E-Pik Pahani Kashi Karaychi Pik Pahani Online Maharashtra Last Date

ई-पीक पाहणी कशी करायची पीक पाहणी शेवटची तारीख | E-Pik Pahani Kashi Karaychi Pik Pahani Online Maharashtra Last Date

3.2/5 - (13 votes)

E-Pik Pahani Kashi Karaychi Pik Pahani Online Maharashtra Last Date – शेतकरी मित्रांनो आज आपण ई पीक पाहणी बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. तसेच पीक पाहणी काय आहे, ई पीक पाहणी म्हणजे काय, ई पिक पाहणी करणे का आवश्यक आहे, ई पीक पाहणी केल्याचे फायदे, ई पीक पाहणी कशी करायची, ई पीक पाहणी ॲप, e Peek Pahani version 1 आणि 2 काय आहे, ई पीक पाहणी नोंदणी प्रक्रिया, ई पिक पाहणी Last Date, ई पीक पाहणी करण्याचा उद्देश, e Peek Pahani Customer Care Number, ई पिक पाहणी प्रकल्पात पिकांच्या समाविष्ट अवस्था, ई पीक पाहणी नवीन सुविधा, ई पीक पाहणी गावाची लिस्ट ही सर्व माहिती तुम्हाला या लेखामार्फत मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

पीक पाहणी काय आहे?

शेतकरी स्वतः त्याच्या शेतातल्या पिकांची नोंदणी सातबारा उताऱ्यावर नोंदणी तलठ्याकडे करणे. याकरिता महाराष्ट्र शासनाचा कृषी व महसूल विभागाने मागील गेल्या वर्षापासून ई पीक पाहणी नावाच्या प्रकल्प सुरू केला आहे. पीक पाहणी म्हणजे तुमच्या शेतीच्या सातबारावर पिकांची नोंद करणे. (What is pik pahani in marathi)

 

📢 किसान क्रेडिट कार्ड कसे मिळवायचे

 

ई पीक पाहणी म्हणजे काय?

याच्या आधी पिक पाहणी नोंदणी सातबारा उतारा वरून तलाठी करायच्या परंतु आता महाराष्ट्र सरकारने ई पीक पाहणी हे नवीन माध्यम चालू केले आहे. ई पीक पाहणी ॲप म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने शेतातील पिकांची पाहणी करणे असा अर्थ होतो. ई पीक पाहणी च्या साह्याने शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईलवरून त्यांच्या शेतामध्ये जाऊन पिकांची पाहणी करून त्यांची नोंदणी ई पीक पाहणी या ॲप साह्याने करता येणार आहे. (What is e pik pahani in marathi)

 

ई पिक पाहणी करणे का आवश्यक आहे

ई पीक पाहणीचा फायदा पीक दाव्यांमध्ये होणार आहे. काही कारणामुळे ई पीक पाहणी आणि Crop Insurance यामध्ये तफावत आढळून आल्यास ई पीक पाहणी गृहीत धरली जाणार आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेच्या थेट लाभासाठी ई पीक पाहणी प्रकल्पातील माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या योजना जसे ठिबक तुषार सिंचन इत्यादी योजनांचे लाभ खातेदारांना देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल. (why e pik pahani is important)

 

📢 बांधकाम कामगार पेटी योजना असा मिळवा लाभ

 

ई पीक पाहणी केल्याचे फायदे (Benefits of pik pahani)

महाराष्ट्रा ई पीक पाहणी नोंदणीला खूप शेतकरी बंधू प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे ई पीक पाहणी ॲप मध्ये शेतकरी बांधवांच्या सहभाग वाढला आहे. त्यामुळे ई पीक पाहणी ॲपमुळे शेतकरी बांधवांच्या एक पेरणीची अचूक नोंद होते. तसेच शेतकरी बांधवांचे नुकसान होत नाही आणि महाराष्ट्र सरकारची फसवणूक होत नाही. ई पाहणी केल्याचे काही फायदे खाली देण्यात आले आहेत.
1) ई पीक पाहणी सोप्या पद्धतीने व कमी वेळात ऑनलाइन ॲप च्या साह्याने केली जाते.
2) पिक विमा (Crop Insurance) प्रक्रियेला आणि पीक पाहणीचे दावे निघाली काढण्याची प्रक्रिया आहे खूपच सोप्या पद्धतीने होते.
3) ई पीक पाहणी मुळे शेतकरी बांधवांना पिक कर्ज सुद्धा सुलभ तऱ्हेने मिळते.
4) शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास ई पीक पाहणी मुळे शेतकरी बांधवांना आर्थिक मदत सुद्धा दिली जाते.
5) महाराष्ट्र राज्यातील चालू वर्षी शेतकरी बांधवांनी कोणकोणत्या पिकांची लागवड केली आहे आणि पिकांची लागवड किती केली आहे ही सर्व माहिती ई पीक पाहणी मुळे करणार आहे.
6) कृषी क्षेत्रात योग्य नियोजन करणे ई पीक पाहणी मुळे शक्य होणार आहे.
7) यावर्षी ज्या शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान झाले आहे त्यांच्या पिक विमा दावे निकाले काढण्याकरिता ई पीक पाहणी उपयोगी ठरणार आहे.

 

ई पीक पाणी पाहणी कशी करायची

1) ई पीक पाहणी करणे खूपच सोप आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांनी सर्वप्रथम मोबाईल मध्ये Play Store ओपन करून त्याच्या सर्च बार मध्ये ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करायचे आहे.

2) ॲप डाऊनलोड झाल्यानंतर त्याला ओपन करून, तुम्हाला स्वतःच्या जिल्हा, तालुका, गाव निवडायचे आहे त्यानंतर तुमच्या खातेदार निवडा किंवा गट क्रमांक टाका.

3) हे सर्व माहिती बरोबर भरल्यानंतर तुमच्या परिचय निवडायचे आहे. त्यानंतर होम पेजवर येऊन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. त्यानंतर होम पेजवर तुम्ही जे पीक घेत असाल त्या पिकाची माहिती भरायची आहे.

4) माहिती बरोबर भरल्यानंतर तुमच्या जमिनीच्या खाते क्रमांक निवडायचे आहे. गट क्रमांक निवडल्यानंतर तुमच्या शेतीचे क्षेत्र निवडायचे आहे. त्यानंतर हंगाम निवडायचे आहे.

5) त्यानंतर तुम्ही जे पिक घेत असाल त्या पिकाच्या प्रकार निवडायचे आहे. तुम्ही जर एक पीक घेत असाल तुम्हाला निर्भेळ पीक (Single Crop) हा पर्याय निवडायचा आहे. किंवा तुम्ही एकापेक्षा जास्त पीक येत असाल तर बहुपिक का पर्याय निवडायचे आहे.

6) ही सर्व माहिती भरल्यानंतर तुमचा पिकाचे नाव निवडा, सिंचन पद्धत विहीर आहे का कोरडवाहू आहे अश्या प्रकारचा पर्याय निवडायचा आहे. आता तुम्ही ज्या दिवशी पीक पेरणी केली असेल त्या पिकाचा लागवडीची तारीख निवडायची आहे.

7) वरील सर्व माहिती भरल्यानंतर मोबाईल मध्ये GPS किंवा Location पर्याय चालू करायचे आहे. कारण तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पीक पाहणी केली ही माहिती ॲप मध्ये राहणार आहे.

8) त्यानंतर तुमचा शेतातील मुख्य पिका जवळ उभे राहून फोटो काढून ई पीक पाहणी ॲप मध्ये अपलोड करायचा आहे. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे. अ

9) श्याप्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने पिकाची पाहणी ऑनलाईन पद्धतीने ई पाहणी या ॲप च्या साहाय्याने करू शकता. तुमच्याकडे जर अँड्रॉइड मोबाईल नसेल तर तुम्ही दुसऱ्याच्या मोबाईल वरुन सुध्दा पीक पाहणी करू शकता.

10) एका मोबाईल वरून 20 खातेदारांची पीक पाहणी करू शकतात. (pik pahani kashi karayachai)

सौजन्य – Marathi Corner

 

पीक विमा नुकसान भरपाई अशी मिळवा

 

ई पीक पाहणी ॲप

महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बंधूंसाठी ई पीक पाहणी करणे अनिवार्य झाले आहे. तुमचा शेतातील पिकांची नोंदणी आता तुम्हाला तलाठ्याकडे न जाता तुमचा स्वतःच्या मोबाईल मध्ये करता येणार आहे. त्याकरिता मोबाईलच्या प्ले स्टोअर मधून ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर या ॲपमध्ये विचारली जाणारी अचूक माहिती टाकून तुम्ही ई पीक पाहणी या ॲपद्वारे पिक नोंदणी करू शकता. (e pik paani app)


E-Peek Pahani Version 1 आणि 2 काय आहे


ई पिक पाहणी ॲप वर्जन 1 मध्ये मुख्य पीक आणि दोन पिके नोंदविण्याची सुविधा या वर्जन मध्ये होती. परंतु आता ई पीक पाहणी ॲप वर्जन 2 मध्ये एक मुख्य पीक व 3 दुय्यम पीक नोंदविण्याची सुविधा या वर्जन मध्ये देण्यात आलेली आहे. तसेच लागवड दिनांक, शेतीचे क्षेत्र, हंगाम नोंदणीसाठी सुविधा सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे दुय्यम पिकाची बरोबर माहिती मिळते.

 

📢 पीक विमा असा भरा लवकर

 

ई पीक पाहणी नोंदणी प्रक्रिया.

ई पीक पाहणी नोंदणीसाठी तुम्हाला आता मोबाईलच्या साह्याने ई पीक पाहणी करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल प्ले स्टोअर मध्ये असलेले ई पिक पाहणी ॲप डाऊनलोड करून त्या ॲप मध्ये विचारलेली अचूक माहिती टाकून पीक पाहणी ॲप चालू होईल. आणि तुम्ही याद्वारे पीक पाहणी नोंदवू शकता. (e pik pahani registration process)


ई पीक पाहणी शेवटची तारीख (e pik pahani last date)

शेतकऱ्यांसाठी करण्याची पिक पाहणी (महिना)
खरीप पिकासाठी पाहणी कालावधी – ऑगस्ट ते ऑक्टोंबर
रब्बी पिकासाठी पाहणी कालावधी – नोव्हेंबर ते जानेवारी
उन्हाळी पिकासाठी पाहणी कालावधी – फेब्रुवारी ते एप्रिल

तलाठी स्तरावर करण्याची पिक पाहणी (महिना)
खरीप पिकासाठी पाहणी कालावधी – ऑक्टोबर ते नोव्हेंबर
रब्बी पिकासाठी पाहणी कालावधी – फेब्रुवारी पूर्ण महिना
उन्हाळी पिकासाठी पाहणी कालावधी – एप्रिल ते मे

 

👉 मुद्रा लोन असे मिळवा लवकर

 

ई पीक पाहणी करण्याचा उद्देश (E Purpose of Crop Inspection)

तलाठ्यांकडे जास्त कामाच्या तणाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाच्या नोंद करण्यासाठी लागणारा अधिक लागणे असे अनेक कारणे आहेत त्याकरिता महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या 2018 निर्णयानुसार काही तालुक्यात ई पीक पाहणी चा प्रयोग राबवण्यात आला आहे.
1) पिक पेरणी अहवाल कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या सहभाग वाढविणे
2) कृषी लढा सुलभ करणे
3) पिक विमा आणि एक पाहणीच्या निकाल करण्याची प्रक्रिया सुलभ करणे
4) शेतकऱ्यांच्या पिकाचे यासाठी आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची पपई आणि योग्य प्रकारे आर्थिक मदत करणे
5) शेतकऱ्यांच्या हिताच्या सरकारी योजनाची अंमलबजावणी करणे
6) शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसान भरपाईसाठी लवकरात लवकर अंमलबजावणी करणे हा उठी उद्देश ई पीक पाहणीचा आहे.
7) शेतकऱ्यांकरिता शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करण्यासाठी ई पीक पाहणी ॲप सुरू घराचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

 

E Peek Pahani Customer Care Number

महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या हिताकरिता आणण्यात आलेले ई पिक पाहणी मोबाईल ॲप मधे पीक पाहणी करू शकता. त्यानंतर अधिक माहितीसाठी गावातील तलाठी किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी किंवा शंका असल्यास 020257127120 या क्रमांकावर कॉल करून सुद्धा तुम्ही तुमच्या मनातील शंका निवारण करू शकता.

 

ई पिक पाहणी प्रकल्पात पिकांच्या समाविष्ट अवस्था

1) एकेरी नंतर दोन आठवड्यात वाढ झालेले पीक
2) पिक पूर्ण वाढल्यानंतरची अवस्था
3) पीक कापणी पूर्वीचे अवस्था

 

ई पीक पाहणी नवीन सुविधा (E Crop Inspection New Facility)

1) पिक पाहणी कमीत कमी 10% तपासणी तलाठ्यांमार्फत होणार आहे
2) Geo Fencing सुविधा आहे
3) शेतकरी ई पीक पाहणी स्वयंप्रमाणित मान्यता आहे
4) 48 तासात ई पीक पाणी व दुरुस्ती सुविधा आहे
5) मिश्र पिकांमध्ये इतर तीन मुख्य पीक नोंदवण्याचे सुविधा आहे.
6) संपूर्ण गावाची ई पिक पाहणी बघण्याची सुविधा आहे
7) ॲपची अभिप्राय रेटिंग ची सुविधा आहे
8) खाते अपडेट करण्याची सुविधा आहे

 

ई पीक पाहणी गावाची लिस्ट (e pik pahani village list)

शेतकरी मित्रांच्या गावातील ई पीक पाहणी ची लोन यादी बघण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे ई पीक पाहणी ॲप असणे आवश्यक आहे. ॲपच्या साह्याने तुम्ही ॲप उघडल्यावर तिथे विविध पर्याय असतील त्यामध्ये तुम्हाला गावाची लिस्ट बघण्यासाठी शेवटचा पर्याय निवडायचा आहे तिथे खातेदारांची पीक पाहणी असे दिलेले असेल त्याच्यावर क्लिक करून त्यानंतर तुमच्या गावाची यादी तुम्हाला दिसेल त्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली असेल त्यांचे नाव दिसेल आणि ज्या शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी केले नसेल त्यांच्या सुद्धा नाव ॲप मध्ये दिसेल.


FAQ. E – Pik Pahani Kashi Karaychi Pik Pahani Last Date


Q. E pik pahani helpline number?
Ans. 020257127120

Q. ई पीक पाहणी व्हर्जन 2?
Ans. शेतकऱ्यांसाठी आता ई पीक पाहणी व्हर्जन 2 उपलब्ध झाले आहे. हे वर्जन मोबाईल मधून डाऊनलोड करून तुम्ही शेतातील ई पीक पाहणी करू शकता.

Q. रब्बी पिके कोणते आहेत?
Ans. हिवाळ्यात घेतलेल्या पिकांना रब्बी पिके म्हणतात रब्बी पिकांमध्ये हरभरा, गहू व मोहरी हे येतात.

Q. ई पीक पाहणी ॲप आहे का?
Ans. हो तुमच्या शेतातील पिकाची पाहणी करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने मोबाईल ॲप बनवलेला आहे ते तुम्ही प्ले स्टोर मधून डाउनलोड करू शकता.

Q. खरीप आणि रब्बी पिके म्हणजे काय?
Ans. खरीप पिकांची पेरणी मे मध्ये पहिल्या पावसाळ्याच्या सुरुवातीला केली जाते आणि रब्बी पिकांची पेरणी नोव्हेंबरच्या मध्यस्तरी केली जाते म्हणजे पावसाळ्या नंतर

Q. ई पिक पाहणी प्रकल्प कोणत्या राज्याचे आहे?
Ans. महाराष्ट्र

Q. ई पीक पाहणी प्रकल्पाच्या उद्देश काय आहे?
Ans. पिकाचे नुकसान झाल्यास लवकरच लाभ देणे शक्य होईल.

Q. खरीप पिकाचा कालावधी कधी चालू होतो?
Ans. खरीप पिकाचा कालावधी जून महिन्यात सुरू होतो तर ऑक्टोबर महिन्यात संपतो

Q. रब्बी पीके कोणत्या महिन्यात असतात?
Ans. हिवाळ्या ऋतूतील ऑक्टोबर ते जानेवारी या महिन्यांमध्ये रब्बी पिके घेतली जातात.

Q. खरीप पिकांचा कालावधी कोणता असतो?
Ans. पावसाळ्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांना खरीप पिके असे म्हणतात. भात व कापूस यांचा समावेश होतो.

Q. ई पीक पाहणी प्रकल्प कोणासाठी आहे?
Ans. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्ग

Q. ई पीक पाहणी ॲप मध्ये पूर्ण गावातील शेतकऱ्यांची लिस्ट असते का?
Ans. हो ॲप मध्ये गावाच्या पर्याय निवडून तुम्ही ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली असेल किंवा नसेल हे सर्व दिसेल.

Q. ई पीक पाहणी ॲप कुठे डाउनलोड करायचे?
Ans. तुमच्या मोबाईलचा Play Store मध्ये ई पीक पाहणी सर्च केल्यावर तुमच्यासमोर ई पीक पाहणी ॲप दिसेल तिथून डाऊनलोड करून घ्यायचे आहे.

Q. ई पीक पाहणी ॲप करिता कोणता मोबाईल पाहिजे?
Ans. ई पीक पाहणी ॲप वापरण्याकरिता अँड्रॉइड मोबाईल आवश्यक आहे.

Q. पिक पाहणीसाठी कोणते ॲप आहे?
Ans. ई पीक पाहणी App

Q. माझ्या शेतातली पीक पाण्यासाठी दुसऱ्याच्या मोबाईल वापरू शकतो का?
Ans. हो ई पीक पाहणी एका मोबाईल मध्ये एकूण 20 खातेदाराची नोंदणी करता येते.

Q. ई पीक पाहणी कोणी सुरू केली?
Ans. महाराष्ट्र सरकारच्या कृषी आणि महसूल विभागाने ई पीक पाहणी प्रकल्प सुरू केला.

Q. ई पीक पाहणी न केल्यास नुकसान काय होईल?
Ans. ई पीक पाहणी केली नाही तर सातबारावर कोणत्याही पिकाची नोंद होणार नाही त्यामुळे तुम्ही कोणत्याही पिक घेतले नाही असे गृहीत धरण्यात येईल.

Q. ई पीक पाहणी कोणत्या वर्षी सुरु झाला?
Ans. ई पिक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून महाराष्ट्र राज्यात सुरू झाला.

Q. पीक पाहणी शेतात नाही गेल्यास होईल का?
Ans. नाही. ई पीक पाहणी करण्यासाठी शेतात जाऊन मोबाईल मधून पीक पाहणी करावी लागते.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top