वनविभाग भरती 2023 नवीन GR आला परीक्षा व शारीरिक पात्रता सर्व माहिती पहा | Van Vibhag Bharti 2023 Exam Pattern & Physical Qualification Information in Marathi

3.2/5 - (5 votes)

Van Vibhag Bharti 2023 Exam Pattern Physical – वनरक्षक भरतीचे नवीन परीक्षा स्वरूप व शारीरिक पात्रतेसाठी लागणारी आवश्यक माहिती नवीन आलेल्या अधिकृत शासन निर्णयात देण्यात आली आहे. गट क व गट ड संवर्गातील कोट्यामधील रिक्त असलेली पदे भरण्याकरिता सरळसेवेने एकत्रित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. वन विभागाच्या भरतीसाठी प्रादेशिक निवड समिती व कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना संदर्भाधिन क्रमांक दोन येथील शासन निर्णय अधिक्रमण करून या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तर या वन विभागाचे भरतीसाठी परीक्षा कशी होईल किती मार्कांची होईल. त्याचबरोबर फिजिकल म्हणजेच मैदानी चाचणी कशी होईल त्याच्यासाठी किती गुण असतील अशी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


Van Vibhag Bharti 2023 Exam Pattern | वन विभाग भरती 2022 परीक्षा कशी होईल

वनरक्षक भरतीच्या नवीन आलेल्या अधिकृत शासन निर्णयानुसार. सर्व उमेदवारांची परीक्षा 120 गुणांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा व 80 गुणांची धावण्याची चाचणी घेण्यात येईल. लेखी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार असून. कॉम्प्युटर बेस टेस्ट वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात होणार आहे. अधिकृत शासन निर्णयात दिलेल्या प्रमाणे लेखी परीक्षेचा दर्जा हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या दर्जापेक्षा निम्म राहणार नाही. लेखी परीक्षा मध्ये खालील प्रमाणे चार विषयांना गुण देण्यात येणार आहेत.

1) सामान्य ज्ञान, जैवविविधता, वने वन्यजीव, पर्यावरण संतुलन या विषयांना 30 गुण

2) बौद्धिक चाचणी 30 गुण

3) मराठी चाचणी 30 गुण

4) इंग्रजी चाचणी 30 गुण

सामान्य ज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका तयार करताना राज्याचा भूगोल व सामाजिक इतिहास वन पर्यावरण आणि हवामान इतर बाबींचा अंतर्भाव राहणार आहे.


Van Vibhag Bharti 2023 Exam Minimum Marks Criteria

वनविभाग भरतीच्या लेखी परीक्षा व शारीरिक परीक्षा मध्ये पास होण्यासाठी कमीत कमी किती गुण लागतील हा सर्वात मोठा प्रश्न उमेदवारांच्या समोर असतो. वनविभाग भरतीसाठी लागणारे कमीत कमी गुण विद्यार्थ्यांना माहिती असले तर अभ्यास करण्यासाठी व तयारीसाठी त्यांना काही गोष्टी सोप्या होतात. वनरक्षक भरतीसाठी उमेदवारांना पास होण्यासाठी कमीत कमी 45 टक्के गुणांची आवश्यकता राहणार आहे. म्हणजेच लेखी परीक्षेसाठी वेगळे गुण तर शारीरिक परीक्षेसाठी वेगळे गुण राहणार आहेत.

लेखी परीक्षा मध्ये पास होण्यासाठी : 45% गुणांची आवश्यकता

शारीरिक चाचणी मध्ये पास होण्यासाठी : 45 टक्के गुणांची आवश्यकता

 

Van Rakshyak Bharti Running Marks Details

वनरक्षक भरती मध्ये धावण्याच्या चाचणीमध्ये किती गुण दिले जातात? हा सर्वात मोठा प्रश्न प्रत्येक मुलाच्या मनात असतो. तर वनरक्षक भरतीसाठी धावण्याच्या चाचणीचे गुणांची विभागणी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली असते. महिला उमेदवार व पुरुष उमेदवार दोघांसाठी अंतर हे वेगवेगळे असतं धावण्याचा वेळ सुद्धा वेगवेगळ्या असतो. त्याचबरोबर तुम्ही किती मिनिटात किती अंतर कापले किंवा किती अंतर धावले त्यानुसार तुम्हाला गुण दिले जातात. तर पुरुष व महिला उमेदवारांच्या धावण्याच्या चाचणीचे गुण खालील प्रमाणे.


पुरुष उमेदवार 5 कि. मी. अंतर धावण्याची चाचणी

तर पुरुष उमेदवारासाठी 5 किलोमीटर अंतर धावण्याच्या चाचणीला एकूण 80 गुण दिले जातात. हे 80 गुण पुरुष उमेदवार किती मिनिटात पाच किलोमीटर धावतो त्यानुसार विभागले जात असतात. ही सर्व माहिती वनविभाग भरतीच्या नवीन आलेल्या अधिकृत शासन निर्णयात देण्यात आली आहे त्याबद्दलचा तपशील खाली पाहू शकता.

van rakshak bharti 2023 exam patern


महिला उमेदवार 3 कि. मी. अंतर धावण्याची चाचणी

तर महिला उमेदवारासाठी 3 किलोमीटर अंतर धावण्याच्या चाचणीला एकूण 80 गुण दिले जातात. हे 80 गुण महिला उमेदवार किती मिनिटात 3 किलोमीटर धावतो त्यानुसार विभागले जात असतात. ही सर्व माहिती वनविभाग भरतीच्या नवीन आलेल्या अधिकृत शासन निर्णयात देण्यात आली आहे त्याबद्दलचा तपशील खाली पाहू शकता.

van vibhag bharti 2023 exam patern

 

👇👇👇
GR डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

FAQ : Van Vibhag Bharti 2023 Exam Pattern & Physical Qualification Eligibility Criteria

 

Q: Van Vibhag Bharti 2023 Exam Date in Marathi?
Ans: वन विभाग भरती 2023 वेगवेगळ्या शासन निर्णय दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते फेब्रुवारी 2023 दरम्यान होईल.

Q: Van Vibhag Bharti 2023 Online Form Last Date In Marathi?
Ans: वन विभाग भरती ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख अद्यापही अधिकृतपणे जारी करण्यात आलेली नाही.

Q:Van Rakshyak Bharti 2023 Syllabus in Marathi?
Ans: वनरक्षक भरती 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी सामान्य ज्ञान जैवविविधता वने वन्यजीव पर्यावरण संतुलन बौद्धिक चाचणी मराठी इंग्रजी या प्रत्येक विषयावरती प्रत्येकी 30 गुणांची प्रश्न विचारली जाणार आहेत.

Q: Van Rakshyak Bharti 2023 Exam Pattern in Marathi?
Ans: वनरक्षक भरती 2023 लेखी परीक्षा 120 गुणांची तर शारीरिक पात्रता परीक्षा 80 गुणांची होणार आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top