Pm kisan yojana 12th installment realse today

पी एम किसान 12 वा हप्ता आज जमा होईल शेतकऱ्यांच्या खात्यात | PM Kisan Yojana 12th Installment Release Today Credited in Farmers Account

Rate this post

PM Kisan Yojana 12th Installment Release Today – शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी ! प्रधानमंत्री पीएम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत. मिळणारा सन्मान निधी 2 हजार रुपयाचा बारावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाटप केला जाणार आहे. दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत सुद्धा यानिमित्त होणार आहे. त्याचबरोबर नुकतीच महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत, नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांची लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी आले का मध्ये आपण पाहणार आहोत. पी एम किसान योजना बारावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात किती वाजेला जमा होईल आणि कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे याच्यासाठी सविस्तर माहिती वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


PM Kisan 12th Installment Release Today

पी एम किसान योजना बारावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात 17 ऑक्टोबर 2022 पासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बारावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. (PM kisan yojana 12th installment) 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आज दुपारी बारा वाजेपासून जमा व्हायला सुरुवात होईल. परंतु काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही त्याच्यामागे काही कारण आहेत ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेल.


फक्त या शेतकऱ्यांना 12 वा हप्ता मिळेल

पी एम किसान योजनेअंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी याच्यासाठी सहा हजार रुपये दिले जातात. याचा बारावा हप्ता आज रोजी दुपारी बारा वाजेपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पण हा 12 वा हप्ता ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेअंतर्गत ई केवायसी केली आहे अशाच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तरी शेतकरी बंधूंनो तुम्ही केवायसी केली असेल तर चिंता करायची आवश्यकता नाही तुमच्या खात्यात हा हप्ता जमा होणार आहे.


या शेतकऱ्यांना 12 वा हप्ता मिळणार नाही?

PM kisan 12th Installment – पी एम किसान योजना बारावा हप्ता आज रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. पण काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही याचे कारण, त्या शेतकऱ्यांनी अद्यापही पीएम किसान योजनेअंतर्गत केली जाणारी ई केवायसी केलेली नाही. अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजना 12 वा हप्ता मिळणार नाही. तरी शेतकरी बंधूंनो अजूनही केवायसी केली नसेल तर वेळ आहे करून घ्या पुढच्या वेळेस तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर. ही उपयुक्त माहिती जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी बंधूंमध्ये.


PM किसान योजना 12वा हप्ता मिळेल की नाही कसे चेक करायचे.

पी एम किसान योजनेचा 12 वा हप्ता तुम्हाला मिळेल की नाही तुम्ही तुमच्या मोबाईल मधून चेक करू शकता. त्याच्यासाठी खाली दिलेल्या माहितीचा वापर करा.

1) PM Kisan Yojana 12 वा हप्ता Status Check करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
👉 PM Kisan 12th Installment Status

2) तुमच्यासमोर पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट उघडेल.

3) येथे Beneficiary List असा पर्याय असेल याच्यावर क्लिक करा.

4) येथे तुमचे राज्य निवडा जिल्हा, तालुका, ब्लॉक व तुमच्या गावाचे नाव आणि Get Report या बटनावर क्लिक करा.

5) पात्र असलेल्या तुमच्या गावातील शेतकऱ्यांची पूर्ण यादी तुमच्या समोर दिसत येथे जर तुमचं नाव असेल तर समजा तुम्हाला बारा वाजता मिळेल.

सूचना : 🙏 ही उपयुक्त अशी माहिती शेतकरी बंधूंमध्ये शेअर करायला विसरू नका.

 

मित्रांना शेअर करा
Scroll to Top