Top