Free IBPS Bharti Training 2023 Mahajyoti

फ्री भरती क्लासेस व मिळणार 6000 महिना महाज्योती मोबाईल मध्ये फॉर्म भरा | Free IBPS Bharti Training 2023 Mahajyoti Application Form Fulll Up Process

3.9/5 - (105 votes)

Free IBPS Bharti Training 2023 Mahajyoti Application Form Fulll Up Process  – IBPS-PO, LIC AAO भरतीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थी मुला-मुलींसाठी आनंदाची बातमी. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर मार्फत राज्यातील नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्ग, विभक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील 600 विद्यार्थ्यांसाठी IBPS-PO, LIC-AAO 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षेकरिता 2023-24 मधील सत्रातील परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आणि प्रशिक्षण घेत असताना पात्र विद्यार्थ्यांना पगार सुद्धा दिला जाणार आहे. तरी या प्रशिक्षण योजनेसाठी पात्र असलेले विद्यार्थी अर्ज करू शकता. नेमकी ही योजना काय आहे. तसेच योजनेचे स्वरूप, योजनेच्या लाभासाठी पात्रता, योजनेच्या अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, योजनेसाठी अर्ज कसा करावा, सामाजिक प्रवर्गनिहाय विभागणी, आरक्षण, प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती, योजनेची अधिकृत वेबसाईट ही संपूर्ण माहिती आणि योजनेचा अर्ज मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेत खालील लेखामध्ये देण्यात आलेली आहे. (free bharti training 2023 by sheti yojana)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सूचना – योजनेसाठी पात्र उमेदवार अर्ज करण्याआधी लेखामध्ये देण्यात आलेली सविस्तर माहिती वाचून अर्ज करावा.

फ्री IBPS भरती प्रशिक्षण 2023 योजनेचे स्वरूप

IBPS-SO, LIC-AAO 2024 या परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी पात्र नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत अनिवासी प्रशिक्षण देण्यात येते.

योजनेचे नाव IBPS-PO, LIC-AAO फ्री प्रशिक्षण योजना 2023 महाज्योती.
प्रशिक्षणाच्या कालावधी 06 महिन्यांकरिता.
विद्यावेतन 6000/- दर महिन्याला (किमान 75% टक्के हजेरी असल्यास)
प्रशिक्षणार्थी संख्या 1) नागपूर: 300, 2) छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद): 300
एकूण जागा 600 जागा

 

आरोग्य सेवक भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

योजनेच्या लाभासाठी पात्रता (Eligibility Criteria)

1) विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा असावी.
2) विद्यार्थी तर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा किंवा असावी.
3) विद्यार्थी नॉन-क्रिमीलेअर उत्पन्न गटातील असावा किंवा असावी.
4) विद्यार्थी पदवीचे शिक्षण पूर्ण केलेला किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी सुद्धा या प्रशिक्षणाकरिता अर्ज करू शकतात.
5) योजनेसाठी पात्र विद्यार्थीचे वय 20 वर्षे ते 33 वर्षे दरम्यान असावे.

 

अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

1) आधार कार्ड
2) जातीचा दाखला
3) वैध नॉन- क्रिमीलेअर प्रमाणपत्र
4) 12 वी पास झाल्याचे प्रमाणपत्र
5) पदवी पास गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र
6) पदव्युत्तर पास गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र
7) दिव्यांग असल्यास 40% पेक्षा जास्त प्रमाणात असलेल्या दिव्यांगत्वाच्या सक्षम प्राधिकार्‍याच्या दाखला
8) बँकेचे खाते आधार कार्ड क्रमांकाशी संलग्न असावे

 

ग्रामसेवक भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

अर्ज कसा करावा (How  to Apply Online)

1) महाज्योती चा अधिकृत वेबसाईटवर जाऊन Notice Board मधील IBPS-PO, LIC-AAO 2023-24 यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
2) अर्जासोबत अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे स्वाक्षंकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावे
3) पदवीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे बोनाफाईट प्रमाणपत्र अर्ज सोबत जोडावे.
4) या योजनेचा अर्ज मोबाईल मधून भरण्याची सविस्तर माहिती Computer World Centre या युट्युब (Youtube) चॅनल वर देण्यात आलेली आहे. माहिती बघून तुम्ही स्वतः मोबाईल मधून योजनेचा अर्ज करू शकता.

 

सामाजिक प्रवर्गनिहाय विभागणी

सामाजिक प्रवर्ग टक्केवारी 
इतर मागासवर्ग (OBC) 59%
निरधीसुचित जमाती – अ (VJ-A) 10%
भटक्या जमाती – क (NT-C) 11%
भटक्या जमाती – ड (NT-D) 6%
विशेष मागास प्रवर्ग (SBC) 6%

आरक्षण –
1) इतर मागासवर्ग, विमुक्त-जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील 30% जागा महिलांसाठी आरक्षित आहे.
2) अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.

 

प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती (Terms & Condition)

1) अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे.

2) विहित नमुन्यामध्ये कागदपत्रांसहित अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांची चांदणी परीक्षा घेऊन प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल.

3) प्रशिक्षणाकरिता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांक रुजू होतील त्या दिवसापासून त्यांना 6000/- रुपये दर महिन्याला विद्यावेतन लागू होईल. प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यात येईल.

4) विद्यार्थ्यांनी विद्यावेतन जमा करण्यासाठी आधार क्रमांकाची संलग्न बॅंक खाते देणे अनिवार्य आहे.

5) महा-ज्योती कडे अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सारथी, पुणे या संस्थेकडील याच परीक्षेचा परीक्षणाच्या लाभ घेतलेला नसावा. तसेच महाज्योती कडील सदर प्रशिक्षणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रशिक्षण योजनेच्या लाभ घेतलेला नसावा. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या दुबार लाभ घेतल्याचे निदर्शनास असल्यास विद्यार्थ्यांना विरुद्ध नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.

6) सदर प्रशिक्षणासाठी अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्याने वरील अटी व शर्तीच्या अभंग केल्याचे तसेच चुकीची किंवा खोटी कागदपत्रे/माहिती सादर केल्यास त्यांच्यावर झालेल्या प्रशिक्षण खर्चाची त्यांच्याकडून वसुली करण्यात येईल व यापुढे महाज्योतीच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेण्यास ते पात्र असणार नाही.

7) नमूद निकषांची पूर्तता न करणाऱ्या, अपूर्ण अर्ज सादर करणाऱ्या किंवा अर्जासोबत कागदपत्रे सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्ज बाद करण्यात येईल.

8) जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महा- ज्योती यांचे राहतील.

9) पोस्टाने किंवा ई-मेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.1

10) अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महा- ज्योतीच्या Call Centre चा क्रमांकावर संपर्क करावा.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख | Application Form Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करू शकता.
योजनेची अधिकृत वेबसाईट www.mahajyoti.org.in
योजनेचा हेल्पलाइन नंबर 07122870120/21
अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
जाहिरात PDF डाऊनलोड PDF
मोबाईल मध्ये फॉर्म भरा येथे क्लिक करा

 

IBSP Free Bharti Training Information in Marathi

 

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा : येथे क्लिक करा

🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

 

FAQ – Free IBPS Bharti Training 2023 Mahajyoti Application Form Fulll Up Process

Q. Mahajyoti Yojana official website link?
Ans. www.mahajyoti.org.in

Q. Mahajyoti Yojana Call Centre number?
Ans. 07122870120/21

Q. महाज्योती योजना 2023 last date?
Ans. महाज्योति योजनेसाठी पात्र विद्यार्थी 21 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करू शकता.

Q. महाज्योती संस्था कुठे आहे?
Ans. नागपूर (महाराष्ट्र)

Q. महाज्योती योजना विद्यार्थ्यांना किती पगार मिळणार आहे?
Ans. महा- ज्योती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला 6000/- रुपये विद्यावेतन मिळणार आहे.

Q. महा- ज्योती योजनासाठी मी अर्ज करू शकतो का?
Ans. महाज्योती योजनेसाठी पात्र असणारे विद्यार्थी वरती लेखामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

Q. महाज्योती योजनेअंतर्गत कोणकोणत्या भरतीसाठी प्रशिक्षण मिळणार आहे?
Ans. महाज्योती योजना 2023 मार्फत IBPS-SO, LIC-AAO या भरतीची परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Q. What is the last date mahajyoti IBPS-SO, LIC-AAO application form?
Ans. 21 September 2023 Last Date Online Application Form.

Q. महाज्योती योजनेसाठी लागणारी कागदपत्रे?
Ans. महाज्योती योजना 2023 साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे वरती लेखांमध्ये देण्यात आलेली आहेत.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top