Gram Panchayat Nivadanuk Kagadpatre

ग्रामपंचायत निवडणूक आवश्यक कागदपत्रे – Gram Panchayat Nivadanuk Kagadpatre

5/5 - (1 vote)

Gram Panchayat Nivadanuk Kagadpatre – ग्रामपंचायत निवडणूक आवश्यक कागदपत्रे सरपंच ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहायचे असेल तर उमेदवाराला सर्वात आधी कोण कोणते कागदपत्रे लागतात हे माहिती असणे खूप गरजेचे असते. सरपंच निवडणुकीत कागदपत्रे मोठे काम निभावतात त्याशिवाय तुम्ही फार्म भरू शकत नाही. त्यामुळे उमेदवाराला माहिती असणे आवश्यक आहे ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता येते.

तुम्हाला खाली ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवाराला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तसेच सभापती जवळ पडताळणी करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते त्याची यादी देण्यात आली आहे तसेच तुम्ही सरपंच ग्रामपंचायत निवडणुकीत फॉर्म भरण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते याची तुम्हाला पीडीएफ उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Gram Panchayat Nivadanuk Kagadpatre)

सरपंच ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज सोबत सादर करायचे कागदपत्रे ? | Grampanchayat Election Documents in Marathi
1) ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट
2) तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही याचे प्रमाणपत्र
3) तुम्हाला दोन अपत्या पेक्षा जास्त अपत्य नाहीत किंवा आपत्य संदर्भातील घोषणापत्र
4) शौचालय असल्याबाबतचे प्रमाणपत्र किंवा ग्रामपंचायत ठराव
5) जातीचे प्रमाणपत्र/ कास्ट सर्टिफिकेट
6) जात पडताळणी प्रमाणपत्र किंवा त्याची टोकन पावती
7) जात वैधता प्रमाणपत्र 12 महिन्याच्या आत सादर करणे बाबत हमीपत्र
8) महसूल किंवा ग्रामपंचायत कडे कोणत्याही प्रकारची कर थकबाकी नसल्याचा दाखला
9) शासकीय किंवा ग्रामपंचायत च्या जागेवर अतिक्रमण केलेले नसल्याचा दाखला
10) ठेकेदार नसल्याबाबतचा दाखला
11) नावात बदल किंवा तफावत असल्यास प्रतिज्ञापत्र
12) मतदान कार्डची झेरॉक्स
13) मतदान कार्ड नसल्यास मतदार यादीतील ज्या पानावर तुमची मतदानाची माहिती आहे त्या पानाचे झेरॉक्स
14) नवीन राष्ट्रीयकृत बँकेचे खाते उघडून त्याचे बँक पासबुक चे झेरॉक्स
15) उमेदवाराचे वय निवडणुकी करिता 21 वर्षापेक्षा कमी नसावे त्याच्यासाठी वयाचा पुरावा
16) उमेदवार किमान सातवी पास असावा किंवा त्याच्यापेक्षा जास्त
17) उमेदवाराचे जीत पर्यंत शिक्षण झाले असेल जी परीक्षा दिली असेल त्याचे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
18) उमेदवाराचे दैनंदिन खर्चाचे किंवा अंतिम खर्चाचे हमीपत्र
19) अनामत रक्कम पावती
20) आयत्या वेळी निवडणूक आयोगाच्या निदर्शनाप्रमाणे निवडणुकीत काही बदल झाल्यास त्याप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

(Gram Panchayat Nivadanuk Kagadpatre)

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top