पीक विमा भरण्यसाठी मुदतवाढ होण्याची गरज 31 जुलै शेवची तारीख | Need Last Date Extended Crop Insurance Online Form

3.7/5 - (3 votes)

Need Last Date Extended Crop Insurance Online Form – आतापर्यत 1 कोटी 11 लाख लाख शेतकऱ्यांनी एक रुपयात पिक विमा अर्ज भरला असून, अजून पण काही शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे 1 रुपयात पिक विमा अर्ज भरण्यासाठी अपात्र ठरले आहेत. पिक विमा अर्ज न भरल्या जाण्याचे नेमके कारण काय आहे ही सर्व माहिती तुम्हाला सोप्या भाषेत या लेखामार्फत देण्यात आलेली आहे. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 11 लाख शेतकऱ्यांनी भरला 1 रुपयात पिक विमा, पण वेबसाईट वेग मात्र धिमा, पिक विमा तांत्रिक अडचणी फार, खूप शेतकरी अपात्र राहण्याची शक्यता  (Crop Insurance Taechnical Difficulties For Feeling 1 Rupp Ving So For 1 Corore 11 Lakh Farmers Fill The crop Insurance form)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

राज्यात आतापर्यंत 1 कोटी 11 लाख शेतकऱ्यांनी भरला 1 रुपयात पिक विमा

महाराष्ट्र राज्यात चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेमार्फत आतापर्यंत 1 कोटी 11 लाख शेतकरी बांधवांनी 1 रुपयात पिक विमा भरला आहे. पिक विमा भरण्याची संख्या दिवसेंदिवस 6 ते 7 लाखांनी वाढत चालली आहे. कारण शेतकरी बांधवांना पिक विमा भरणे खूपच सोप झाला आहे. याबद्दलची माहिती राज्यातील कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधान परिषद मध्ये सांगितले आहे. त्यांनी असे पण सांगितले की योजना खूपच फायद्याची असून योजना फक्त ठराविक गावंकरिता मर्यादित न ठेवता प्रत्येकी ग्रामीण भागात लागू व्हावी असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. त्यानंतर पुढे भविष्यात याबाबतचे आवश्यक निर्णय घेतले जाणार आहेत. ग्रामीण भागात विविध गावांमध्ये शेतकरी मित्रापर्यंत या योजनेची माहिती मिळावी. असा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करीत आहे. याबद्दलची सर्व माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितली.

 

पीक विमा असा भरा लवकर

 

पिक विमा तांत्रिक अडचणी फार, खूप शेतकरी अपात्र राहण्याची शक्यता

महाराष्ट्र शासन अंतर्गत सुरू करण्यात आलेला 1 रुपयात पिक विमा (Crop Insurance) अर्ज करण्यासाठी शेतकरी बंधूंसाठी खूप अडथळे निर्माण निर्माण करत आहे. कारण पिक विमा अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै पर्यंत आहे. म्हणजेच मुदत फक्त 4 दिवस राहिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विमा अर्ज भरण्यासाठी तासंतास मोबाईल, कम्प्युटर व लॅपटॉप समोर उभे राहावे लागत आहे. सन 2023 ते 2024 या वर्षांकरिता महाराष्ट्र सरकारने पिक विमा योजना जाहीर केल्यानंतर प्रत्यक्ष शासन निर्णय हाती येण्यास खूपच कालावधी लोटला आहे. तसेच यावर्षी खरीप हंगाम चालू झाल्यानंतरही एक महिना पाऊस चालू असल्यामुळे जिल्ह्यातील खूप शेतकऱ्यांना पेरणीसाठीही वेळ लागला. त्यामुळे पिक विमा पोर्टलवर विमा च्या तपशील अद्यावत करण्यासाठी उशीर लागला. पेरणीनंतर आठवड्यापासून शेतकरी बांधवांच्या वारंवार संबंधित पोर्टलवर अर्ज करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. परंतु तांत्रिक अडचणीमुळे गेल्या आठवड्यात खूपच शेतकऱ्यांना पिक विमा अर्ज भरता आला नाही आहे. परंतु आता पिक विमा विमाच्या अर्ज भरणे चालू आहे मात्र अर्ज करण्याची प्रक्रियेच्या वेग खूपच कमी आहे. एका शेतकऱ्याला कितीतरी वेळा नवीन लॉगिन करून त्याच्यासाठी तासंतास अर्ज करण्यासाठी वाट बघावी लागत आहे. पिक विमा चा अर्ज करत असताना डिवाइस वर सेंड फायनान्शिअल आयडी सूचना आल्यावर पोर्टल हँग होत आहे. वैयक्तिक डिवाइस व्यतिरिक्त CMC केंद्रात अर्ज करतानाही अडचण येत आहे.

 

पीक विमा नुकसान भरपाई अशी मिळवा

 

पिक विमा अर्ज मुदतवाढ देण्याची गरज (Need to be extend date)

पीक विमा (Crop Insurance) योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकरी बांधवांची संख्या वाढवण्याकरिता कृषी विभागाने शेतकरी मित्रांना सांगितले होते. त्यातच आता मुदत तारीख जवळ आलेली आहे. कारण वेबसाईटच्या अडचणीमुळे उरलेल्या 4 दिवसात शेतकरी बांधवांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे सर्व्हरवर जास्त लोड येत आहे. अजून तांत्रिकी अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने एक रुपयात पिक विमा योजनेत अर्ज करण्याकरिता मुदत वाढ देण्याची मागणी शेतकरी बंधू आणि संघटनांच्याद्वारे करण्यात आलेली आहे.
पिक विमा योजनेच्या लाभ घेण्याकरिता शेतकरी बांधवांना लवकरच प्रयत्न करावे लागतील. मुदत जवळ आल्यामुळे अर्ज करणाऱ्या शेतकरी मित्रांची संख्या वाढत आहे त्यामुळे तांत्रिकी अडचणी निर्माण होण्याची भीती निर्माण होत आहे. त्याकरिता पोर्टलला येणारे तांत्रिकी अडचणी आता दूर करण्यात आल्या आहेत आणि अर्ज प्रक्रिया सुरळीत करण्यात आलेली आहे

मित्रांना शेअर करा
Scroll to Top