Pik Vima Nukasan Bharpai Online Form Crop Insurance Claim Process In Marathi

पीक विमा नुकसान भरपाई  पीक विमा कसा मिळवायचा संपूर्ण माहिती सोप्या भाषेत | Pik Vima Nukasan Bharpai Online Form Crop Insurance Claim Process In Marathi

4.3/5 - (19 votes)

Pik Vima Nukasan Bharpai Online Form Crop Insurance Claim Process In Marathi – शेतकरी मित्रांनो आज आपण पिकाचे नुकसान झाल्यास काय करायचे या बद्दलची माहिती तसेच पिक नुकसान भरपाई योजना काय आहे, पिक नुकसानीचे प्रकार, वन्य प्राण्यांमुळे होणारे पिकाचे नुकसान, अवकाळी पावसामुळे होणारे पिकाचे नुकसान, पीक काढणीपश्चात होणारे नुकसान, पिक नुकसान भरपाई लिस्ट, पिक नुकसानीची माहिती कशी कळवायची, पिक नुकसानीची माहिती कळविण्याची कार्यपद्धती, पिक नुकसान झाल्यावर वीमा कंपनीशी संपर्क कसा करावा, पिक नुकसान पंचनामा कार्यपद्धती, पिक नुकसानीची माहिती कळविण्याची कार्यपद्धती, पिक नुकसान झाल्यावर वीमा कंपनीशी संपर्क कसा करावा, पिक विमा App द्वारे पिक नुकसानीची माहिती कळवा, पिक नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पिक पाहणी करता आलेले कंपनीचे प्रतिनिधी शुल्क किती, या सर्व्याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला या लेखाद्वारे देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
अनुक्रमानिका बंद करा

पिक नुकसान भरपाई योजना काय आहे

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या पिक विमा योजना (Crop Insurance Scheme) अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतील. राज्यातील शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाल्यानंतर त्यांना पिकाची भरपाई देऊन आर्थिक प्रोत्साहन देण्याच्या उद्देश महाराष्ट्र सरकारच्या आहे. ही योजना केंद्र सरकारने चालू केलेली आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंचे उत्पन्न वाढेल व नैसर्गिक आपत्ती किंवा इतर आपत्ती पासून शेतकऱ्यांना मदत मिळेल.

 

पिक नुकसानीचे प्रकार

शेतकरी मित्रांचे विविध कारणांमुळे शेतातील पिकाचे नुकसान होत असते, त्यामुळे शेतकरी मित्राला माहिती असणे आवश्यक आहे की, कोणत्या प्रकारच्या पिकाच्या नुकसानीसाठी पिक विमा पात्र ठरवते. आणि पिक विमा कोणत्या प्रकारच्या पिक नुकसानीमुळे मिळतो. पिकाचे नुकसान भरपाई साठी काही विमापात्र प्रकार खाली देण्यात आलेले आहेत.
1) अवकाळी पावसामुळे होणारे पिकाचे नुकसान
2) पिक काढणीपश्चात होणारे नुकसान
3) वन्य प्राण्यांमुळे पिकाचे होणारे नुकसान

 

मुद्रा लोण कसे मिळवायचे

 

अवकाळी पावसामुळे होणारे पिकाचे नुकसान व पिक नुकसान भरपाई प्रक्रिया

अवकाळी पावसामुळे कापूस, मका, सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान होते. तुम्ही जर पिक विमा काढला असेल तर तुम्हाला पिक विमा कंपनीला सूचना देऊन त्या पिकाच्या नुकसान भरपाईसाठी दावा करता येईल. प्रधानमंत्री फसल बीमा योजना  (Pradhanmantri Fasal Bima Yojana) अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला असेल तर क्रॉस इन्शुरन्स एप्लीकेशनच्या मदतीने विमा कंपनीला 72 तासाच्या आत पीक नुकसानी बद्दलची तक्रार करू शकता. तक्रार केल्यानंतर तुम्हाला डॉकेट आयडी मिळेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती ऑनलाइन पद्धतीने कढेल. पिक नुकसानीच्या अर्ज केल्यानंतर पिक विमा कंपनी प्रतिनिधी पिकाचे नुकसान किती झाले हे बघण्याकरिता शेतात येऊन पिकाच्या नुकसानीचे अहवाल तयार करतात हा अहवाल पिक विमा कंपनीला दिल्यास शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतात.

 

पिक काढणीपश्चात होणारे नुकसान

शेतकऱ्यांच्या ज्या पिकांच्या काढणीनंतर शेतकरी पिकाचा शेतात ढीग करतो किंवा पूळा बांधतो. कारण काही पिकांना काढणीनंतर सूकवण्यासाठी शेतात पीक राहू देतात. त्यामुळे काही दोन आठवड्याचा आत 14 दिवसात गारपीट, चक्रीवादळ, बिगर मोसमी पाऊस यासारख्या मोसमी पावसामुळे पिकाचे नुकसान होते त्याकरिता वैयक्तिक स्तरावर पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई मिळते.

 

वन्य प्राण्यांमुळे पिकाचे होणारे नुकसान व पिक नुकसान भरपाई प्रक्रिया

शेतकरी शेती करत असताना पिकाला पेरणीपासून ते पिक काढण्यापर्यंत पिकाला लहान मुलासारखा सांभाळतो. तरीही काही कारणांमुळे पिकाचे नुकसान होते जसे की वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान. म्हणजेच रानडुक्कर, माकड, सारंग, हरीण अनेक वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान. या प्रकारच्या नुकसानीसाठी भारत सरकार मार्फत आर्थिक मदत दिली जाते. आर्थिक मदत मिळण्यासाठी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जासोबत ज्या शेतात पिकाचे नुकसान झाले आहे त्या शेताच्या पंचनामा, मोजणी व नुकसानी बाबत पुराव्याची कागदपत्रे घेऊन संबंधित क्षेत्रातील उपवनरक्षक, उपविभागीय अधिकारी, वन क्षेत्रपाल कार्यालयात देणे. त्यानंतर शासन निर्णयानुसार वन्य प्राण्यांपासून झालेल्या पिक नुकसानीची भरपाई देण्यात येते.
1) पिकाचे नुकसान झाल्यानंतर जवळचे वनरक्षक, वनपाल किंवा वन परिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे तीन दिवसाच्या आत पिक नुकसानीची तक्रार करायची आहे.
2) पिकाचे नुकसान झाल्यानंतर सरपंच, ग्रामसेवक व तलाठी यांना समितीमार्फत 10 दिवसाच्या आत पिक नुकसानीची तक्रार करावी.

 

1 रु पीक विमा फॉर्म कसा भरायचा

 

पीक नुकसान होण्याचे करणे

  1. नैसर्गिक आपत्ती

2) कीटकांचे आक्रमण

3) पिकाला झालेला आजार

4) दुष्काळ

5) पुर 

6) गारपीट

7) चक्रीवादळ

8) पिकाला कीड लागणे

यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची नुकसान होते त्याकरिता विमा कंपनी पिकांच्या नुकसानीची भरपाई आर्थिक पद्धतीने शेतकऱ्यांना देते.

 

पिक नुकसानीची माहिती कशी कळवायची

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाले असता, त्या घटनेच्या 72 तासाच्या आत विमा कंपनीला केंद्रशासनाच्या क्रॉप इन्शुरन्स मोबाईल ॲप वर किंवा 1800 499 5004 या टोल फ्री नंबर वर कॉल करून तुमच्या पिक नुकसानीची तक्रार करू शकता. त्याचप्रमाणे पिकाची नुकसान लिखित स्वरूपात फॉर्म भरून बँक किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना कडे पिक नुकसानी बद्दलची तक्रार करू शकता.

 

पिक नुकसानीची माहिती कळविण्याची पद्धत

पंतप्रधान पिक विमा योजनेच्या अंतर्गत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाल्यानंतर याबाबतची तक्रार दिनांक, वेळ, पीक नुकसानीचे कारण, पिकाचे नुकसान किती झाले, पिकाची नुकसान कशामुळे झाले, सर्वे नंबर, पिक विमा कंपनी, पिक विमा बँक, कृषी महसूल विभाग नाहीतर टोल फ्री क्रमांकाद्वारे देण्यात येते.

 

ग्रांपंचायत घरकुल यादी पहा मोबाइल मधून

 

पिक नुकसान झाल्यावर वीमा कंपनीशी संपर्क कसा करावा

शेतकरी मित्रांचे पिकाचे नुकसान झाल्यास पंतप्रधान पिक विमा योजना या वेबसाईटवर जाऊन विमा कंपनीशी संपर्क करू शकता. वेबसाईटमार्फत विमा कंपनी संपर्क कसा करायचा हे सर्व प्रोसेस खाली देण्यात आलेली आहे.

1) सर्वप्रथम खाली देण्यात आलेली पंतप्रधान पिक विमा योजना वेबसाईट लिंक वर क्लिक करा.

 Website link – येथे क्लिक करा

2) पेज ओपन झाल्यानंतर खाली काही माहिती भरावी लागेल

3) माहितीमध्ये पहिल्याचआधी Season चे ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तिथे रब्बी किंवा खरीप पीक टाकायचे आहे.

4) दोन नंबर ऑप्शनवर Year दिसेल त्याच्यावर क्लिक करून वर्ष टाकायचे आहे.

5) तीन नंबर ऑप्शनवर Scheme दिसेल त्याच्यावर क्लिक करून Pradhan Mantri Fasal Bima Yojana आणि Weather Based Crop Insurance Scheme ऑप्शन दिसतील, एक नंबर टाकायचे आहे.

6) चौथ्या ऑप्शनवर State दिसेल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ज्या राज्यात राहतात ते राज्य टाकायचे आहे.

7) पाचव्या ऑप्शनवर District दिसेल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ज्या जिल्ह्यात राहतात तो जिल्हा टाकायचे आहे.

8) सहाव्या ऑप्शनवर Tehsil दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही ज्या तालुक्यात राहतात तो तालुका टाकायचे आहे.

9) पूर्ण माहिती भरल्यानंतर खाली दिलेल्या SEARCH बटनावर क्लिक करायचे आहे.

10) सर्च झाल्यावर खालच्या पेजवर तुम्हाला जिल्ह्या व तालुक्याप्रमाणे विमा कंपनीच्या प्रतिनिधीचे नाव, मोबाईल नंबर व वेबसाईट दिसेल. त्यानुसार तुम्ही विमा कंपनीचे संपर्क करू शकता. आणि पीक नुकसानीची माहिती कळवू शकता.

 

पिक विमा App द्वारे पिक नुकसानीची माहिती कळवा

शेतातील पिकाचे नुकसान झाल्यास, तक्रार करण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या Play Store मध्ये Crop Insurance हे ॲप डाऊनलोड करायचे आहे. त्यानंतर App ओपन करायचे आहे. त्यानंतर मोबाईल नंबर चे ऑप्शन दिसेल. तिथे तुम्ही पंतप्रधान पिक विमा योजनेसाठी अर्ज करताना जो मोबाईल नंबर दिला होता. तो मोबाईल नंबर टाकायचे आहे त्यानंतर तुम्ही पिक नुकसानीची माहिती ॲपच्या साह्याने कळवू शकता.

 

पिक नुकसान पंचनामा कार्यपद्धती

केंद्र शासन निर्णय नुसार 5 जुलै, 16 अन्वये राबविण्यात येते. की प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम 2016 ते 2017 योजनेमध्ये येणाऱ्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती व पिक काढणे बचत नुकसान या विमा संरक्षणाच्या पद्धतीनुसार वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून विमा कंपनीने महसूल विभाग व कृषी विभागाच्या मदतीने पीक नुकसान भरपाई निश्चित करण्याचे काम करते.

 

पिक पाहणी करता आलेले कंपनीचे प्रतिनिधी शुल्क किती?

तुमच्या शेतातील पिकाचे नुकसान झाले असेल तर, पिक पाहणीसाठी आलेल्या कंपनीच्या प्रतिनिधी त्यांना शुल्क किंवा पैसे देण्याची गरज नाही आहे. जर तुमच्याकडून कंपनीच्या प्रतिनिधी पैसे मागत असेल तर तुम्ही लगेच 1800 419 5004 या टोल फ्री नंबर वर फोन करा किंवा ई-मेल ro.mumbai@aicofindia.com या वेबसाईटवर किंवा विमा कंपनीच्या जिल्हा व तालुका कार्यालयाकडे याची तक्रार करू शकता.

 

पिक विमा योजना लाभार्थी लिस्ट तपासणी प्रक्रिया –

कृषी विभाग महाराष्ट्र सरकारचे अधिकृत वेबसाईटवर जाऊन, मुख्य पोस्टवर तुम्हाला प्रधानमंत्री पिक विमा योजना लाभार्थी यादी दिसेल त्यानंतर तिथे तिथे क्लिक करून, पेजच्या मध्यभागी उजवीकडे दिसेल त्यानंतर लाभार्थ्यांना आता यादीचा लिंक सह नवीन पेज स्क्रीनवर दिसेल पेजवर तुम्ही तुमचं नाव तपासू शकता.

 

FAQ. Pik Vima Nukasan Bharpai Online Form Crop Insurance Claim Process In Marathi


Q. पीक नुकसान म्हणजे काय? (pik nukasan mhanje kay?)
Ans. चांगल्या पिकांमधून मिळणारे उत्पन्न काही नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान जसे की, पिकाला रोग लागून उत्पन्न कमी येणे.

Q. पिक विमा कधी येणार? (pik vima kadhi yenar?)
Ans. आर्थिक वर्षाच्या शेवटी 31 मार्च अगोदर उरलेली पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या जमा होते.

Q. विमा घेणे महत्त्वाचे का आहे? (pik vima ghene mahatvache ka aahe?)
Ans. कुटुंबाला अनेपेक्षित कारण पासून संरक्षण देऊन आणि एक आधार म्हणून आर्थिक मदत देणे.

Q. पावसामुळे माझ्या पिकाचे नुकसान झाले आहे मला विमा भेटेल का? (pavasamule mazya pikache nukasan zale aahe mala vima bhetel ka?)
Ans. जर तुम्ही प्रधानमंत्री विमा योजनेत सहभागी असाल आणि विमा कंपनीला दिलेल्या प्रक्रियेनुसार कळवल्यास तुम्हाला पिक विमा मिळेल.

Q. Pik vima Yojna patrata?
Ans. शेतकरी भारतीय नागरिक असावा व शेती स्वतः मालकीची असावी.

Q. पीक विमा योजनेचा काय फायदा? (pik yojanecha kay fayada
Ans. शेतातील पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इतर कारणांमुळे नुकसान झाल्यास भरपाई स्वरूपात पिक विमा मार्फत आर्थिक मदत मिळते.

Q. Pik vima Yojna website?
Ans. https://pmfby.gov.in

Q. पीक विमा कोणामार्फत सुरू झाली?
Ans. केंद्र सरकार

Q. विमा अर्ज अर्ज भरण्याची प्रक्रिया?
Ans. ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

Q. पीक विमाचे पैसे कुठे मिळतात?
Ans. तुमची क्लेम पास झाल्यानंतर वीमाची रक्कम बँक खात्यात जमा होते.

Q. Pik vima yojna App?
Ans. Crop Insurance

मित्रांना शेअर करा
Scroll to Top