Krushi Sevak Bharti 2023 Syllabus Maharashtra In Marathi

कृषी सेवक भरती 2023 महाराष्ट्र अभ्यासक्रम (Syllabus) | Krushi Sevak Bharti 2023 Syllabus Maharashtra In Marathi

4.7/5 - (16 votes)

Krushi Sevak Bharti 2023 Syllabus Maharashtra In Marathi – महाराष्ट्र कृषी विभाग गट-क संवर्गातील कृषी सेवक भरती होणार आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. कृषी सेवक साठी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पगार, अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप इत्यादी माहिती तसेच या गट क संवर्गातील कृषी सेवक पदासाठी लेखी परीक्षा अभ्यासक्रम काय असेल, आणि तो कसा असेल याची सविस्तर माहिती आणि मोबाईल मधून फॉर्म कसा भरायचा याबद्दलची माहिती या लेखात दिलेली आहे. कृषी सेवक सिलॅबस माहिती मराठीत 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi sevak information in marathi krushi vibhag krushi sevak bharti 2023 last date and krushi sevak syllabus 2023 maharashtra in marathi krushi sevak syllabus in marathi pdf

Krushi Vibhag Bharti 2023 Syllabus Maharashtra In Marathi

कृषी सेवक भरती 2023 साठी महाराष्ट्र कृषी सेवक भरती एकूण 2333 जागांसाठी भरतीची जाहिरात आलेली आहे. या कृषी सेवक भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले जातील.

 

शैक्षणिक पात्रता – Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 Qualification

1) शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठातील डिप्लोमा
2) पदवी किंवा समतुल्य


वयाची अट – Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 Age Limit

1) 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 ते 38 वर्ष वय असावे .
2) मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे सूट दिली जाईल.

 

पगार – Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 Salary

महाराष्ट्र कृषी सेवक साठी पगार 16000/- हजार प्रति महिना असू शकतो.

 

कृषी सेवक भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

परीक्षेचे स्वरूप – Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 Exam Pattern

1) महाराष्ट्र कृषी सेवक परीक्षेचे माध्यम मराठी भाषेत असेल.
2) कृषी सेवक भरती परीक्षा संगणकाच्या साह्याने ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.
3) कृषी सेवक भरती परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.
4) या संगणक आधारित परीक्षेमध्ये उमेदवारांना पास होण्यासाठी कमीत कमी 45% गुण मिळवणे आवश्यक राहील.
5) कृषी सेवक भरती परीक्षा एकूण 200 गुणांसाठी घेतली जाणार आहे .
6) कृषी सेवक भरती परीक्षेसाठी 2 तास (120 मिनिटे) वेळ देण्यात येईल.

 

कृषी सेवक अभ्यासक्रम – Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 Syllabus

गट – क कृषी सेवक पदासाठी सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व इंग्रजी या विषयांचा चा अभ्यास आणि कृषी सेवक पदासाठी विज्ञापित शैक्षणिक योग्यता व कृषी सहाय्यक पदाची कर्तव्य आणि जबाबदारी लक्षात घेऊन कृषी विषयक विषयाचा अभ्यासक्रमाचा यामध्ये समावेश आहे.

 

कृषी सेवक भरती 2023 आवश्यक कागदपत्रे


अ) कृषी सेवक पद भरतीसाठी अभ्यासक्रम
1) इंग्रजी 20 प्रश्न
2) मराठी 20 प्रश्न
3) सामान्य ज्ञान 20 प्रश्न
4) बुद्धिमत्ता चाचणी 20 प्रश्न

ब) कृषी सेवक पदाची विज्ञापित शैक्षणिक योग्यता कृषी सहाय्यक कर्तव्य आणि जबाबदाऱ्या लक्षात घेऊन कृषी विषयक अभ्यासक्रम खालील प्रमाणे. यासाठी एकूण 60 प्रश्न असतील.


1) मृदा शास्त्र व्यवस्थापन


1.1) जमिनीचे स्वाभाविक गुणधर्म –
जमिनीचे प्राकृतिक उदित गुणधर्म, जमिनीचा पोत , घडण, रचना, घनता, पोकळी किंवा सच्छिद्रता, रंग, स्थिरता, तापमान किंवा उष्णता, जमिनीचे रासायनिक गुणधर्म, जमिनीचा सामू विद्युत वाहकता, सेंद्रिय कर्ब, मुक्त चुनखडी, मातीतील कलील, आघात, प्रतिबंधक योग्यता (सी. ई. सी) इत्यादी.

1.2) जमिनीचे जैविक गुणधर्म –
सूक्ष्मजीव जंतू व त्यांचे उत्पादन क्षमतेतील असलेले संबंध, जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य व त्यांच्या उपलब्धतेवर होणारा परिणाम, वनस्पतीसाठी लागणारी आवश्यक अन्नद्रव्य, मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्य, त्यांचे कार्य व त्यांच्या कमतरतेची लक्षणे.

1.3) जमिनीतील पाण्याचे प्रकार आणि महत्त्व –
पाण्याचे कार्य, जमिनीतील प्रवेश व हालचाल, जमिनीतील पाणी धरून ठेवणे, जमिनीतील पाणी स्थिर पदे, जमिनीचे पाण्याची नुकसान आणि पाण्याचे चक्र, जमिनीचा निचरा, निचरा पद्धती, अतिरिक्त पाण्याचे पिकावर व जमिनीवर होणारे परिणाम.

1.4) जमिनीची मशागत, तिचे प्रकार, अवजारे व त्यांचा उपयोग, जमिनीची मशागत व तिचे फुल, मशागतीचे उद्देश्य, मशागतीच्या कामाचे प्रकार व त्यासाठी लागणारी निरनिराळी औजारे.

1.5) माती परीक्षण, महत्व उद्देश.

 

कृषी सेवक भरती 2023 नाशिक येथे अर्ज करा

 

Krushi Sevak Bharti 2023 Syllabus Maharashtra In Marathi

2) 2.1) जमीन व्यवस्थापन जमिनीची धूप,धूप होण्याची कारणे, धूपचे निरनिराळे प्रकार व नुकसान, धूप थांबविण्याचे उपाय.

2.2) भूमी व जल संरक्षणाच्या पद्धती, व्यवस्थापन पद्धती, यांत्रिकी पद्धती, भूमी सुधारण्याच्या व संरक्षणाच्या पद्धती, जुनी सुधारणा व संरक्षणाच्या निरनिराळ्या शासकीय योजना.

2.3) सेंद्रिय खते, प्रकार व त्यांचे गुणधर्म, शेणखत बनवण्याच्या सुधारलेल्या पद्धती, कंपोस्ट खत बनवण्याच्या पद्धती, जैविक खते.

2.4) रासायनिक खतांचा प्रकार व त्यांचा होणारा वापर रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी निरनिराळी उपाय योजना, रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर, रासायनिक खतांचा समतोल वापर, खते देण्याच्या पद्धती, खते घालताना घ्यावयाची काळजी.

2.5) कोरडवाहू क्षेत्राचे व्यवस्था
पाणलोट क्षेत्राचे कोरडवाहू शेतीमधील सहभाग (पाणी आडवा पाणी जिरवा), पाणलोट क्षेत्राच्या पिकासाठी सामाजिक वनीकरण, मृदा संधारण विभाग, फलोद्यान विभाग आणि सेवाभावी संस्थांचा सहभाग.

2.6) जमिनीचा आणि पाणी देण्याचा संबंध पाणी देण्याच्या पद्धती, तुषार, ठिबक व बाय ऑल सिंचन पद्धती.


3) पिक संवर्धन 
3.1) पिक संवर्धन, पिकाचे वर्गीकरण, हवामान आणि हंगाम
3.2) बियाणे, बियाणे चे गुणधर्म, बियांच्या उगवण्यासाठी लागणारे आवश्यक गोष्टी
3.3) पिकाच्या वाढीसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी, जमीन, पाणी आणि हवामान.
3.4) तृणवर्गीय पिके, कडधान्य वर्गीय पिके, गळती धान्य, हिरवळी खताची पिके,
3.5) रोग नियंत्रणाची, कीड नियंत्रणाची सर्वसाधारण तत्वे
3.6) जैविक कीड/रोग नियंत्रण, एकात्मिक कीड व रोग नियंत्रण.
3.7) कीटक नाशके व बुरशी नाशकांचा अभ्यास
3.8) साठवलेल्या धान्यातील कीड व त्याचे नियंत्रण
3.9) बीज उत्पादन तंत्र प्रमाणिकरण, विलगीकरण, संकर कार्यक्रम, बीज उत्पादनचे टप्पे.

4) पीक संवर्धन व शेतीपूरक उद्योग
4.1) निरनिराळे पीक पद्धती

4.2) पिकाचे पाणी व्यवस्थापन – पाणी व्यवस्थापन म्हणजे काय?
महत्व – विहिरीतील पाणी मोजणे, व विहिरीची क्षमता काढणे, पिकांना पाण्याच्या वेळा ठरविण्याचे निकष, पाणी देण्याच्या निरनिराळ्या पद्धतींचा अभ्यास

4.3) आळिंबी – माहिती आणि उत्पादनाचे तंत्र, खाणे योग्य आळिंबीचाअभ्यास व वर्गीकरण, आणि मी उत्पादनासाठी आवश्यक असणारे साहित्य/बाबी विषयी माहिती आळिंबीची काढणी आणि विक्री प्रक्रिया आणि टिकवणे

4.4) रेशीम उत्पादनाची ओळख

5) उद्यान विद्या – रोपवाटिका आणि फळबाग व्यवस्थापन
5.1) महाराष्ट्राचे हवामानानुसार पडलेले विभाग
5.2) फळबाग यशस्वी करण्यासाठी आवश्यक बाबी, पर्जन्यमान, तापमान, आद्रता, जमिनीची निवड, योग्य जातीची निवड, पाणीपुरवठा, बाजारपेठ इत्यादी.
5.3) फळबाग लागवड व व्यवस्थापन पाणी/ खते देण्याची पद्धती –
सेंद्रिय खताचा निर्यात क्षम फळांच्या निर्मितीमध्ये महत्त्व.
आंतर मशागत आणि पाण्याचा निचरा करण्याच्या पद्धती.
कोणाचा बंदोबस्त
बहार धरणे पद्धती – मृग, हस्त व आंबे बहार
छाटणी आणि वाहन देण्याचे उद्देश व पद्धती
फुल धारणेच्या सवयी आणि फुल धारणे वर होणारे परिणाम, हवामान, रासायनिक द्रव्य व अवस्था
फळांची गळ, विरळणी, पक्वता, काढणी अवस्था ओळखणे, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक व विक्री व्यवस्था.
5.4) कोरडवाहू फळ पिकांची व्यवस्थापन
5.5) महाराष्ट्राचे महत्त्वाच्या समशीतोष्ण व उष्ण कटिबंधातील फळ झाडांची लागवड
5.6) फळ पिकावरील रोग व किडी यांचे नियंत्रण
5.7) शासनाच्या फळबागा लागवडीच्या योजना
5.8) रोपवाटिका व्यवस्थापन – भाजीपाला व फुलझाडे यांच्या अभिवृद्धीचे प्रकार बियापासून शासकीय अभिवृध्दी पद्धती फायदे व तोटे
5.9) मातृ वृक्षाचे महत्व व निगा
5.10) हरितगृह, तुषार गृह यांचे आधुनिक शेतीतील महत्त्व प्रकार व आकार व उभारणी

6) उद्यान विद्या – भाजीपाला आणि फुलाचे उत्पादन
6.1) भाजीपाल्याचे वर्गीकरण
6.2) प्रमुख भाजीपाल्याची लागवड – पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय भाज्या, शेंगवर्गीय भाज्या, मूळ वर्गीय भाज्या, कंदवर्गीय भाज्या आणि कोबी वर्गीय भाज्या, बहुवर्षी भाज्या
6.3) फुल शेती – महत्व लागवडीस आलेला वाव
6.4) उत्पादन अवलंबिच्या जात असलेल्या खास बाबी – हरितगृहातील
फुल शेती पुष्प – प्रदर्शनासाठी फुलांची निवड व तयारी
6.5) फुल पिकांच्या अभिवृद्धी पद्धती
6.6) महत्त्वाच्या फुल झाडांची लागवड
6.7) फळे आणि भाजीपाला टिकवण्याच्या विविध पद्धती

7) कृषी विस्तार
7.1) विस्ताराची मूलतत्त्वे वैयक्तिक संपर्क – शेतावर व घरी भेट, दूरध्वनी वरील चर्चा, वैयक्तिक चर्चा
7.2) कार्यालयीन भेट – गट संपर्क – सभा, प्रात्यक्षिक, शैक्षणिक, सहल, गट चर्चा
7.3) समूह संपर्क – शेतकरी मेळावे, कृषी दिन, प्रदर्शन, रेडिओ, दूरदर्शन, सभा.
7.4) शेती विषयक वाड्मय – घडी पत्रिका, परिपत्रक, पुस्तिका, भित्तिपत्रक, तक्ते, आलेख, बातमी, नमुने छायाचित्र
7.5) दृकश्राव्य साधने – रेडिओ, दूरदर्शन, टेप रेकॉर्डर, चल चित्रपट, स्लाईड शो, व्हिडिओ कॅसेट, नाटक, तमाशा, कीर्तन.
7.6) संगणक – रचना, कार्य, उपयोग, माहिती साठवणे, माहितीची देवाणघेवाण इत्यादी.
7.7) विस्तार कार्यकर्ता – गुण कर्तव्य व प्रकार
7.8) कार्यक्रमाचे नियोजन – तत्वे, पायऱ्या आणि फायदे


7.9 ) विकास योजना
माहिती, उद्देश्य, लाभार्थी, प्रशासन आणि फायदे, तोटे, कोरडवाहू क्षेत्र विकास योजना (डी पी अे पी), निर्धारित लाभक्षेत्र विकास कार्यक्रम, आदिवासी क्षेत्र विकास कार्यक्रम, डोंगरी क्षेत्र विकास कार्यक्रम, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, एकात्मिक बळ विकास योजना, फळबाग विकास योजना, बहुविध पीक योजना, एकात्मिक कडधान्य सुधार योजना, एकात्मिक केंद्रीय सुधार कार्यक्रम, राष्ट्रीय प्रात्यक्षिक योजना, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, एकात्मिक चारा विकास योजना, जवाहर रोजगार योजना, राष्ट्रीय पाणी लोक विकास कार्यक्रम, कृषी विज्ञान केंद्र


7.10) महत्वाचे शेती विषयक कायदे
बी बियाणे कायदा, रासायनिक खत नियंत्रण कायदा, कीटकनाशक कायदा, जंगल कायदा, तुकडे वंदी व तुकडे तोड कायदा.

8) कृषी व्यवसायातील वित्त व्यवस्थापन
8.1) कृषी व्यवसायात वित्त व्यवस्थापनाचे महत्त्व
8.2) कृषी व्यवसायात पत पुरवठ्याची भूमिका
8.3) कृषी पत पुरवणाऱ्या संस्था
8.4) कृषी पत प्रस्ताव आर्थिक सुसजतेसाठी कृषी पत चाचणी
8.5) कृषी व्यवसाय विश्लेषण

9) कृषी विपणन
9.1) शेतीमाल विक्री – व्याप्ती आणि महत्त्व
9.2) शेतीमालाच्या बाजारपेठेचे प्रकार
9.3) शेतीमाल विक्री व्यवस्थेतील मध्यम आणि संस्था
9.4) शेतीमाल विक्री ची समस्या

 

कृषी सेवक भरती परीक्षेचे प्रश्न आणि गुणांची विषयानुसार मांडणी खालील प्रमाणे. (Question & Marks)

विषय प्रश्न गुण
मराठी 20 20
इंग्रजी 20 20
बौद्धिक चाचणी 20 20
सामान्य ज्ञान 20 20
कृषी विषय 60 120
एकूण 140 200

 

📕 कृषी सेवक भरती सिलॅबस PDF डाऊनलोडPDF Download

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

FAQ. Krushi Sevak Bharti 2023 Syllabus Maharashtra In Marathi


Q. Krushi Sevak Bharti 2023 qualification ?
Ans. कृषी सेवक शैक्षणिक पात्रता वरती लेखामध्ये नमूद केली आहे.

Q. Krushi Sevak Bharti 2023 salary ?
Ans. कृषी सेवक पगार 16000 /- हजार महिना असू शकतो. किंवा शासन निर्णयानुसार बदल होऊ शकतो.

Q. कृषी सेवक म्हणजे काय ?
Ans. कृषी सेवक हा ग्रामसेवक आणि तलाठी यांसारखे ग्रामीण भागाचे महत्त्वाचे पद आहे .

Q. Krushi Sevak Bharti 2023 Syllabus?
Ans. कृषी सेवक भरती परीक्षा अभ्यासक्रम लेखामध्ये सविस्तर देण्यात आला आहे.

Q. Krushi vibhag Bharti 2023 Exam Date?
Ans. कृषी विभाग भरती परीक्षा तारीख अजून उपलब्ध झाली नाही .

Q. कृषी सेवक भरती 2023 फॉर्म मोबाईल मधून कसा भरावा?
Ans. कृषी सेवक भरती फॉर्म मोबाईल मधून भरण्यासाठी computer world centre या यूट्यूब चैनल वर व्हिडिओ देण्यात आलेला आहे .

Q. Krushi Sevak Bharti 2023 Online Form?
Ans. कृषी सेवक भरती ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी www.krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट च्या साह्याने फॉर्म भरला जातो.

Q. Krushi Sevak Bharti 2023 Last Date ?
Ans. अजून उपलब्ध झालेली नाही.

Q. कृषी सेवकाचे काय काम असते?
Ans. शेती बद्दल शेतकऱ्यांना माहिती देण्याची व सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम कृषी सेवक करतो.

Q. कृषी सेवक भरती परीक्षेसाठी किती वेळ दिला जाईल?
Ans. कृषी सेवक भरती परीक्षेसाठी 2 तास (120 मिनिटे) वेळ दिला जाईल.

Q. कृषी सेवक भरती परीक्षा किती गुणांची असेल ?
Ans. कृषी सेवक भरती परीक्षा 200 गुणांची असेल.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top