pm kisan yojana 12th installment new update

पीएम किसान 12 वा हप्ता कोणत्या बँक खात्यात जमा होईल असे चेक करा | PM Kisan yojana 12th Installment new update

Rate this post

PM Kisan yojana 12th Installment new update : शेतकरी बंधूंनो पीएम किसान योजना 12 वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु तुम्हाला माहिती असेल काही दिवसांपूर्वीपासूनच PM kisan yojana ekyc केली जात होती या कारणामुळे तुमचा PM Kisan Yojana 12th Installment (12 वा हप्ता) तुमच्या कडे असलेल्या दुसऱ्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मागच्या वेळी म्हणजेच अकरावा हप्ता ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली होती त्यांच्या दुसऱ्या खात्यांमध्ये जमा झालेला होता. तर तुमचा येणारा बारावा हप्ता कोणत्या खात्यात जमा होईल हे आपण मोबाईल मधून कसं चेक करायचं ते पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

पी एम किसान सन्मान योजना 12 हप्ता कधी मिळेल ?

शेतकरी बंधूंना पीएम किसान 12th Installment release date अजून पूर्णपणे सांगण्यात आलेली नाही. त्यामुळे जेव्हाही पीएम किसान योजना बारावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्या दिवशी जमा होईल याबद्दल माहिती मिळाल्यानंतर आपल्या वेबसाईट वरती तसेच यूट्यूब चैनल वरती तुम्हाला माहिती देण्यात येईल. 17 ऑक्टोंबर 2022 पासून जमा होईल 

 

12 वा हप्ता कोणत्या बँक खात्यात जमा होईल चेक करा मोबाईल मध्ये | PM Kisan 12th Installment New Update

पी एम किसान योजनेचा बारावा हप्ता कोणत्या खात्यात जमा होईल हे तुम्ही घरी बसून मोबाईल मध्ये चेक करू शकता. याच्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही स्टेप चा वापर करावा लागेल. त्यानुसार प्रक्रिया केल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईल मधूनच चेक करू शकता. की तुमच्या कोणत्या बँक अकाउंट मध्ये पी एम किसान योजनेचा बारावा हप्ता जमा होईल.

 

या बँक खात्यात जमा होईल 12 वा हप्ता ?

शेतकरी बंधूंनो पी एम किसान योजनेअंतर्गत केवायसी प्रत्येक शेतकऱ्यांनी केली आहे. केवायसी करण्यामागचे कारण म्हणजे पी एम किसान योजनेला आधार कार्ड लिंक होईल. शेतकऱ्यांना होणारे खूप सारे त्रास कमी होतील ,जसे की काहींचे बँक खाते बदल केले गेले तर अशावेळी ते पी एम किसान योजनेला सुद्धा अपडेट करावे लागत होते. परंतु आता केवायसी झाल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जे बँक खाते लिंक असेल. त्याच बँक खात्यात तुमचे पैसे जमा होतील. म्हणजे आधार नंबर बदलत नाही तुमचं बँक खाते जरी बदललं तरी आधार नंबर ला लिंक असलेल्या बँक खात्यात तुमचे पैसे जमा होतील.

 

असे चेक करा 12 वा कोणत्या खात्यात जमा होईल ?

1) गुगलमध्ये UIDAI असे सर्च करा तुम्हाला खूप सारे पर्याय दिसतील.
2) येथे Aadhaar Services या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल त्याला खाली करा.
3) येथे तुम्हाला Aadhar Link Status असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करा.
4) येथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायला विचारलं जाईल तुमचा आधार नंबर टाका.
5) त्यानंतर खाली एक संकेतांक त्याला Captch कोड असं म्हणतात तो टाका.
6) त्यानंतर Send OTP असे बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करा.
7) तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती सहा अंकी OTP येईल तो टाका Submit वरती क्लिक करा
8) आता येथे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेले बँक अकाउंट व त्या बँकेचे नाव दिसेल.
9) बँकेचे नाव दिसल्यानंतर समजून घ्या तुमचा येणारा बारावा हप्ता याच बँक खात्यात येईल.
10) अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल मधूनच बारा हाफ्ता कोणत्या खात्यात जमा होईल चेक करू शकता ही माहिती खूप महत्त्वाची आहे जास्तीत जास्त शेतकरी बंधूंमध्ये शेअर करा.

 

मित्रांना शेअर करा
Scroll to Top