Lek Ladaki Yojana 2024 Maharashtra – लेक लाडकी योजना 2024 महाराष्ट्र शासनाने घोषित केलेली योजना आहे. या योजनेबद्दल आधी फक्त घोषणा करण्यात आली होती परंतु ही अशी आता महिला व बालविकास विभागाने अधिकृतपणे अंमलबजावणी केली आहे. तर लेक लाडकी योजनेसाठी लागणारी आवश्यक पात्रता, कागदपत्रे, फायदे, नियम व अटी अर्ज अशी संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. तर या योजनेचा लाभ तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता. या योजनेसाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज कुठे मिळेल अर्ज कुठे करायचा असे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे खाली दिलेल्या लेख संपूर्ण अचूक पद्धतीने वाचा.
💁 महत्वाचे – मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी एक ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री ही योजना जाहीर करण्यात आलेली होती. परंतु तिला एवढा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे त्याच योजनेचे सुधारित रूप सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याबद्दल या शासन निर्णयात माहिती देण्यात आलेली आहे.
Lek Ladaki Yojana 2023 Marathi : lek ladaki yojana official website onlie apply. lek ladaki yojana information in marathi how to apply online lek ladaki yojana pdf form. lek ladaki yojana by sheti yojana. age limit required documents list, eligibility, benifits, lek ladaki yojana official website. what is lek ladaki yojana registration
लेक लाडकी योजनेचे प्रमुख उद्दिष्टे (Objectives)
माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) ही योजना अधिक्रमण करून राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी” योजना सुरू करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
सदर योजनेची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत.
1) मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे.
2) मुलींच्या शिक्षणास चालना देणे.
3) मुलींच्या मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे.
4) कुपोषण कमी करणे.
5) शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0 (शून्य) वर आणण्यासाठी प्रोत्साहन करणे.
💁 महत्वाचे – लेक लाडकी योजना 2024 अंतर्गत खालील अटी शर्ती व त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर 5 हजार रुपये इयत्ता पहिलीत 6 हजार रुपये सहावीत 7 हजार रुपये अकरावीत 8 हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये 1,01000 रू एवढी रक्कम देण्यात येईल.
लेक लाडकी योजना नियम अटी व शर्ती (Lek Ladaki Yojana Terms & Condition)
1) ही योजना पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबांमध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींना लागू राहील. तसेच एखाद्या कुटुंबात एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
2) या योजनेच्या पहिल्या आपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करते वेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
3) तसेच दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी आपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
4) दिनांक एक एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जोड्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
5) लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील.
6) लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
7) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये 1 लाख पेक्षा जास्त नसावे.
💁 महत्वाचे – दिनांक 1 एप्रिल 2023 अगोदर जन्मलेल्या मुलीस माजी कन्या भाग्यश्री योजनेच्या अटी व शर्तीनुसार लाभ दिला जाईल मात्र त्याकरिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2023 राहील तदनंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
➡ ग्रामपंचायत घरकुल यादी मोबाईल मध्ये पहा
लेक लाडकी योजना कागदपत्रे (Required Documents List)
1) लाभार्थीचा जन्माचा दाखला (Birth Certificate)
2) कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (Income Certificate) (दाखला एक लाखापेक्षा जास्त नसावा व तहसीलदार चा असावा)
3) लाभार्थीचे आधार कार्ड (Applicant Aadhar Card)
4) पालकाचे आधार कार्ड (Parents Aadhar Card)
5) बँक पासबुक (Bank Passbook)
6) रेशन कार्ड (Ration card) (पिवळे किंवा केसरी)
7) मतदान ओळखपत्र (Voter ID Card) (शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्यास दाखला)
8) संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied)
9) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
10) अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील. (अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र)
Lek Ladaki Yojana 2024 Online Apply in Marathi
सदर लेक लाडकी योजनेअंतर्गत लाभासाठी मुलींच्या पालकांनी 01 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर या मुलींचा जन्म झालेला असेल. त्यांच्या जन्माची नोंद संबंधित ग्रामीण अथवा नागरिक क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलींचे जन्माची नोंद करावी. त्यानंतर क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे वरती दिल्याप्रमाणे आवश्यक असलेले कागदपत्रांसह विविध नमुन्यात अर्ज सादर करावा.
” योजनेअंतर्गत विविध जबाबदाऱ्या व कार्यपद्धती खालील प्रमाणे राहणार आहेत.”
फॉर्मची ऑनलाइन पोर्टल वरती नोंदणी करणे (Online Form Registration Process)
लेक लाडकी योजना 2024 या योजनेअंतर्गत लाभ देण्याकरिता पोर्टलवर लाभार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी अंगणवाडी सेविका तथा पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांनी करावी तसेच लाभार्थ्यांचे अर्ज व सर्व कागदपत्रे पोर्टलवर व अपलोड करावी.
लेक लाडकी योजनेच्या लाभार्थीची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका संबंधित पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांची राहील. अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका यांनी लाभार्थी पात्रतेची खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
अर्ज कुठे व कसा करावा (Application Form Fill Up Process)
1) लेक लाडकी योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2) हा अर्ज तुम्ही तुमच्या गावातील किंवा शहरातील जवळच्या अंगणवाडीमध्ये जाऊन करू शकता.
3) अर्ज करण्यासाठी लागणारे संबंधित आवश्यक कागदपत्रे तुम्हाला वरती उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
4) या योजनेसंबंधीत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाचा अधिकृत शासन निर्णय खाली देण्यात आलेला आहे.
5) या योजनेसाठी अर्जाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुमच्या जवळच्या संबंधित अंगणवाडीला भेट द्या व अंगणवाडी सेविका यांना याबद्दलची माहिती विचारा.
6) ऑफलाईन अर्ज सादर करण्यासाठी चा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खाली उपलब्ध करून दिलेला आहे.
लेक लाडकी योजनेचे फायदे (Benefits)
1) लेक लाडकी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या मुलींना त्यांच्या सक्षमीकरणासाठी मदत दिली जाते.
2) ज्याच्यात पात्र असलेल्या मुलींना जन्मानंतर पाच हजार रुपये दिले जातात.
3) त्याचबरोबर इयत्ता पहिलीत गेल्यानंतर सहा हजार रुपये.
4) मुलगी सहावी गेल्यानंतर सात हजार रुपये दिले जातात.
5) तर अकरावीत आठ हजार रुपये एवढा लाभ दिला जातो.
6) तसेच मुलगी अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम दिली जाते.
⬇️ शासन निर्णय GR Download करा
😱 सूचना – सदर योजना सुरू झाल्यापासून पाच वर्षानंतर योजनेचे मूल्यमापन करून योजना पुढे सुरू ठेवण्याबाबत अथवा सुधारणेसह राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
💁♀️ Conclusion
वाचक हो या पोस्टमध्ये लेक लाडकी योजनेबद्दल माहिती देण्यात आली आहे. जी माहिती, अर्ज करण्यास इच्छुक असलेले पालक व मुलींना उपयुक्त अशी आहे. ज्याच्यात लेप लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करावा, कुठे करावा, लेक लाडकी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पात्रता नियम व अटी अशी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा लेख नक्कीच आवडला असेल. हा लेख तुम्हाला महत्त्वाचा वाटत असल्यास तुमच्या मित्रांना व परिवारांपर्यंत नक्की शेअर करा.
मिळणार 3000 रू, मुख्यमंत्री वयोश्री योजना
FAQ : Lek Ladaki Yojana 2024 Maharashtra Application Form Documents and Eligibility
Q. लेक लाडकी योजना काय आहे ?
Ans. लेक लाडकी योजना, माझी कन्या भाग्यश्री या योजनेंचे सुधारित रूप आहे.
Q. lek ladaki yojana age limit?
लेक लाडकी योजनेसाठी 01 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलीचे पालक अर्ज करू शकतात. तसेच 01 एप्रिल 2023 याच्या आधी जन्मलेल्या मुलीचे अर्ज 31 डिसेंबर 2023 पर्यंतकरू शकतात.
Q. lek ladaki yojana form?.
Ans. लेक लाडकी योजना फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड लिंक वरती उपलब्ध करून दिली आहे.