Dole Yene Upay Va Sampurn Mahiti Conjunctivitis information in Marathi : डोळे येणे हा एक प्रकारचा संसर्गजन्य आजार आहे. जो विशेषता पावसाळ्यात उद्भवतो याचे कारण असे की हवामानातील आद्रतेमुळे विषाणू व जिवाणू किंवा बुरशी यांचे प्रमाण वाढते व अनेक प्रकारची साथीचे रोग होत असतात त्याचप्रमाणे डोळे सुद्धा येतात. डोळे येणे हा गंभीर आजार नाही. हा फक्त काही दिवस किंवा आठवड्याभरात चांगला होत असतो. (dole yene upay lakshan dole yene in marathi mahiti, dole yene symptoms, dole yene means, home remedies, dorps, treatment)
डोळे येणे म्हणजे काय? (Dole Yene Mhanje Kay in marathi)
डोळे येणे म्हणजे डोळ्यातील काँनजेक्टिव्हना सुजावा येणे.काँनजेक्टिव्ह म्हणजे डोळ्यांच्या आतल्या भागातील पांढरा रंगाचा एक बारीक कागदा सारखी त्वचा असते व ती डोळ्याच्या पापण्यांच्या मध्ये असते. डोळे येणे हे संसर्गजन्य असल्यामुळे एकाचे दुसऱ्याला व दुसऱ्याचे तिसऱ्याला असे वाढत जाते.
डोळे येण्याची लक्षणे (Dole Yenyache Lakshan)
डोळ्यांचे पाणी गळणे,
डोळ्यांना सूज येणे,
डोळे लाल होणे,
डोळ्यांना खाज येणे,
पापण्या चिकटणे,
डोळ्यातून पिवळ्या रंगाचा द्रव बाहेर येणे,
डोळ्यांमध्ये आग होणे,
डोळ्यातून चिकट पांढरा द्रव बाहेर येणे,
डोकेदुखी,
काना जवळचा भाग सुजणे किंवा कान दुखी,
उजेड ,लाईट च्या प्रकाश मुळे डोळ्यांना होणारा त्रास इत्यादी. (dole yene symptoms)
डोळे येण्याचे कारण (Dole Yenyache Karan Kay)
डोळे येण्याचे प्रमुख कारण म्हणजे हवामानातील संसर्ग आणि एलर्जी युक्त घटकांच्या वापरामुळे डोळे येऊ शकतात.
डोळे येण्याचे कारण हे डोळे आलेल्या व्यक्तींच्या सहवासात राहिल्यामुळे म्हणजेच त्यांनी डोळ्यांना हाताने स्पर्श करून जर का दुसऱ्या ठिकाणी हात लावला त्यामुळे संसर्ग वाढत जातो किंवा हवेतील कीटकांमुळे होऊ शकतो.
डोळे येण्याचा कारण हे एकमेकांच्या वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमुळे होऊ शकतो. जसे की ब्युटी क्रीम, काजळ किंवा साबण इत्यादी .
हवेतील प्रदूषणामुळे किंवा हवेतील धुळीच्या कणांमुळे डोळे येण्याचा संसर्ग होऊ शकतो.
एकमेकांचे हात रुमाल ,टॉवेल ,चष्मा वापरल्यामुळे डोळे येण्याचा संसर्ग होऊ शकतो.
डोळे आल्यावर कोणते उपाय करतात. (Dole yene upchar in marathi)
डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन डोळ्यांची तपासणी करणे.
डॉक्टरांच्या सांगितल्याप्रमाणे औषधी व डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप घ्यावेत.
डोळ्यांना स्वच्छ पाण्याने दिवसात तीन चार वेळा धुवावे. व स्वच्छ कपड्याने पुसावेत.
पांढरा कापड हळदीने पिवळा करून डोळ्यांवर ठेवावा.
डॉक्टरांचा सल्ला घेऊन वापर करा.
डोळे आल्यावर कोणती काळजी घ्यावी (Dole Aalyavar Konti Kalaji Dyavi)
डोळे आल्यावर सतत डोळ्यांना हात लावू नये. डोळे पुसण्यासाठी स्वच्छ कपड्याचा वापर करावा. डोळ्यांना हात लावल्यावर लगेच साबण लावून हात धुवावे.
डोळे आल्यावर साधा कोणताही पण स्वच्छ असा चष्म्याचा वापर करावा धूर, हवा ,लाईटचा प्रकाश यांचा सहवास टाळावा
डोळे आल्यावर सार्वजनिक जागेवर जाऊ नये कारण डोळे येणे संसर्गजन्य असल्यामुळे आपल्याला झालेला संसर्ग दुसऱ्यांना होऊ शकतो यामुळे सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे. (dole yene upay)
FAQ : Dole Yene Upay Va Sampurn Mahiti Conjunctivitis information in Marathi
1. डोळे आल्यावर काय करावे?
उत्तर. डॉक्टरांचा सल्ला घेऊन डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप घ्यावेत. व कोणतेही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
2. डोळे येणे म्हणजे काय?
उत्तर. डोळे लाल होणे, दुखणे, चुडचूड होणे, डोळ्यातून सतत पाणी येणे इत्यादी.
3. काँनजेक्टिव्ह म्हणजे काय ?
उत्तर. डोळ्यातील आतल्या भागात असलेली पांढऱ्या रंगाची त्वचा म्हणजे काँनजेक्टिव्ह होय.
4. डोळे आल्यावर किती दिवसात बरे होतात?
उत्तर . डोळ्यांची चांगली निघाली असताना डोळे तीन-चार दिवसात बरे होतात.
5. डोळे आल्यावर चष्मा का वापरावा?
उत्तर. चष्मा वापरल्यामुळे डोळ्यांना प्रदूषित हवेचा किंवा धूर , व तीव्र प्रकाश यामुळे इजा होऊ नये म्हणून चष्म्याचा वापर करावा.
6. डोळे आलेल्या व्यक्तीचे डोळे बघून डोळे येत असतात का ?
उत्तर. नाही, डोळे आलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांना हाताने स्पर्श केल्यावर दुसऱ्या कोणत्याही वस्तूला किंवा कपड्याला किंवा इतर ठिकाणी झालेल्या स्पर्शामुळे संसर्ग वाढत असतो.
7. Dole Yene In English Meaning?
Ans. Dole yene english meaning is Conjunctivitis