PM Kisan Yojana Payment Status

PM किसान योजना पैसे आले की नाही असे चेक करा | PM Kisan Yojana Payment Status Check Kara

3.3/5 - (6 votes)

PM Kisan Yojana Payment Status : शेतकऱ्यांच्या खात्यात PM Kisan Yojana 2000 हजार रुपयाचा हप्ता. 31 मे 2022 पासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी चा अकरावा हप्ता DBT मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जात आहे. तर मग तुमच्या खात्यात PM Kisan Yojana 11th Installment जमा झाले का ते कसं चेक करायचं ह्या लेखात आपण पाहणार आहोत.

शेवटी तुम्हाला व्हिडीओ देण्यात आला आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही पेमेंट चेक करू शकता.

PM kisan Samman Nidhi Yojana Payment Proceed झाली आहे. पण तरीसुद्धा खूप शेतकऱ्यांचे पैसे अजून जमा झाले नाहीत. पी एम किसान सन्मान निधी चा हप्ता न मिळण्याचे कारण म्हणजे चुकीचे बँक तपशील हे सुद्धा असू शकते. त्यामुळे पी एम किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा व्हावे याच्यासाठी तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करून घ्या
तुम्हाला जर चेक करायचे असेल की तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी चा हप्ता मिळणार आहे की नाही किंवा मिळाला आहे की नाही. त्याच्यासाठी खाली पद्धतीचा वापर करा. खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करून तुम्ही PM Kisan Yojana Payment Status चेक करू शकता तुमच्या मोबाईल मध्ये. तर मग चला पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


PM किसान योजना 11 वा हप्ता जमा झाला की नाही चेक करा | PM Kisan Yojana 11th Installment Payment Status Check in Mobile

 

1) सर्वात आधी तुमच्या मोबाईल मध्ये गूगल ओपन करा.

2) त्याच्यात सर्च करा PM Kisan Yojana 2022

3) तुम्हाला तिथे पहिली वेबसाईट दिसेल pmkisan.gov.in त्या वेबसाईट वरती क्लिक करा.

4) तुमच्यासमोर वेबसाईट ओपन होईल तिला खाली स्क्रोल करा farmers corner हा पर्याय दिसेल.

5) त्या ठिकाणी तुम्हाला beneficiary status या बटणावर क्लिक करा.

6) त्यानंतर तुमचा आधार नंबर किंवा बँक अकाउंट नंबर टाका आणि Get Data या बटणावर क्लिक करा.

7) जसे तुम्ही Get Data बटनावर ती कराल तेव्हा तुम्हाला किती हप्ते आतापर्यंत मिळाले आहेत या बद्दलची संपूर्ण माहिती दिसेल.

8) एक बाब लक्षात ठेवा आता जरी (PM Kisan Yojana 11th installment) 11 वा हप्ता असेल पण तुमच्यासाठी तू पहिला दुसरा तिसरा किंवा चौथा पाचवा हप्ता असू शकतो.

9) तुम्हाला चालू जो हप्ता मिळणार असेल तिथे Payment Proceed असे लिहिलेले असेल तर समजून जा की तुम्हाला. PM किसान योजना 2000 हजार मिळाले असतील किंवा लवकरच आहात का तुमच्या खात्यात जमा होईल.


पी एम किसान सन्मान निधी योजना लाभ कसा मिळतो. | How to apply for pm kisan yojana

शेतकरी बंधूंनो पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्ते मिळून सहा हजार रुपये अनुदान मिळत असत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा ऑनलाईन अर्ज शेतकरी स्वतः करू शकता किंवा जवळच्या सेतू केंद्रात किंवा सीएससी केंद्रात जाऊन पण फॉर्म भरू शकता. फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून तलाठी यांच्याकडून संबंधित कागदपत्रावर सही शिक्का घ्यावा लागतो ही सर्व कागदपत्रे त्यांच्याकडे जमा करावी लागतात त्यानंतर तहसील कार्यालया मधील पी एम किसान सन्मान निधी विभागाकडे ही कागदपत्रे सादर केली जातात तहसील कार्यालयांमधील पीएम किसान सम्मान निधि विभागाने याला मंजुरी दिल्यावर तुम्हाला पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळायला सुरुवात होते.

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top