PM Kisan Yojana 12th Installment Not Receive

PM किसान योजना 12 वा हप्ता मिळाला नाही | PM Kisan Yojana 12th Installment Not Receive

Rate this post

PM Kisan Yojana 12th Installment Not Receive – ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता अजुनही मिळालेला नाही. अशा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची ही माहिती आहे. कारण तुम्हाला हा 12 वा हप्ता का मिळाला नाही हे तुम्ही मोबाईल मधून चेक करू शकता. PM kisan yojana 12 वा हप्ता 17 ऑक्टोंबर 2022 पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. खूप शेतकऱ्यांच्या खात्यात हा बारावा हप्ता जमा झाला आहे. ज्या शेतकऱ्यांना 12 वा हप्ता मिळाला नाही अश्या शेतकऱ्यांनी चेक करायचे आहे की का त्यांना बारावा हप्ता मिळाला नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


🤔 12 वा हप्ता मिळाला नाही याचे काय कारण?

पी एम किसान सन्मान योजना चा 12 वा हप्ता काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे खूप सारे शेतकरी टेन्शन मध्ये आहेत. PM kisan yojana 2000 हजार रुपये त्यांना का मिळाले नाही. याची खूप सारी कारण आहेत. त्याच्यातून काहीही कारणे खालील प्रमाणे.

1) तुमच्या आधार कार्ड ला बँक अकाउंट लिंक नसेल.

2) तुम्ही KYC केली नसेल.

3) एका कुटुंबात एकापेक्षा जास्त व्यक्ती लाभ घेत असतील.

4) आधार कार्ड वरती व पी एम किसान योजनेत नाव सारखे पाहिजे.

5) पी एम किसान योजनेच्या डाटा मध्ये चुकीची माहिती असल्यास.

6) शेत जमीन हस्तांतरित झाल्यास.

7) शेतमालक हयात नसल्यास.


12 वा हप्ता मिळाला नाही मग हे काम करा (12th Installment not received)

PM Kisan Yojana 12th Installment- पी एस किसान सन्माननिधी 12 वा हप्ता चे 2000 रू मिळाले नसतील तर तुम्ही तक्रार करू शकता. केंद्र सरकारने पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 12 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील. तर तुम्ही याच्यासाठी तक्रार करू शकता. तक्रार करण्यासाठी खालील दिलेली माहिती वाचा.


12 वा हप्ता मिळाला नाही, अशी करा तक्रार (How to complain to PM Kisan Yojana 12th Installment)

शेतकरी बंधूंनो तुम्हाला बारावा हप्ता मिळाला नाही. तर तुम्ही तक्रार कधी करू शकता. जेव्हा तुमचं नाव यादीत आहे. तसेच तुम्ही दिलेली सर्व माहिती बरोबर आहे. जसे की बँक खाते आधार नंबर व शेती विषयी माहिती. तरीसुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नसतील. पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता 2 हजार रुपये. तर तुम्ही आठवण फ्री नंबर वर 011-24300606 आणि हेल्पलाईन क्रमांक 155261 वर कॉल करून तक्रार नोंदवू शकता. त्याचबरोबर pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर मेल लिहून सुद्धा तक्रार नोंदवू शकता. ती माहिती खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेली माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये शेअर करा.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top