kadu limbache fayade, neem tree information marathi, nim tree inforamtion in marathi

कडुलिंब झाडाची माहिती व त्याचे फायदे माहित आहेत का तुम्हाला | Kadu Neem Tree Information in Marathi

4.2/5 - (304 votes)

Kadu Neem Tree Information in Marathi : कडु लिंबाच झाड 🌳 ( Nim tree)  कडुलिंबाचे झाड हे आपल्या सर्वांचे परिचयाचे असेल. कडूलिंबाचे झाड हे मनुष्याला सर्व रुपी फायद्याचे ठरणारे आहे. भारतात साधारणपणे कडूलिंबाचे झाड सर्वत्र पाहायला मिळतात. तर आपण या लेखांमध्ये कडुलिंबाच्या झाडाचे फायदे. कडू लिंबाचे झाड कसे असते. कडुलिंबाच्या झाडाचे उपयोग. कडूलिंबाबद्दल तुम्हाला माहिती नसलेली माहिती या लेखात तुम्हाला मिळेल. जेणेकरून तुम्ही कडुलिंबाला तुमच्या दैनंदिन जीवनात वापरू शकता. कडुलिंब ही एक आयुर्वेदिक वनस्पती असून तिचे खूप सारे उपयोग तुम्ही दैनंदिन जीवनात करू शकता. परंतु माहिती अभावी तुम्हाला त्याचे गुणधर्म व फायदे माहित नाही. तर चला कडुलिंबाबद्दल सर्व माहिती पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

🌳 कडूलिंबाच्या झाडाची माहिती | Kadulimbachi Mahiti in Marathi

कडूलिंबाचे झाड आपल्या आजूबाजूच्या परिसरात खूपच प्रमाणात बघायला मिळतात. झाड म्हटल्यावर निसर्ग येतोच म्हणून लिंबाचे झाड हे नैसर्गिक रित्या उगवणारे व मानवी शरीराला उपयोगी पडणारे झाड आहे. भारतात जास्तीत जास्त प्रमाणात बघायला मिळतात तसेच भारतीय उपखंडातील पाकिस्तान ,बांगलादेश ,नेपाळ इतर देशांमध्ये सुद्धा काही प्रमाणात आढळतात. कडू लिंबाचे झाड हे आयुर्वेदिक असून शरीर उपयोगी सुद्धा आहे. कडू लिंबाचे अनेक असे फायदे आहेत की जे तुम्हाला अजूनही माहीत नसतील. कडुलिंबाच्या झाडाची तर माहिती तुम्हाला खाली मिळून जाईल.


Kadu Limabache Zad प्राचीन काळापासून कडुलिंबाच्या झाडाचा उपयोग आयुर्वेदिक औषधी मध्ये केला जातो कडूलिंबाला सर्व रोग निवारण वृक्ष असे देखील संबोधले जाते. चवीला अतिशय कडू असा हा वृक्ष आपल्या शरीर, त्वचा, व केसांना खूप फायदेशीर आहे. कडुलिंब हा एक रक्तशोधक औषधी वनस्पती आहे.


🌳 कडुलिंब म्हणजे काय व त्याची संपूर्ण माहिती | What is Kadu Limb in Marathi


कडुलिंब हे खूपच हिरवळ व विशाल असे झाड असते. मराठीत त्याला कडुलिंब किंवा नीम, बालंतलिंब असे तीन प्रकारचे नाव आहेत.
कडू लिंबाचे शास्त्रीय नाव “Azadireactha Indica” असे आहे. कडुलिंबाची उंची साधारणतः 30 ते 60 फूट एवढी असते. कडुलिंबाचे आयुष्य आयुर्वेदिक व नैसर्गिक रित्या बघितले तर दीर्घायुष्य असते.


Nim Tree Short Information in Marathi


नाव – कडुलिंब,नीम, बालंत लिंब इ.
शास्त्रीय नाव – Azadireactha Indica.
उंची – 30 ते 60 फूट
आयुष्य – दीर्घायुष्य
उपयोग – आयुर्वेदिक वनस्पती

कडू लिंबाचे झाड आकाराने मोठे व साधारणत 30 ते 60 फूट एवढ्या उंचीचे सदाहरित झाड आहे .हे झाड लोकांना नेहमी सावली देण्याचे काम करते. याचे खोड 5 ते 6 फुटापर्यंत सरळ वाढत जाते. व त्यानंतर याला लांब लांब आडव्या फांद्या फुटत असतात व याची साल काळी व खरबडी असते . याला 9 ते 15 सेंटीमीटर लांब एवढे देठ व त्या समांतर काटेरी, करवत सारखी टोकाची व हिरवीगार पाण असतात. या झाडाच्या आजूबाजूच्या परिसरात प्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी असते कारण लिंबाचे झाड हे प्रदूषण रोधक असते.


कडुलिंबाचा थोडक्यात उपयोग: Kadu Neem Tree Upayog


लिंबाचा पानांचा उपयोग आयुर्वेदिक औषधी, फवारणी, स्किन सोप, किंवा मच्छरांना मारण्यासाठी लावणारी अगरबत्ती, व अशा अनेक प्रकारचे आयुर्वेदिक वस्तूंमध्ये. उपयोग केला जातो.


🌳कडुलिंबाचे फायदे | Benefits of Neem Tree in Marathi


Nim Tree Fayade : कडुलिंबाला संस्कृत मध्ये अरिष्ट असे म्हटले जाते. अरिष्ट म्हणजे कधीही नष्ट न होणारे. कडूलिंबाची सर्वाधिक लागवड भारतात केली जात असून त्यांचे अनेक गुणकारी फायदे आहेत.

कडुलिंबाचा आयुर्वेदिक औषधींमध्ये वापर केला जातो. कडूलिंबाची पाने नव्हे तर या झाडाच्या बिया मुळे फुले साल यामध्ये अनेक महत्त्वाची संयुगे असतात. त्यामुळे हे संपूर्ण झाड गुणकारी असण्याची दिसून येते.

कडूलिंबा मध्ये 130 वेगवेगळ्या प्रकारची जैव संयुगे असतात. जे आपल्या शरीराला व्याधीमुक्त करण्यासाठी मदत करतात निरोगी जीवन जगण्यासाठी पाठबळ देतात.


🌳 कडुलिंबाचे फायदे कोणते ते जाणून घ्या | Kadu Neem Tree Fayade


1) कडुलिंबाचे अनेक गुणकारी फायदे आहेत. जसे कर्कपेशी (Cancer Cells) नष्ट करण्याची क्षमता असते. प्रत्येकाची शरिरांमध्ये कर्कपेशी असतात. परंतु त्यांचा आपल्याला कोणताही त्रास होत नाही. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये पेशींचा संदेश ग्रहण क्षमता शक्तीग्रस्त होते. त्यामुळे काही वेळा कर्करोग (Cancer) होण्याची शक्यता असते. नियमित कडुलिंबाच्या 🌿 पानांचे सेवन केले तर कर्क पेशी संख्या प्रमाणात राहते व कर्करोग रोधक म्हणून काम करते.

2)कडुलिंबाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि खनिज यांचे मात्रा असते. त्यामुळे हाडे बळकट करण्यासाठी कडुलिंबाची🌿 पाने उपयोगी असते.

3) सांधेदुखी, गुडघेदुखी याचा त्रास असल्यास कडू लिंबाच्या तेलाने नियमित मालिश करावी. या तेलाने मालिश केल्यास स्नायू मधील वेदना, सांध्यातील वेदना ,व पाठी खालच्या भागाचे दुखणे देखील कमी होते.

4) कडुलिंब विषाणू प्रतिबंधक म्हणूनही काम करते. कडुलिंब पोलिओ, एचआयव्ही (HIV) कॉक्सिक बी ग्रुप (kcoxic b group) आणि डेंगू सारख्या अनेक विषाणूंना त्यांच्या प्रतिकृत सुरुवातीच्या टप्प्यावर रोखण्याचे प्रयत्न करते.

5) गेल्या 50 वर्षांमध्ये संशोधकांनी दाखवून दिले आहे. की कडुलिंबे हे विषाणू संसर्गाच्या दरम्यान मिळणाऱ्या हिरमोरल( Hirmoral) , सेल मेडिटेड (Cell Mediated) या दोन्ही प्रकारच्या प्रतिसाधक अति तीव्र बनवतो.

6) कडुलिंब शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते. पेशींच्या माध्यमातून कार्यरत होणाऱ्या रोगप्रतिकारक यंत्रणाला वेग देते. आणि विषाणूंमध्ये विषद्रव्ये संक्रमित करून त्यांना नाश करते.


कडूलिंबात मध्ये हे दोन औषधे संयुगे असतात.


1) निंबी डोल nimbdol 2) गेडुनीन gedunin हे दोन औषधी संयुगे असतात .जी बुरशी नष्ट करण्याच्या कामी अत्यंत परिणामकारक आहेत.

2) 🌿कडूलिंबाच्या तेलामध्ये आवश्यक फॅटी ऍसिड (fatiasids) असतात. ही आम्ल सुद्धा जखम बरी करण्यास किंवा आपली त्वचा निरोगी बनविण्यास मदत करतात.

3) 🌿कडुलिंब कोणतेही कुरूप वर्ण मागे न सोडता जखम, बुरशीजन्य संसर्ग बरे करते.


🌿 कडुलिंब सेफ्टी इन्फेक्शन बरे करते.


त्वचेवर कडूलिंबाचे तेल लावल्यास त्यातील फेटासिड्स व जीवनसत्वे त्वचेला आद्रता देतात .व तिचे पोषण करतात. त्यामुळे तुमची त्वचा नितळ व तरुण दिसते.
त्वचेवरील बुरशीची वाढ होत नाही. कडुलिंबातील ही जीवनसत्व शतिग्रस्त त्वचेला दुरुस्त करते तसेच पर्यावरणीय बदलामुळे त्वचेला होणारी हानीवर नियंत्रण ठेवते.

🌿पचनशक्ती मध्ये सुधारणा व वजन घटविण्यासाठी मदत (digestion and weight loss)

कडूलिंबाची फुले ही अनारिक्स व मळमळणे , ढेकर येणे व पोटातील त्रासांवरील उपयुक्त मानली जाते.

कडुलिंबाची 🌿पाने ही पचनासाठी देखील उपयोगाची आहेत त्यांच्यामुळे शरीर द्रव्य चांगल्या प्रकारे स्त्रवतात . कडुलिंब ही कडू चवीची वनौषधी असून लाळ व शरीर स्त्रवांच्या पाझरण्यास मदत होते. व चवीच्या संवेदना सक्रिय होतात.

कडुलिंबामुळे दातांमधील कोवड्या स्वच्छ करून चवीच्या संवेदना सुधारण्यास मदत होते.
परिणामी कॅलरीज जाण्यासाठी व चरबी कमी करण्याची प्रक्रिया वेगाने होते.
तुम्हीही नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्याचा चांगलामार्ग शोधत असाल. तर कडुलिंबाची ताजी फुले 🌼 हा त्याचा सर्वाधिक सुरक्षित उपाय आहे. कडूलिंबाची ताजी फुले व मध यांचे मिश्रण सकाळी उपाशीपोटी खाणे फायदेशीर मानले जाते म्हणून सकाळी सर्वप्रथम या मिश्रणाचे सेवन करावे.


🌳 कडुलिंबाचे केसांना फायदे | Kadulimbache Kesanna Fayade


कडुलिंबाच्या पानांसोबत कांद्याची चिलके काढून कांद्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतल्यास ते आपल्या केसांमध्ये केसांच्या मुळास लावल्याने केस गळने खूपच प्रमाणात कमी होते.
कडुलिंब व त्याचे फुल ,पान व झाडाची साल यामुळे सुद्धा खूपच फायदे आहेत.
🌳 म्हणून कडूलिंबाला 1 tree pharmacy असे मानले जाते


FAQ : Kadu Neem Tree Information in Marathi


Q: कडुलिंब झाडाची साधारणत उंची किती असते ?

Ans: कडुलिंब झाडाची साधारणता उंची 30 ते 60 फूट एवढी असते.

Q: कडुलिंबाला मराठीत किती नाव आहेत?

Ans: कडुलिंबाला मराठीत तीन नाव आहेत.

Q: कडूलिंबाला मराठीत कोणकोणती नावे आहेत?

Ans: 1)कडुलिंब 2)निम 3)बालंत लिंब अशी नाव आहेत.

Q: वजन कमी करण्यासाठी कडुलिंबाचे सेवन कोणत्या पद्धतीत करायला पाहिजे?

Ans: वजन कमी करण्यासाठी कडुलिंबाच्या ताजे फुल व मध मिश्रण करून त्याचे सेवन करायला पाहिजे.

Q: कडूलिंबा मध्ये किती औषधी संयुगे आहेत?

Ans: कडूलिंबा मध्ये दोन औषधी संयुगे असतात.

Q: कडुलिंबामध्ये कोणकोणती दोन औषधे संयुगे आहेत?

Ans: कडूलिंबा मध्ये १) निंबिडोल २) गेडूनिन .हे दोन औषधी संयुगे आहेत.

Q: कडुलिंबाचे झाड साधारणता कोणकोणत्या देशात आढळते?

Ans: कडुलिंबाचे झाड साधारणता भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, इत्यादी देशांमध्ये आढळते.

Q: कडुलिंब हे कोणते प्रतिबंधक म्हणून काम करते?

Ans: कडुलिंब हे विषाणू प्रतिबंधक म्हणून काम करते.

Q: कडूलिंबाचा उपयोग प्राचीन काळापासून कशामध्ये केला जात आहे?

Ans: प्राचीन काळापासून कडुलिंबाचा उपयोग आयुर्वेदिक औषधी मध्ये केला जातो.

Q: कडूलिंबाचे पान कसे असतात?

Ans: कडूलिंबाचे पान नऊ ते पंधरा सेंटीमीटर लांब व काटेरी टोकाची हिरवीगार असतात.

Q: कडुलिंबाची साल कशी व कोणत्या रंगाची असत?

Ans: कडुलिंबाची साल खरबडीत व तपकिरी काड्या रंगाची असते.

Q: कडुलिंब हे कोणत्या रोगावर जास्त मात करीत असते?

Ans: कडुलिंब हे कर्करोगावर जास्त मात करीत असते.

Q: कडुलिंबाचे कोणकोणत्या घटक आयुर्वेदिक औषधी मध्ये वापरला जातो?

Ans: फुल, पान ,मुळा व साल कडूलिंबाची इ.घटक आयुर्वेदिक औषधी मध्ये वापरले जातात .

Q: कडूलिंबाला संस्कृत मध्ये काय म्हटले जाते?

Ans: कडुलिंबाला संस्कृत मध्ये अरिष्ट असे म्हटले जाते.

Q: कडुलिंबाचे शास्त्रीय नाव काय आहे?

Ans: कडुलिंबाचे “Azadireactha Indica” असे शास्त्रीय नाव आहे .

Q: कडुलिंबाच्या पानाची चव कशी असते?

Ans: कडुलिंबाच्या पानांची चव कडू असते.

Q: कडुलिंबाचा कोणता घटक पचनासाठी उपयोगी असतो?

Ans: कडूलिंबाचे पाने पचनासाठी उपयोगी असतात.

Q: कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यास काय होते?

Ans: कडुलिंबाच्या पानांची नियमित सेवन केल्यास कर्क पेशी प्रमाणात राहतात.

Q: वजन कमी करण्यासाठी कडुलिंबाची फुले कोणत्या पदार्थासोबत मिश्रण करून सेवन करतात?

Ans: वजन कमी करण्यासाठी कडुनिंबाची पाने व त्यासोबत मध मिश्रण करून सेवन करतात.

Q: कडूलिंबाचे फुले व मध यांच्या मिश्रणाचे सेवन आपण केव्हा करायला हवे?

Ans: कडुलिंबाचे फुल व मध यांचे मिश्रणाचे सेवन वजन कमी करण्यासाठी केला जातो.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top