regular karj mafi anudan yojana 2022

नियमित कर्ज माफी तुम्हाला मिळेल का 50 हजार कर्ज माफी पहा – Niyamit Karj Mafi 2022 New Update

Rate this post

Niyamit Karj Mafi 2022 New Update : 50 हजार अनुदान कर्जमाफी 2022 – तुम्हाला मिळेल का  चेक करा. Regular karj mafi yojana 2022 Niyamit Karj Mafi 2022 महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन पर ला दिला जाणार आहे. परंतु याच्यातही काही शेतकऱ्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. 50000 नियमित कर्जमाफी योजनेसाठी सरकारने 4700 कोटी मंजूर केले आहेत. परंतु तुम्हाला नक्की याचा लाभ मिळेल का ? याची खात्री तुम्ही करू शकता त्याच्यासाठी खाली दिलेल्या माहितीचा वापर करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


Niyamit Karj Mafi 2022 New Update

Regular karj mafi 2022 नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 50 हजार रुपये अनुदान जमा होणार आहे. परंतु याच्यात काही शेतकरी अपात्र ठरविण्यात आले आहेत. मग तुम्ही कोणत्या शेतकऱ्यांमध्ये येतात पात्र शेतकरी आहात की अपात्र शेतकरी आहात हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.


फक्त याच शेतकऱ्यांना मिळेल 50000 कर्जमाफी अनुदान

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019. अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना ज्याचे शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्याच्यासाठी पात्र असलेले शेतकरी सन 2017 18 सन 2018 19 आणि सन 2019 20 हा कालावधी विचारात घेऊन मान्यता देण्यात आली आहे. या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात मान्यता देण्यात येत आहे. माहिती. दिनांक 29 जुलै 2022 रोजी आलेला शासन निर्णय. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 201.9 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना असे या जीआर चे नाव होते याच्यात माहिती देण्यात आली आहे. पन्नास हजार नियमित कर्जमाफी लाभ घेण्यासाठी 153 लाख शेतकरी पात्र आहेत.

 

या शेतकऱ्यांना 50 हजार कर्जमाफी अनुदान योजनेचा लाभ मिळणार नाही.

सदर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास खालील शेतकरी अपात्र असतील (mahatma jyotiba fule karj mafi yojana 2019-22)

1) असे शेतकरी की ज्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत आधी कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना पुन्हा या योजनेचा लाभ मिळणार नाही.

2) महाराष्ट्र राज्यातील आजी-माजी मंत्री व विधानसभा विधान परिषद सदस्य यांनाही नियमित कर्ज माफी योजना 2022 चा लाभ महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत मिळणार नाही.

3) असे शेतकरी की जे केंद्र सरकार व राज्य सरकार चे कर्मचारी असून त्यांचे वेतन 25 हजार पेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा रेगुलर कर्जमाफी योजना 2019 – 2022 चा लाभ मिळणार नाही.

4) असे शेतकरी की जे राज्यात महावितरण एसटी महामंडळ व अनुदानित संस्था याचे अधिकारी व कर्मचारी आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा 50 हजार अनुदान दिले जाणार नाही.

5) असे शेतकरी की जे शेती बाह्य म्हणजेच शेतीव्यतिरिक्त उत्पन्नातून आयकर भरणा करतात.

6) निवृत्ती वेतन धारक शेतकरी यांचे मासिक निवृत्तीवेतन म्हणजेच पेन्शन पंचवीस हजार पेक्षा जास्त आहे.

7) कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी कारखाना सहकारी सूतगिरणी नागरिक सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक व सरकारी दूध संघ

यांचे अधिकारी असलेले शेतकरी यांनासुद्धा नियमित कर्जमाफी योजना 2022 म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार नाही.(Niyamit Karj Mafi 2022 New Update)

 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top