आधार कार्ड का बंद होत आहेत | Why Aadhaar Card Deactivate/cancel/suspended in Marathi?

Why Aadhaar Card Deactivate/Cancel/Suspended : काही लोकांचे आधार कार्ड हे बंद होत आहे. पण याच्या मागचे कारण लोकांना माहीत नाही. तर Aadhaar card बंद होण्यामागचे कारण काय आहे. आधार कार्ड बंद होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची सर्व माहिती खाली दिली आहे.

 

या कारणांमुळे आधार कार्ड बंद होत आहेत | How to Check Aadhaar Active or Deactivated Status

1) समान डेमोग्राफिक माहिती (वैयक्तिक माहिती) तसेच बायोमेट्रिक माहिती असलेल्या लोकांचे आधार कार्ड बंद केले जातात.

2) 5 वर्षाखालील मुलांना पाच वर्ष पूर्ण होण्यापूर्वी त्याचे बायोमेट्रिक घेण्याची गरज नाही. पण एकदा ते पाच वर्षे झाले की त्यांना दोन वर्षाच्या आत बायोमेट्रिक डेटा सादर करावा लागतो. म्हणजेच त्यांचा आधार कार्ड अपडेट करावा लागतो. असे न केल्यास त्यांचे आधार कार्ड निष्क्रिय करण्यात येतो.

3) पंधरा वर्षापेक्षा कमी वयाचे मुले पंधरा वर्षाची झाल्यावर त्यांचा अंतिम बायोमेट्रिक डेटा अपडेट करावा लागतो. पंधरा वर्षाचे झाल्यानंतर त्यांनाही दोन वर्षाचा कालावधी दिला जातो त्या कालावधीत त्यांना बायोमेट्रिक देता अपडेट करावा लागतो. असे न केल्यास ते आधार कार्ड सुद्धा निष्क्रिय करण्यात येते.

 

आधार कार्ड बंद होऊ नये त्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या

1) तुमच्या आधार नंबर वरती वेगवेगळ्या व्यक्तींचे बायोमेट्रिक अपडेट केली जात तर नाही ना याची काळजी घ्यायची.

2) तुमच्या कुटुंबात पाच वर्षापेक्षा कमी वय असलेले मुले असतील तर त्यांचे वय पाच वर्षापेक्षा जास्त झाल्यात लवकर आधार कार्ड अपडेट करून घ्या.

3) तुमच्या कुटुंबात पंधरा वर्षापेक्षा कमी वय असलेले मुलं असतील त्यांचं वय पंधरा वर्षे झाल्यानंतर त्यांचे आधार कार्ड अपडेट करून घ्या.

4) वरील गोष्टींचे काळजी घ्या तुमच्या आधार कार्ड बंद होणार नाही.

➡ हे पण वाचा : Cibil Score कसा वाढवायचा

Scroll to Top